Soybean Cultivation 2025 सोयाबीन हे राज्यातील सर्व भारतातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातही सोयाबीनने घट्ट पाय रोवले आहे. राज्यात 2018 मधील खरीप हंगामात 36.39 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती, सोयाबीन पिकास बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे त्यास चांगला भाव मिळतो.

Soybean Cultivation 2025 सोयाबीन लागवडीची कारणे
लागवडीसाठी कमी खर्चाचे असल्याने अधिक लोकप्रिय आहे.
तुरी पेक्षा कमी दिवसात येणारे व खात्रीचे उत्पन्न देणारे डाळवर्गीय पीक असल्यामुळे विशेष वाव आहे.
तूर, कपाशी, ज्वारी इ. कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून घेण्यास वाव.
मिरची व भेंडीवरील रोग व्यवस्थापन!!
खात्रीशीर उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी या पिकाला मोठ्या प्रमाणावर मान्यता दिली आहे.
कमी दिवसात येणारे असल्यामुळे सोयाबीन नंतर हरभरा, करडी इ. सारखे पुन्हा पीक घेता येते.
सोयाबीन वरील प्रक्रिया उद्योगामुळे देखील हे पीक लोकप्रिय आहे.

Soybean Cultivation 2025 सोयाबीन पीक घेताना घ्यावयाची काळजी
सोयाबीन पिकाला मध्यम काळी पोयट्याची आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे.
किमान 70 टक्के उगवण क्षमता असल्याने बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होऊन बियाणाची उगवण क्षमता टिकून राहण्यासाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिर करण्यासाठी रायझोबियम 250 ग्रॅम आणि पी एस बी जिवाणू 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे.

सलग सोयाबीन पीक न घेता तूर ज्वारी यासारखे अंतरपीक घ्यावे सोयाबीन आणि तूर 3:1 या प्रमाणात आंतरपीक घ्यावे.
सोयाबीन पिकास हेक्टरी 50 किलो नत्र 75 किलोस्कर आणि 45 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
पिकाला फांद्या फुटताना फुलोऱ्यात असताना पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
बियाणे 4 सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.
सोयाबीन कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनेचा वापर करावा.
नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी पेरणीपासून 50 ते 70 दिवसांनी 2 टक्के युरियाचे फवारणी करावी.
दर 2 ते 3 वर्षांनी पिकाची फेरपालट करावी.
Soybean Cultivation 2025 एकात्मिक कीड व्यवस्थापन
जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे मागील हंगामातील किडींचा सूर्याच्या उष्णतेमुळे नाश होतो.
दर्जेदार बियाणांचा वापर करावा.
विकास वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी.
सोयाबीन पिकास सभावताली एरंडी आणि सूर्यफूल वाढवणे.
पिकांच्या फेरफॉलिटीकरिता तृणधान्य अथवा गळत धान्याचा वापर करावा.
हेक्टरी पाच ते सहा कामगंध सापळे लावणे.
वाळलेले पाणी आणि खांद्या संपूर्ण झाडासह नष्ट करावे.
कीड नियंत्रणासाठी एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणी करता अलटून-पालटून वापर करावा.
नियमित पिकांचे सर्वेक्षण करावे.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |