सोयाबीन मधील किडींची ओळख व एकात्मिक कीड व्यवस्थापन!! Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 सोयाबीन हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलबिया वर्गीय पीक आहे. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 सोयाबीन उत्पादनात कीड व रोगांचा बराचसा परिणाम दिसून येतो. व त्यामुळे अपेक्षित उत्पन्न घेण्यात मोठा अडसर येतो. पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी किडींची ओळख प्रामुख्याने महत्त्वाची ठरते.

आले लागवड!! Planting Ginger 2025

सोयाबीनवरील महत्त्वाच्या किडी:

तंबाखू वरील पाने खाणारी अळी-

Soybean Crop 2025 या किडीची मादी समूहाने एकाच वेळी पानावरती अंडी घालते. अंडी पांढरट फिक्कट पिवळसर तंतुमय केसांनी आच्छादलेली असतात. अळी अवस्था ही 3 ते 4.5 सेमी वाढून हिरवट तपकिरी रंगाची होते. अळीच्या शरीरावर दोन फिक्कट रंगाचे पट्टे असतात. त्यावर काळे त्रिकोणी ठिपके असतात.

WhatsApp Group Join Now

लहान अळ्या सुरुवातीला रात्रीच्या वेळी समूहाने पाने खातात व पाण्याची चाळणी करतात. आणि मोठ्या झाल्यावर पाने, कोवळे शेंडे, फुले, तसेच वाढणाऱ्या शेंगा खातात. अळ्या जमिनीत जाऊ कोष अवस्था पूर्ण करतात. ही कीड तिचा जीवनक्रम 30 ते 40 दिवसात पूर्ण करते.

केसाळ अळी-

Soybean Crop 2025 या अळीची अंडी सुद्धा पिवळसर रंगाची असतात व समूहाने घातले जातात. अळीच्या अंगावर दाट तपकिरी केस असतात. अळीची लांबी 3 ते 6 cm असते. लहान अवस्थेतील सुरुवातीला पानाच्या खाली राहून पानातील हिरवा भाग हरितद्रव्य खरवडून खातात. अशा अळ्यांच्या सोयाबीनची पाने जाळीदार होतात. व शेंगांचे 60 ते 75 टक्के पर्यंत नुकसान होते. अळीचा पतंग पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो, कोशावस्था ही जमिनीत असते. ही कीड तिचा जीवनक्रम 44 ते 53 दिवसात पूर्ण करते.

उंट अळी-

सोयाबीनच्या शेतामध्ये पाठीला बाक काढून चालणाऱ्या म्हणजे उंट अळी होय. अळ्या हिरव्या रंगाच्या असतात. सुरुवातीला लहान अळ्या पानाच्या खालची बाजू खरवडून खातात. पानावर वेडेवाकडे चट्टे तयार होतात. पानाची जाळी तयार होऊन पानाच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. जास्त प्रादुर्भावामध्ये अळ्या फुलकळी, फुले व शेंगा खातात. अळी तिची कोषावस्था पानाखाली केसांच्या आच्छादनात पूर्ण करते.

WhatsApp Group Join Now

चक्री भुंगे-

Soybean Crop 2025 अळ्या पिवळसर रंगाच्या असून त्यांच्या शरीराच्या खालच्या भागावर फुगीर ग्रंथी असतात. प्रौढ भुंगरे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी खाचा तयार करतात. अश्या खाचा तयार केल्यामुळे पिकांचा सुरळीत असलेला अन्नपुरवठा खंडित होऊन वरील भाग सुकून वाळून जातो. अळ्या देठ, फांदी व मुख्य खोड पोखरून जमिनीत शिरतात. प्रौढ भुंगरे गर्द भुरकट काळया रंगामुळे सहजरित्या ओळखता येतात.

खोडमाशी-

पहिल्या प्रकारची खोडमाशी पेरणी नंतर 30 दिवसानंतर उपद्रव करते. तर दुसऱ्या प्रकारची खोडमाशी हि पीक पकव होण्याच्या काळापर्यंत उपद्रव करते. प्रौढ माशी खोडावर गोलाकार अंडी घालतात. अळी पिवळसर रंगाची असते. अळी पाने व देठ पोखरून खोडापर्यंत पोहचून पिकास नुकसान करते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सुरवातीला कोमेजतात व नंतर वळतात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात 20 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

एकात्मिक कीड वेव्यस्थापन: Soybean Crop 2025

शिफारस केलेल्या योग्य वाणांची निवड करावी.

पेरणीत योग्य अंतर ठेवावे.

पेरणी जुलै च्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत करावी.

पिकाची योग्य मशागत करून पीक तनविहरित ठेवावे.

स्पोडोपेक्ट्रा अळीच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी स्पोडोलूरचा वापर करावा त्यासाठी शेतात हेक्टरी 5 या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत व अडकलेले पतंग नष्ट करावेत.

स्पोडोपेक्ट्रा नियंत्रणासाठी एस.एल.एन.पी.व्ही. विषाणू आधारित द्रावणाची 250 एल.इ. 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.

केसाळ अळीने घातलेली अंडीपूंज वेचून नष्ट करावी.

केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकात एरंडी किंवा सूर्यफूल या सापळा पिकाची लागवड करावी.

उंट अळीच्या नियंत्रणासाठी नुमेरिया रेलीय या बुरशीजन्य द्रावणाची फवारणी करावी.

1 किलो न्यूमरिया रेलीय 500 पाण्यात मिसळून त्यात 1 किलो गुळाचे द्रावण टाकावे व फवारणी करावी.

5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

चक्रीभुंगाग्रस्त झाडे उपटून नष्ट करावेत.

चक्रीभुंगा यासाठी 10 टक्के दाणेदार फोरेट 10 किलो जमिनीत मिसळावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment