सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन भाग 2: सुधारित वाणांची निवड, लागवड, तन नियंत्रण, काढणी, मळणी व साठवणूक!! Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 बियाणांची उगवणशक्ती तपासणे : पेरणीसाठी वापरावयाच्या सोयाबीनच्या बियाणाची उगवण शक्ती 70 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक असते. सोयाबीनच्या बियाणांची उगवण शक्ती साठवणुकीत फार झपाट्याने कमी होते. म्हणून पेरणीपूर्वी 1 आठवडा बियाणांची उगवण शक्ती तपासून पहावी त्यासाठी एका कुंडीत किंवा वाफ्यात चांगली माती भरून त्यात 100 बियांचे दाणे उथळ पेरावेत व पाणी देऊन 5 ते 7 दिवसात किती रोपे उगवतात. याची पाहणी करावी जर बियाणांची उगवण शक्ती 70 टक्के होऊन जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

Soybean Crop 2025

WhatsApp Group Join Now

बियाणांचे प्रमाण:

70 टक्के पेक्षा जास्त उगवण शक्ती असणारे सोयाबीनचे बियाणे 65 ते 70 किलो प्रति हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी वापरावे.

सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन भाग 1: सुधारित वाणांची निवड, लागवड, तन नियंत्रण, काढणी, मळणी व साठवणूक!!

Soybean Crop 2025 बीजप्रक्रिया:

बुरशीजन्य रोगापासून संरक्षण तसेच उगवण अधिक होण्यासाठी प्रत्येक किलो बियाण्यास 3 ग्राम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बोडिसन किंवा 1.5 ग्राम + 1.5 ग्रॅम कार्बोडिसन चोळावे. पेरणीपूर्वी 5 ग्रॅम रायझोबियम जिवाणू खत व 5 ग्राम स्फुरद विरघळणारे जिवाणू खत प्रति किलो यांची बियाणास प्रक्रिया करावी.

WhatsApp Group Join Now

त्यासाठी वरील जिवाणू खते 1 लिटर पाण्यात मिसळून त्याचे गाढ द्रावण तयार करावे 1 हेक्टर साठी लागणाऱ्या 65 ते 70 किलो बियाणास हे हलक्या हाताने लावावे थोडा वेळ सावलीत वाढल्यानंतर ताबडतोब पेरणी करावी हे जिवाणू खत अनुजीवशास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय पुणे 5 नाफेड कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठे यांच्याकडे मिळते.

Soybean Crop 2025 खत व्यवस्थापन:

सोयाबीनच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 20 किलो नत्र 6 ते 80 किलो स्फुरद 20 किलो पालाश आणि 30 किलो गंधक या रासायनिक खतांची शिफारस केलेली मात्रा द्यावी. त्याचप्रमाणे हेक्टरी 25 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो बोरॅक्स द्यावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, कॅल्शियम, बोरॉन, लोह, जस्त व मॅग्नीज ही अन्नद्रव्य वाढीसाठी फुलधारणासाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यकता असतात.

Soybean Crop 2025 पेरणी:

खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर 15 जून ते 15 जुलै पर्यंत वाफशावर पेरणी करावी 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणी पभरणीने 2 ओळी 30 ते 45 सेमी व 2 झाडांमध्ये 5 ते 7 सेमी अंतर राहिल अशा प्रकारे करावी. बियाणे 2.5 ते 3 सेमी खोलीपर्यंतच पेरावे हेक्टरी झाडांची संख्या 4 ते 5 लाख असावी. टोकन पद्धतीने पेरणी करावयाचे असल्यास सरी वरंबावर दोन्ही बाजूस 10 सेमी अंतरावर सरीवर त्रिकोणी आकारात करावी.

Soybean Crop 2025 तण व्यवस्थापन:

सोयाबीन पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पावसाळी पीक आहे. त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांसोबतच आवश्यक्य नसणारे इतर पिके व त्यांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनचे उगवण झाल्यापासून पिकाची कापणी होईपर्यंत तण पिकाला अपायकारक असते.

पिकामध्ये वाढणारे तन सोयाबीनचे पोषण अन्नद्रव्ये पाणी वाढीसाठी आवश्यक ते जागा सूर्यप्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते त्याचा परिणाम कमी उत्पादन देण्यात होतो. तणामुळे सोयाबीन पिकांमध्ये किडी व रोगांचे प्रमाण वाढवून त्यांचे नियंत्रण व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊन उत्पादन खर्च वाढतो.

काढणीच्या वेळी वाढलेल्या तणामुळे अडथळा निर्माण होतो तसेच त्यांचे बियांसोबत मिसळले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या बियाणाची गुणवत्ता कमी होते. सोयाबीन पिकांमध्ये येणाऱ्या तणाचे योग्य वेळी नियंत्रण केल्यास उत्पादनात सरासरी 30 ते 40 टक्के पर्यंत घट येऊ शकते, त्यामुळे सोयाबीनचे पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या 20 ते 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते.

सोयाबीन पिकामध्ये हराळी, लव्हाळ, चिमणचारा, केणा आणि पिवळी तिळवण इ. एलदल वर्गीय तर गाजर, गवत, हजारदानी, एकदांडी, रेशीमकाटा, तांदूळजा, पाथरी, दुधी इ. द्विदलवर्गीय तने आढळतात. सोयाबीन मधील तण नियंत्रणासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरते:

मनुष्यबळ वापरून खुरपणी किंवा कोळपणी करणे:

सोयाबीन पीक रोप अवस्थेमध्ये असताना त्याची वाढ सावकाश होत असते. यावेळी तणांचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांची वाढ खुंटते व पीक अपेक्षेप्रमाणे निरोगी सुधृद येत नाही. पिक फुलोर्यापर्यंत तन विहिरीत ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते त्यासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी करावी. किंवा पिकातील तण उपटून त्याचे पिकांमध्येच अच्छादन करावे किंवा खुरपणीसाठी मजुरांची कमतरता असल्यास तणांचा प्रादुर्भाव पाहून 40 ते 45 दिवसापर्यंत कुळवाच्या दोन पाळ्या बैल किंवा सायकल कोळप्याच्या सहाय्याने घालाव्यात.

Soybean Crop 2025 आंतरपीक पद्धती:

सोयाबीन पिकासोबत आंतरपीक म्हणून इतर पिके घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो त्याचबरोबर एखादे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे गेल्यास आंतर पिकापासून खात्रीशीर उत्पादनाची हमी राहते. संशोधनाद्वारे काही उपयुक्त व फायदेशीर सोयाबीन अंतरपीक पद्धती आढळून आल्या आहेत. जसे सोयाबीन + तूर 4:2, 3:1 सोयाबीन + कापूस सोयाबीन + सोयाबीन + ज्वारी

Soybean Crop 2025 काढणी:

पानांचा रंग पिवळा होऊन पाने गळाल्यास 80 ते 90% शेंगा पक्व झाल्यानंतर व बियातील आद्रतेचे प्रमाण साधारणतः 14 ते 16 टक्क्यांनी दरम्यान असेल तेव्हा सोयाबीनची काढणी करणे आवश्यक असते. पक्व झालेल्या पिकाच्या काढणीस जास्त उशीर झाल्यास शेंगा फुटून बिया शेतातच गळून पडतात. व नुकसान होते पीक पकवा अवस्थेत असताना शेंगा फुटल्याने होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी शेंगा फुटण्यास प्रतिबंधक असणाऱ्या वाणांचीच लागवडीसाठी निवड करावी.

पिकाची कापणी धारदार वेळाच्या सहाय्याने जमिनीलगत करावी जेणेकरून शेतात शेंगा राहणार नाहीत कापणी करताना झाडे उपटून येणार नाहीत. याची काळजी घ्यावी अन्यथा बियाणात मातीचे खड्डे मिसळू शकतात. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे.

ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पैशाची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी ही यंत्रद्वारे करणे योग्य ठरते. अशावेळी कापणीचे पाते जमिनीच्या वर 8 ते 10 सेंटिमीटर राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील याची काळजी घ्यावी.

Soybean Crop 2025 मळणी:

सोयाबीनची मळणी काठी किंवा मोगरीने बुडवून ट्रॅक्टरच्या चाकाखाली मिळून आणि मळणी यंत्राद्वारे करता येते मळणी यंत्राने मळणी करावयाची असल्यास बियाणातील आद्रता 14% पेक्षा कमी नसावी तसेच मळणी यंत्राचे फेरे मिनिटाला 350 ते 400 पर्यंत मर्यादित ठेवावे. मळणी यंत्र चालू असताना अधून मधून पोत्यांमध्ये पडणाऱ्या बियांकडे लक्ष ठेवून बियांची डाळ होण्याची प्रमाण जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यास, आरपीएम कमी करावेत वरील सर्व पद्धतीने द्वारे मळणी करत असताना, जर एकापेक्षा जास्त सोयाबीन वाण असतील तर त्यांचे बियाणे स्वतंत्रपणे मळणी करणेच फायदेशीर ठरते.

हाताळणी व साठवणूक:

मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्री वर एक सारखे पसरवून बियाण्यातली आद्रता 10 ते 12 टक्के होईपर्यंत उन्हात वाढवावे वाळलेल्या बियाण्यातील शेंगा फुलफडे, काड्या, कचरा, माती, खडे इ. काढून ते स्वच्छ करावेत सारख्या आकाराचे बियाणे मिळण्यासाठी लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चळण्यांचा वापर करावा.

बियाणे हाताळताना विशेषतः बीज प्रक्रिया केंद्रात ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ कीड विहिरीत किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवण करावयाच्या बियाण्याची आद्रता 8 ते 10 टक्के असावी.

बियाणातील आद्रता 6% पेक्षा कमी झाल्यास उगवण शक्तीवर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे. सोयाबीनचे बियाणे हवेतील आद्रता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी व उन्हाळ्यात बियाणे साठवण केलेल्या खोलीतील तापमान 42 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असू नये.

बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना 4 पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठे थप्पी लावू नये, अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाणांवर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्यांची उगवणशक्ती कमी होते.

पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 सेमी उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी पोत्यांची रचना उभी आडव्या पद्धतीने करावी. म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोली मध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा.

Soybean Crop 2025 उत्पादन:

सोयाबीन पिकाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केल्यास हेक्टरी 28 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment