यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली गाळप कधी सुरु होणार? ऊसाला किती दर देणार?Sugarcane Crushing Season 2025

Sugarcane Crushing Season 2025 राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे 2025-26 या वर्षीचा ऊस गाळप राज्यात 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय झाला.

Sugarcane Crushing Season 2025

WhatsApp Group Join Now

Sugarcane Crushing Season 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 5 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

द्राक्षबागेत फळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजना!!

Sugarcane Crushing Season 2025 मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 2024-25 गाळप हंगामाचा आढावा आणि 2025-26 मधील नवीन हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी मंत्री समितीचे बैठक आयोजित करण्यात आली होती.

Sugarcane Crushing Season 2025 या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now

यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी बेसिक उतारा 10.25% विचारात घेऊन प्रति मेट्रिक टन 3 हजार 550 रुपये वाजवी लाभदार देण्यात येणार आहे.

गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये 99 सहकारी व 101 खाजगी साखर कारखान्याचा समावेश होता. शेतकऱ्यांना 31 हजार 301 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.

Sugarcane Crushing Season 2025 राज्याने 99.6 टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये 100 टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या 148 आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात 2024-25 मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज 298 कोटी यीनीट्स आहे.

कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न 1979 कोटी रुपये आहे. कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून 6 हजार 378 कोटी रुपये उत्पन्न झाले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Sugarcane Crushing Season 2025 बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि सहवीज निर्मिती विषयावर सविस्तर चर्चा करण्यात अली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले.

Sugarcane Crushing Season 2025 बैठकीपूर्वी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने, राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शविणाऱ्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment