अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग ! Sugarcane FRP Payment 2025

Sugarcane FRP Payment 2025 तिसगाव : वृद्धेश्वर साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे 2 हजार 723 रुपये प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे पेमेंट रक्कम दिली आहे.

Sugarcane FRP Payment 2025

WhatsApp Group Join Now

गाळपास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खाते या पोटी 70 कोटी रुपये रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांनी दिली.

रुईच्या गाठी व सरकी विक्री होत असलेला ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्प गुंडाळणार!

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. 2025-26 हंगामासाठी 6 लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.

Sugarcane FRP Payment 2025 कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड होण्याचे दृष्टीने कारखाना शेतकरी विभाग ऊस पीक परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत.

WhatsApp Group Join Now

तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भातील योजना विचारधिन आहे.

Sugarcane FRP Payment 2025 कारखान्याचा आगामी गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी आवश्यक मशिनरी दुरुस्ती व देखभाल आधीचे कामकाज सुरू असल्याची माहिती संचालक राहुल राजळे यांनी दिली.

कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये संपूर्ण ऊस वृद्धेश्वर कारखान्याकडे नोंदणी करावी.

Sugarcane FRP Payment 2025 सदरचा ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष रामकिसन काकडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment