सोयाबीन पिकाची सुधारित पेरणी व लागवड पद्धती!! Soyabean Crop 2025

Soyabean Crop 2025 सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. हल्ली वाणांची लागवड शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन हे एक पीक खर्चात जास्त उत्पन्न देणारे महत्त्वाचे पीक झाले आहे. मुख्य पीक असल्याने शेतकरी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन पद्धतींचा अवलंब करत असताना खर्च व वास्तविकता यांचा विचार करत नाहीत व त्यामुळे उत्पादन म्हणजेच उत्पन्न कमी होते.

Soyabean Crop 2025

Soyabean Crop 2025 त्यामध्ये प्रामुख्याने लागवडीचे अंतर वान निवड व वाणांच्या गुणांनुसार जमिनीचा प्रकार आणि लागवडीची पेरणी पद्धत व पेरणीचे अंतर या सर्व गोष्टींचा एकेरी सरासरी झाडांची संख्या यावर खूप मोठा परिणाम होतो व त्याचा पीक चांगले येऊन सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो. यामध्ये खूप मोठ्या चुका शेतकरी मित्रांकडून होतात व त्यामुळे शेतकरी मित्रांचे उत्पादन कमी होते.

सेंद्रिय विचार-भूसेंद्रिय पदार्थ!!

सोयाबीन पीक लागवडीचे अंतर व उत्पादनाचे गणित:

Soyabean Crop 2025 कोणत्याही पिकाचे उत्पादन एक त्यांच्या एकेरी झाडांची संख्या व लागवड पद्धत यावर अवलंबून असते. सोयाबीन पिकाचे जर आपल्याला चांगले उत्पादन घ्यावयाचे असेल तर एकेरी सरासरी झाडांची संख्या राखणे आवश्यक आहे फुले संगम किंवा इतर वाढणारे वाण असतील तर कमीत कमी 80 ते 90 हजार असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

Soyabean Crop 2025 शेतकऱ्याने लागवड केलेली असते त्यामध्ये झाडांची संख्या 44 हजार राहते आणि त्यामुळे सोयाबीन चांगले येऊन सुद्धा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. व शेतकरी नाराज होतो परंतु याचे नेमके कारण बघणे आवश्यक आहे.

ते म्हणजे एकेरी असलेली झाडांची संख्या उदा. 45*10 से.मी. वर लागवड केली तर (जास्त वाढणारे व उशिरा येणाऱ्या वाणांसाठी) एकेरी 88 हजार झाडे बसतात आपण 80 हजार पकडून एका झाडाला सरासरी 100 शेंगा लागल्या तर 200 ते 250 दाणे म्हणजे सरासरी 25 ते 30 ग्रॅम सोयाबीन प्रती झाड तर एकूण झाडांची संख्या 80 हजार म्हणजेच 80,000*25 ग्रॅम=20 क्विंटल.

Soyabean Crop 2025 शिफारसीनुसार अंतर ठेऊन लागवड करावी

  • हलकी जमीन असेल तर 30*10 सेंटीमीटर किंवा 38*10 सेंटीमीटर
  • भारी जमीन असेल तर 45*7-10 सेंटीमीटर पेरणी किंवा बेवर लागवड किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी.

लागवड करण्यासाठी दोन ओळीतील अंतर जास्तीत जास्त 45 ते 50 सेंटीमीटर ठेवावे त्यापेक्षा जास्त अंतर ठेवू नये तसेच फुले संगम किंवा फुले किमया या वाणांची लागवड करत असेल, तर दोन ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवणे आवश्यक आहे. परंतु फुले संगम किंवा किमया यांची पेरणी दाट होणार नाही याची काळजी घ्यावी.

WhatsApp Group Join Now

Soyabean Crop 2025 पेरणी करताना जर आपली जमीन हलकी व मध्यम असेल तर लवकर येणारे वाण निवडावे तसेच 38* 7-10 सेंटीमीटर याप्रमाणे पेरणी करावे नवीन पद्धती यांचा अवलंब नक्कीच करावा परंतु त्यांची वास्तविकता बघणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही वाणाला कशा प्रकारची जमीन व किती अंतर ठेवावे लागते हे बघूनच लागवड करावी, जेणेकरून आपले नुकसान होणार नाही.

सोयाबीन शेतीमध्ये होणारे बदल व बदललेली शेती पद्धती यांचा अभ्यास केल्यास वेगवेगळ्या लागवड पद्धती आपण वापरू शकतो:

1. पेरणी पद्धत: Soyabean Crop 2025

जमिनीचा प्रकार व वाण या दोन्ही गोष्टी लक्षात घेता जर लवकर येणारे वाण असेल आणि आपली जमीन हलकी मध्यम असेल तर पेरणी पद्धतीने आपण सोयाबीन पीक घेऊ शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र, किंवा बैल चलित पेरणी यंत्र वापरले जाते. त्यांचे अंतर 30*10 सेंटीमीटर 38*7-10 सेंटीमीटर असे ठेवावे, भारी जमिनीत आपण मध्यम ते उशिरा येणारा वाण घेणारा असेल तर 45*10 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी करावे.

2. रुंद सरी वरंबा पद्धत:

  • जास्त पाऊस होण्याची संभाव्य शक्यता असल्यास तसेच आपल्या जमिनीत पाणी साचून राहत असेल, तर सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्राने करावी किंवा दर तीन-चार ओळी नंतर एक चर काढावा.
  • बी बी एफ पद्धतीमुळे पावसाचे पाणी साऱ्यांमध्ये मुरते त्यामुळे मूळस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते.
  • अधिक पाणी झाल्यास किंवा अधिकचे पाणी निचरा होण्यास मदत होते.
  • गादीवाफे किंवा वरंबा यावर हवा खेळती राहून पाणी व हवा योग्य प्रमाणात झाडाला उपलब्ध होते.
  • बियाणाची उगवण चांगली होते व पीक वाढ सुद्धा चांगली जोमदार राहते.
  • ओरडवाहू तसेच बागायती दोन्ही साठी आपण ही पद्धत वापरू शकतो.
  • या पद्धतीने आपण आवश्यक ते अंतराचे वाफे वरंबे तसेच दोन्ही बाजूंनी सऱ्या तयार करू शकतो, त्यामुळे पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात.
  • बीबीएफ तंत्राने पाच ते सहा हेक्टर क्षेत्र प्रतिदिन आपण पेरू शकतो.
  • बीबीएफ या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के पर्यंत उत्पादन वाढ होते.

3. सरी वरंबा पद्धत: Soyabean Crop 2025

  • नव्याने वापरण्यात येणाऱ्या सरीवरंबा पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड होत आहे.
  • यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो किंवा शेतामध्ये पाणी साचून राहते किंवा शेत पाणी धरते अशा परिस्थितीत ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते.
  • खोलगट तसेच झोपण भागात असलेल्या शेतात आपण ही पद्धत वापरल्यास आपल्याला होणारे नुकसान टाळता येते.
  • यामध्ये आपण 3 फूट 3.5 फूट आणि 4.5 फूट अशी सरी काढून त्यावर लागवड करू शकतो.
  • 3 फूट सरी पडल्यास आपण सरीच्या दोन्ही बाजूंनी लागवड करू शकतो म्हणजे दोन ओळीतील अंतर दीड फूट इतके राहते.
  • जर 4.5 फूट सरी सोडली तर आपल्याला सरीच्या उंच भागाला सपाट करून त्यावर तीन तास लागवड करू शकतो.
  • अशा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते व जास्त पाऊस झाल्यास होणारे संभाव्य नुकसान टाळता येतील.
  • आपल्याला जर बेडवर लागवड करायची असेल तर आपल्याकडे सिंचन व्यवस्था असणे आवश्यक्य आहे ड्रिप किंवा इतर पद्धतीने पाणी व्यवस्थापन करता येईल तरच बेडवर लागवड करावी.
  • महागडे बियाणे आणि पावसाचे अनिश्चितता यांचा विचार केला तर लागवड केली तर 30-40 टक्के बियाणे कमी लागते व झाडांची संख्या व्यवस्थित राखली जाते.
  • लागवडीसाठी आपण मनुष्यचलित यंत्राचा वापर करू शकतो हे यंत्र वापरताना सपाट जमिनीवर आपण लागवड करू शकतो या यंत्राच्या सहाय्याने लागवड केल्यास बियाणाची 30 ते 40 टक्के बचत होते व पिकाची उगवण चांगली होऊन एकसमान वाढ होते.
  • वरील प्रमाणे सर्व गोष्टी सोयाबीन लागवड पेरणी करत असताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व त्यानुसार नियोजन करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment