Sugarcane Cultivation Technology 2025 महाराष्ट्रातील हवामान आणि जमीन ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे. परंतु अलीकडे उसाचे दर हेक्टरी उत्पादकता मात्र घटत आहे. यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून उसाची लागवड करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात उसाची लागवड सुरु, पूर्व हंगामी आणि आडसाली या तिन्ही हंगामामध्ये केली जाते.

सुरु ऊसाची लागवड केंव्हा करावी?
SugarCane Cultivation Technology 2025 सुरु उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते. परंतु लागणीचा योग्य कालावधी 15 डिसेंबर ते 15 हा आहे. या उसाची तोडणी साधारण 12-14 महिन्यांनी केली जाते. सुरु ऊस घेण्यापूर्वी खरीप हंगामात कडधान्याचे अथवा गळीताचे पीक घ्यावे किंवा हिरवळीचे पीक ताग, धैंचा घेऊन ते जमिनीत गाडले असता सुरु उसाचे उत्पादनात वाढ होते व जमिनीची सुपीकता टिकून राहते.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात जास्त ऊस गाळप, हा जिल्हा साखर उताऱ्यात नंबर एकवर!!
सुरु ऊसासाठी हवामान व जमीन कशी करावी?
उसाचे उत्पादन व साखर उतारा हा हवामानावर अवलंबून असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तापमान कमी असते. त्यामुळे ऊस उगवण उशिरा होते. उगवणीस साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. उसाची वाढ सूर्यप्रकाशात चांगल्या प्रकारे होते. पक्वतेच्या काळात 150 सेल्यीयस तापमान साखर उताऱ्यास पोषक असते.

SugarCane Cultivation Technology 2025 ऊस लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी 1 ते 1.5 मिटर खोलीची, मध्यम ते भारी जमीन, तसेच नदीकाठच्या गाळाच्या सुपीक जमिनी ऊसासाठी योग्य असतात. रासायनिक सुपीकतेच्या दृष्टिकोनातून जमिनीचा सामू 6.5 ते 8.5, क्षारांचे प्रमाण 0.5 डे.सा/मी. पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 15 टक्के पेक्षा कमी आणि सेंद्रिय कर्बाचे किमान प्रमाण 0.5 टक्के असावे.
सुरु ऊस लागवडीसाठी पूर्वमशागत कशी करावी?
ऊसासाठी निवडलेल्या जमिनीची पूर्व मशागत चांगली करावी. यासाठी पहिली उभी आणि नंतर दुसरी आडवी खोल नांगरट करावी. नांगरणीनंतर कुळव चालवून ढेकळे फोडावीत. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 20 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खताचा हप्ता द्यावा. कुळवणी नंतर मैंद चालवून जमीन सपाट करावी. जमिनीच्या प्रकारानुसार 1 मीटर ते 1.50 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. ऊसाची लागण पट्टा पद्धतीने करावयाची असल्यास रिजरच्या साहाय्याने 2.5 किंवा 3 फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यात लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे 2.5-5 फूट किंवा 3-6 फूट अंतरावर जोड ओळींची पट्टा पद्धीतीने लागवड करणे सुलभ होते. यांत्रिक तोडणीसाठी सऱ्या किमान 4 फूट अंतरावर काढून लागवड करावी.
सुरू हंगामासाठी कोणत्या वाणांची लागवड करावी?
सुरू ऊस पीक शेतामध्ये 12 ते 13 महिने उभे असते यासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने सुरू हंगामासाठी को. 86032, को. 94012, फुले 265, को. 92005 आणि व्ही.एस.आय. 434 या उस वाणांची शिफारस केली आहे.
सुरू ऊस लागवडीसाठी बेण्याची निवड आणि बेणेप्रक्रिया कशी करावी?
उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी बेणे मळ्यातील बेणे ऊस लागवडीसाठी वापरावे. बेणे मळ्यातील बेण्याचा वापर केल्याने ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. तसेच दर तीन वर्षांनी बेणे बदलावे. उसाचे बेणे सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविरहित, रसरशीत असावे. कांड्या लांब आणि जाड असाव्यात, डोळे फुगीर असावेत, रोग आणि किडींपासून मुक्त, 9 ते 11 महिने वयाचे असावे आणि बेण्याची अनुवंशिक शुद्धता 100% असावी.
ऊस बेणे प्रक्रिया: SugarCane Cultivation Technology 2025
बेणे प्रक्रिया करून उसाची लागवड करावी. उसाच्या कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच काणी रोगाच्या बंदोबस्तासाठी मेलॅथिऑन 50 टक्के प्रवाही 300 मिली+ बाविस्टीन 100 ग्रॅम प्रती हेक्टरी 100 लिटर पाण्यात मिसळून बेणे 10 मिनिटे बुडवावे. रासायनिक बेणे प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर 100 लिटर पाण्यामध्ये ऍसिटोबॅक्टर 10 किलो व स्फुरद विरघळणारे जिवाणू 1.25 किलो मिसळावे. अशा द्रावणामध्ये हे बेणे 30 मिनिटे बुडवावे. त्यामुळे ऍसिटोबॅक्टर जिवाणू बेण्याच्या पेशीमध्ये प्रवेश करून हवेतील नत्र उपलब्ध करून देतात आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या जिवाणूच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये 50 टक्के तर स्फुरदेच्या मात्रेत 25 टक्के बचत होते.
सुरु ऊसाची लागवड कशी करावी?
SugarCane Cultivation Technology 2025 सुरु ऊसाची लागण दोन डोळे टिपरी पद्धतीने करावी. दोन डोळ्याचे टिपरे तयार करताना डोळ्याच्या वरील 1/3 भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे ऊस लागण करताना दोन टिपऱ्यांमधील अंतर 15 ते 20 सेंमी ठेवावे. लागणीसाठी हेक्टरी 25,000 दोन डोळा टिपरी बेणे लागते. सुरु उसाची लागण प्लॅस्टिक ट्रेमधील रोपांची लागणं करताना दोन रोपांमधील अंतर 2 फूट ठेवावे.
सुरु ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे?
जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी जमिनीचे माती पृथ:करण करणे अगत्याचे आहे. मातीपरीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सुरु ऊसासाठी प्रति हेक्टरी अनुक्रमे 20 टन (40 गाड्या) शेणखत अथवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रति हेक्टरी 7.5 टन (15 गाड्या) किंवा गांडूळ खत प्रति हेक्टरी 5 टन (10 गाड्या) या खतांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.
सुरु ऊसासाठी 250 किलो नत्र 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाशची शिफारस करण्यात आलेली आहे. ऊसाला रासायनिक खते देताना पहिला हप्ता ऊस लागणीच्या वेळेस द्यावा. ऊसाची उत्तम उगवण आणि चांगल्या मुळ्या फुटव्यासाठी स्फुरद आणि पालाशची गरज असते. म्हणून यावेळी शिफारशीच्या 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश द्यावे. ऊस पीक फुटवा अवस्थेत असताना (लागणीनंतर 6 ते 8 आठ्वड्यानी) नत्राची गरज जास्त असते. अशावेळी शिफारशीच्या 40 टक्के नत्र द्यावे.
खताची तिसरी मात्रा कांडी सुटताना (लागणीनंतर 12 ते 16 आठ्वड्यानी) द्यावी. यावेळी नत्राची गरज कमी असते म्हणून 10 टक्के नत्र द्यावे. उसासाठी खतांची शेवटची मात्रा मोठ्या बांधणीच्या वेळी द्यावी यावेळी उसाची जोमदारपणे वाढ सुरु होते, म्हणून यावेळी 40 टक्के नत्र 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश खते द्यावीत आणि नंतर बांधणी करावी को. 86032 या वाणाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खत मात्रेपेक्षा 25 टक्के जादा खतमात्रा म्हणजेच हेक्टरी 300 किलो नत्र 140 कि स्फुरद व 140 कि. पालाश वरील पद्धतीने द्यावे.
सुरु उसासाठी आंतरमशागत कशी करावी?
ऊस एक महिन्याचा असताना नांग्या असल्यास भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागण करतेवेळीच पाण्याच्या पाटात जास्त एक डोळ्याच्या टिपऱ्या लावून या रोपांचा वापर करावा आणि पाणी द्यावे. उसाचे पीक पहिल्या 90 दिवसांपर्यंत तनविहरित ठेवावे. त्यासाठी अट्रॅझिन हेक्टरी 2 किलो क्रियाशील घटक म्हणजेच हेक्टरी 5 किलो अट्रॅटॅफ किंवा मेट्रीब्युझीन हेक्टरी 1 किलो क्रियाशील घटक म्हणजेच हेक्टरी 1.5 किलो सेन्कोर 1000 लिटर पाण्यात मिसळून ऊस लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा असताना फवारावे. फवारणी नंतर 3 ते 4 दिवस कसल्याही प्रकारची मशागत करू नये.
तणांचे प्रमाण जास्त असल्यास लागणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 2,4-D (सोडियम क्षार) या तणनाशकाची हेक्टरी 1 किलो क्रियाशील घटक म्हणजेच 1.250 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरळी व लव्हाळा या तणांच्या बंदोबस्तासाठी ऊस लागवडीनंतर 2 महिन्यांनी ग्लायफोसेट हेक्टरी 1 किलो क्रियाशील घटक म्हणजेच 2.5 किलो राऊंडअप 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तणनाशक पिकावर पडू देऊ नये. त्यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा.
एकात्मिक पद्धीतीने तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होते. यासाठी ऊस लागणीनंतर 3 ते 4 दिवसांनी सेन्कोर हेक्टरी 1.5 किलो त्यानंतर 60 दिवसांनी 2,4-डी क्षार हेक्टरी 1.250 किलो फवारून 90 दिवसांनी कोळपणी करावी.
मोठी बांधणी: SugarCane Cultivation Technology 2025
ऊस लागवडीनंतर 16 ते 20 आठ्वड्यानी रासायनिक खताची चौथी मात्रा देऊन पहारीच्या औजाराने वरंबे फोडून आंतर मशागत करावी व सायन कुळव आणि रिजरने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सऱ्या वरंबे दुरुस्त करून घ्यावेत.
सुरु उसामध्ये कोणकोणती आंतरपिके घ्यावीत?
सुरु उसाचा कालावधी 12 ते 14 महिन्यांचा असतो. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी 6 ते 8 आठवड्याचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. उसामध्ये आंतरपीक घेतल्याने ऊस लागणीच्या सुरुवातीचा खर्च भरून निघतो. तसेच अंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते.
ऊसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून निघून जातो. तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. सुरु उसामध्ये भुईमूग, सोयाबीन, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, आणि पट्ट्यांमध्ये कलिंगड, काकडी, टरबूज हि आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. सुरु उसामध्ये आंतरपिकाच्या निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाची जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकांचे बी प्रमाण ठरविने गरजेचे आहे.
पाणी व्यवस्थापन: SugarCane Cultivation Technology 2025
नेहमीच्या सिंचन पद्धतीनुसार ऊस लागवडीपासून मोठ्या बांधनेपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सेमी खोलीच्या द्याव्यात. म्हणजेच वरंब्याच्या निम्म्या उंचीपर्यंत पाणी द्यावे. ऊस बांधणी नंतर 10 सेमी खोलीच्या पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. म्हणजेच वरंब्याच्या पाऊण उंचीपर्यंत पाणी द्यावे. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याच्या अधिक वापरामुळे जमिनीत क्षारयुक्त बनतात. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. या व्यतिरिक्त सूक्ष्म जलसिंचन पद्धती म्हणजे ठिबक व रेणगण या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.
सुरू उसासाठी एकूण 250 हेक्टर से.मी. पाण्याची गरज असते. साधारणपणे 28 ते 30 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पट्टा पद्धतीने लागणीनंतर फक्त उसाच्या दोन सऱ्यांनाच पाणी द्यावे. ऊस बांधणी नंतर एका सरीला पाणी देऊन दोन्ही ओळी भिजवता येतात. यामुळे पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास 50% पर्यंत पाण्यात बचत होते आणि 15 ते 20% उत्पादनातही वाढ होते, म्हणून हल्ली ही पद्धत वापरणे गरजेचे आहे.
रोग व किडींचे व्यवस्थापन: SugarCane Cultivation Technology 2025
उसामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव इतर पिकापेक्षा कमी दिसून येतो. तरीसुद्धा अधिक ऊस उत्पादनासाठी वेळेवर पीक संरक्षणाचे उपाय करणे गरजेचे आहे. सुरू उसावर खोडकिडे, खवले कीड, पांढरी माशी, शेंडा पोखरणारी अळी, व लोकरी मावा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये खोड किडींचा प्रादुर्भाव ऊस उगवणी पासून ऊस बांधणीपर्यंत विशेषता: हलक्या जमिनीत ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये तापमान वाढल्यास व आद्रता कमी झाल्यास दिसून येतो.
या किडीमुळे उसाचे पोंगे वाळतात व बूडघ्याजवळ लहान-लहान छिद्रे दिसतात. यासाठी कीडग्रस्त पोंगे उपटून अळीसह त्याचा नाश करावा. उसाच्या कांड्यांवर राखाडी तपकिरी अशा गोल आकाराच्या खवले किडीचे थर दिसून येतात. यासाठी बेणे मळ्यातील शुद्ध निरोगी बेणे वापरावे. बेण्यास बीज प्रक्रिया करावी. उसाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. अलीकडे उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दलदलीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक पांढरट पिले व कोष दिसतात. ते पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते. या किडीचे नियंत्रणासाठी उसाची लागण चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. डायमेथोएट 30% प्रवाही 600 मि.ली. हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव ऊस लागणी पासून ते तोडणी पर्यंत आढळून येतो. लोकरी मावा बाल्यावस्थेत चार वेळा कात टाकतात. तिसऱ्या बाल्यावस्थेपासून त्यांच्या पाठीवर लोकरी सारखे पांढरे मेनतंतू दिसतात म्हणून त्यांना पांढरा लोकरी मावा असे म्हणतात.
या किडीचा प्रादुर्भाव प्रथम बाहेरून बाजूस होतो. त्यावेळी नियंत्रण केलेस तो संपूर्ण क्षेत्रावर पसरतो. लोकरी मावाग्रस्त उसामध्ये डिफा अफीडिव्होरा, मायक्रोमस व सीरफीड माशी या मित्र किडी असतील तर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. मित्र किडी दिसून न आल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही हेक्टरी 1500 मि.ली. 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तोडणी आणि उत्पादन:
सर्व साधरणपणे डिसेंबर/ जानेवारी मध्ये लागण केलेला सुरु ऊस पुढील वर्षी फेब्रुवारी/ मार्च मध्ये तोडणीस तयार होतो. ऊस तोडणीपूर्वी 15 दिवस उसास पाणी देऊ नये. उसाची तोडणी पक्वतेनुसार करावी. तोडणी जमिनीलगत करावी व तुटलेला ऊस 24 तासांपर्यंत गाळलेस ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येत नाही. अशाप्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सुरु ऊसाचे हेक्टरी किमान 150 मे टन उत्पादन निश्चित मिळते.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |