Soybean Production 2025 भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत तेलबियांचा वाटा 7 टक्के आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीत पीक असून तेलबियांमध्ये ते सध्या क्रमांक 1 वर आहे. सोयाबीन मध्ये 18-20 टक्के तेलाचे व 38-40 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर 50 टक्के प्रथिनांची व 30 टक्के तेलाची गरज सोयाबीन पिकामुळे भागवले जाते.

Soybean Production 2025 सोयाबीनचे उत्पादनक्षमता जरी 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर असली तरी आपल्या भागात सरासरी उत्पादन हेक्टरी 12-15 च्या आसपास येते.
सततच्या पावसामुळे कापूस पिकावर ‘मर’ रोगाची शक्यता; त्यासाठीचे उपाय!!
Soybean Production 2025 उत्पादन कमी असण्याची प्रमुख कारणे
- आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा तंत्राचा अवलंब न करणे.
- उन्नत जातींचा वापर न करणे.
- दर हेक्टरी झाडांची संख्या योग्य न राखणे.
- बीज प्रक्रिया न करणे उगवण शक्तीची तपासणी न करणे.
- योग्य खतांचा मात्रांचा शिफारशीनुसार वापर न करणे.
- तण तसेच किडींचा व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे.
- आंतरपीक पद्धतीचा वापर न करणे.

सोयाबीन बियाणे पेरणीच्या वेळी घ्यावयाची काळजी:
Soybean Production 2025 सोयाबीन बियाणे बाजारातील किंवा घरचे बियाणे पेरणी करण्याआधी शेतकरी बंधूंनी खालील बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरून बियांवरील खर्चाचा अपव्यय होणार नाही व त्यापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होईल. जमिनीत ओल नसणे, बियाणे जास्त खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी, पेरणीनंतर पावसाचा खंड, योग्य निचरा न होणारी जमीन, इत्यादी. कारणांमुळे बियाण्याची उगवण कमी होऊ शकते.
पेरणीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून जमीन पेरणीयोग्य करावी. जमिनीची योग्य मशागत न केल्यास योग्य उगवण शक्ती असलेल्या बियाणाचीसुद्धा बियाणे जास्त खोल पडल्यामुळे बियाणांवर ढेकळे पडून ती दबल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होऊ शकते.
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने त्याचे सर्वच वाण सरळ आहे. त्यामुळे बियाणे बदलाची आवश्यकता नाही.
ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, शेतकरी समूह इत्यादी कार्यक्रमांतर्गत उत्पादित बियाणांचा वापर शक्य.

प्रमाणित बियाणांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करून निवड करावी.
पेरणी करता आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी तसेच बियाण्याची पिशवी व पिशवीवरील टॅग जपून ठेवावी.
साधारणता 75 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणी योग्य असतानाच बियाण्यांची पेरणी करावी.
पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकाचे बीजप्रक्रिया आवश्य करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास 3 ग्रॅम थायरम, अथवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेडिझम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात लावावे. जिवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम स्फुरद विरघळवणारे पीएसबी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणास लावावे.
पेरणी करता शिफारशीत बियाणे मात्रा वापरावी. शिफारशी पेक्षा कमी बियाणे कदापही वापरू नये. एकरी 30 किलो व हेक्टरी 75 किलो बियाण्यांचा वापर करावा. प्रति हेक्टरी बियाणे वापराचा दर कमी करण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करावा.
बियाणे उगवणक्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिक बियाणे वापरावे.
बियाणाची पेरणी पुरेशा ओलीवर आणि 3-4 सेमी खोलीपर्यंत करावी.
पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होईपर्यंत पेरणी करू नये पेरणीनंतर पाऊस न आल्यास पाणी द्यावे.
पेरणीसाठी रुंद बापा सरी पद्धत बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा.
सोयाबीन पिकांमध्ये शिफारसीनुसार अंतरपिकाचा समावेश करावा.

बियाणे उगवणक्षमतेची घरगुती चाचणी
- वर्तमानपत्राच्या एका कागदाला चार घड्याळ पाडून तो पूर्ण कागद पाण्यात ओला करावा.
- प्रत्येक 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमान पत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी.
- अशा रीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार करावेत. नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत 4 दिवस तशाच ठेवाव्यात.
- चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात.
- त्या जर 70 असतील तर बियांची उगमक्षमता 70% आहे असे समजले जाते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |