Sugarcane Crushing 2025 कोल्हापूर: यंदा आगामी साखर हंगामात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उसाचे बंपर पीक झाले असून, साखर कारखान्याच्या अंदाजानुसार किमान 40 लाख टन उसाचे उत्पादन वाढणार आहे.

Sugarcane Crushing 2025 यामध्ये सांगली जिल्ह्यातच 30 लाख टन ऊस उत्पादन होणार असून, 1 कोटी 7 लाख टनापेक्षा अधिक ऊस गाळपासाठी येणार आहे. मागील हंगामात उसाचे उत्पादन कमालीचे घटले होते.
टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर!!
Sugarcane Crushing 2025 सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, मध्यंतरी जोरदार पाऊस कोसळला आणि नेमके ऊसाची वाढ होणार त्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अधिवृष्टी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे गणित हंगामातील बिघडले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जिमतेम 1 कोटी 25 लाख 36 हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी 77 लाख 38 हजार टनचे गाळप केले.
Sugarcane Crushing 2025 दोन्ही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारी, मार्च महिन्यातच संपला होता. यांना मात्र, उसाचे चांगले उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. किमान 2 कोटी 42 लाख 56 हजार टणापर्यंत ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.
Sugarcane Crushing 2025 सांगलीत अडसाल अधिक
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार 341 हेक्टर पैकी केवळ 26,378 हेक्टर ऊस आहे. तर 85 हजार 792 हेक्टर खोडवा क्षेत्र आहे. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात 1 लाख 38 हजार 904 हेक्टर पैकी 44 हजार 214 हेक्टर अडसाल तर 53 हजार 434 हेक्टर खोडवा पीक आहे. अडसालचे क्षेत्र वाढल्याने सांगलीमध्ये तुलनेत उत्पादन वाढणार आहे.
Sugarcane Crushing 2025 दूधगंगा गळतीचा परिणाम
दूधगंगा धरणाच्या गळतीचे कारण पुढे करत दूधगंगा व वेदगंगा काठावर उसाचे क्षेत्र कमी करण्याचे आवाहन शासनाने केले होते. परिणामी मागील हंगामातील उसाचे उत्पादन घटले होते.

“गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून विशेषता सांगलीमध्ये आडसाली लागण वाढली आहे. त्यात सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. पाऊस असाच राहिला तर उत्पादनात किमान 20 टक्के वाढ होऊ शकते. -विजय अवताडे, साखर उद्योग अभ्यासक”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |