गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन 3400 शक्य!! Sugarcane FRP 2025

Sugarcane FRP 2025 कोल्हापूर: गेली वर्षभर साखरेचा घाऊक बाजारातील दर प्रतिक्विंटल 3900 रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल प्रतिटन 3,300 ते 3,400 रुपये, तर उर्वरित रक्कम अंतिम हिशेबानंतर मिळू शकते.

Sugarcane FRP 2025

Sugarcane FRP 2025 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे.

आंतरपीक शेती!!

Sugarcane FRP 2025 यंदा उसाची 10.25 टक्के उताऱ्याला 3,550 रुपये एफआरपी निश्चित केली आहे. त्यापुढे प्रत्येक टक्क्याला 355 रुपये मिळणार आहेत. यावर्षी साखरेचा घाऊक बाजारातील दर प्रतिक्विंटल 3900 रुपयांवर स्थिर राहिला आहे.

WhatsApp Group Join Now

Sugarcane FRP 2025 एक टन ऊस गाळपातून किमान 120 किलो साखरेचे उत्पादन गृहीत धरले तर साखरेतून 4,680 रुपये मिळू शकतात. त्याशिवाय इतर उपपदार्थ उत्पादनातून प्रतिटन किमान 700 रुपये उत्पन्न मिळू शकते.

असे 5380 रुप्यांमधून सरासरी प्रतिटन 850 रुपये ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता कारखान्यांच्या हातात 4,530 रुपये राहतात.

त्यातून साखर उतपादन खर्च प्रतिटन 1100 रुपये गृहीत घरला तरी 3430 रुपये शिल्लक राहू शकतात. त्यामुळे यंदा प्रतिटन 3300 ते 3400 रुपये पहिली उचल मिळू शकते.

WhatsApp Group Join Now

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेकडे लक्ष

Sugarcane FRP 2025 स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 16 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होत आहे. एकरकमी एफआरपीविरोधात राज्य सरकार सर्वोच न्यायालयात गेले आहे.

त्याचे पडसाद या परिषदेत उमटणार असून, उसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील साखरेचा भाव पाहता, ‘स्वाभिमानी’ ची पहिल्या उचली मागणी किती राहणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजर लागल्या आहेत.

यंदा साखरेचे दर चांगले असून, विशेष म्हणजे वर्षभर स्थिर राहिले आहेत. रासायनिक खतांसह उसाच्या उतपादन खर्चात मोठी वाढ झाल्याने किमान साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि त्यानंतर अंतिम दर देण्यास कारखानदारांना काहीच अडचण नाही.-शिवाजी माने, नेते, जय शिवराय शेतकरी संघटना”

इतर माहितीसाठी येथे क्लीक करा



Leave a Comment