Soyabean Market 2025 सांगली: राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले आहेत.

Soyabean Market 2025 त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सांगली मार्केट यार्डात सोमवारी निघालेल्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल 4 हजार 500 रुपये दर मिळाला आहे.
रब्बी पिकातील खत व्यवस्थापन!!
Soyabean Market 2025 सोयाबीनचा 2025-26 या आर्थिक वर्षात हमीभाव प्रतिक्विंटल 5 हजार 328 रुपये आहे. हमीभावापर्यंतही सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होता.

Soyabean Market 2025 यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घेतले आहे. याचाच परिणाम म्हणून कि काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे.
उच्च प्रतीचे म्हणजे बियाणासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीनचे दर दोनच दिवसात डिड हजारांनी वाढले असून, मिल क्वालिटी सोयाबीनही 4.5 हजारांपर्यंत पोहचले आहेत.
सांगली बाजार समितीत दोन दिवसापूर्वी सोयाबीनला 4 हजार 250 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता, तर याच बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला.
तथापि, दराचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असा सल्लाही त्यांच्याकडून दिला जात आहे.
सोयाबीनच्या दरात तेजीची कारणे: Soyabean Market 2025
सध्य:स्थितीत सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीत वाढ करण्यात अली आहे.
दुसरीकडे यंदा खरिपात सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे.
त्यातच नाफेडची सोयाबीन खरेदी आता सुरु झाली आहे. त्यामुळे दाराला आधार मिळत आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |