Soyabean Crop 2025 खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आला असून मूर्तीजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही तूर व कापूस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

कृषी विभागाने शेती शाळा आणि जनजागृती मोहिमा राबवून शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला दिल्याने उत्पादकतेत वाढ होण्याची शक्यता आहे. मूर्तिजापूर तालुक्यात २०२५-२६ या खरीप हंगामात पुन्हा एकदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.
आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या ‘या’ भागात वळीव बरसणार;
तुरीला दुसरे तर कापसाला तिसरे प्राधान्य दिले जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थेट संवाद साधून मार्गदर्शन सुरू केले आहे.

Soyabean Crop 2025 तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 80,532 हेक्टर असून, त्यापैकी खरीप हंगामासाठी 68,888 हेक्टर क्षेत्र राखीव आहे.
रब्बी हंगामासाठी हेक्टर आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ हेक्टर क्षेत्र वापरले जाते. खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद आणि ज्वारी ही पिके घेतली जातात.
तालुक्यातील एकूण 40,907 शेतकऱ्यांपैकी 34,770 अल्प व अत्यल्प भूधारक असून केवळ शेतकरी हे बहु भूधारक आहेत.
Soyabean Crop 2025 कृषी विभागाचे मार्गदर्शन
कृषी विभागामार्फत स्थानिक पातळीवर शेती शाळा व इतर जनजागृती कार्यक्रम राबविले जात असून शेतकऱ्यांना योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, खत व कीड नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आगामी हंगामात अधिक उत्पादन मिळवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Soyabean Crop 2025 पाच वर्षातील खरीप पिकांचे नियोजन (हेक्टरमध्ये)
वर्ष | सोयाबीन | तूर | कापूस | मूग | उडीद | भाजीपाला |
2021-22 | 46,202 | 10,852 | 6,691 | 3,721 | 1,250 | – |
2022-23 | 50,647 | 10,674 | 7,424 | 400 | 290 | – |
2023-24 | 49,037 | 11,650 | 7,000 | 571 | 250 | 237.4 |
2024-25 | 48,057 | 11,157 | – | 250 | 300 | 7,500 |
2025-26 | 48,400 | 11,157 | – | 150 | – | 7,900 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |