Sugarcane Crushing 2025 पुणे: देशात नवीन ऊस गाळप आणि साखर उत्पादन हंगामास सुरुवात झाली असली, तरी यंदा मान्सून लांबल्याने उभ्या उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

Sugarcane Crushing 2025 परिणामी गाळप वाढून साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी 293 लाख टन उत्पादन झाले होते. यंदा त्यात सुमारे 57 लाख टन वाढ (16 टक्के) होऊन ते 350 लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
गव्हाची उशिरा पेरणी!!
Sugarcane Crushing 2025 तर इथेनॉलसाठी 35 लाख टन साखर वळवली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

Sugarcane Crushing 2025 गाळप हंगामाच्या पहिल्या पंधरवड्याचा अहवालानुसार 325 कारखान्यांनी गळ्यात सुरू केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत देशातील 144 कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.
परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा याच कालावधीत 128 लाख टन ऊस गाळपातुन 10 लाख 50 हजार टन नवीन साखर उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा 8.2% मिळाला आहे.
गेल्यावर्षी 91 टन उसाचे गाळप होऊन 7 लाख 10 हजार टन साखर आणि 7.8% साखर उतारा मिळाला होता. यंदा नवीन गाळप हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी यंदा एकूण नवीन साखर उत्पादन 350 लाख टन होण्याचा अंदाज आहे.
त्यात महाराष्ट्रात 125 लाख टन, उत्तर प्रदेशात 110 लाख टन आणि कर्नाटकात 70 लाख टन उत्पादन होण्याचे अपेक्षित आहे.
“निर्यातीच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. गेल्या सहा वर्षापासून साखरेच्या किमान विक्री किंमतीत काहीही बदल न झाल्यामुळे आणि गेल्या तीन वर्षापासून इथेनॉल खरेदी किमती स्थिर आहेत. त्यामुळे कारखान्याचे बजेट कोलमडले. -हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ”
“महासंघाने तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. साखरेचे किमान विक्री दर हे सध्याच्या कारखाना स्तरावरील विक्री दराच्या पातळीवर निश्चित करणे, साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ करणे आणि या इथेनॉलच्या कोट्यामध्ये वाढ करणे. -प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, महासंघ”
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |