मोफत दिल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या बॅगेमध्ये 3 किलो बियाणे कमी; काय आहे विषय? Soyabean Biyane 2025

Soyabean Biyane 2025 अहिल्यानगर: खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टर च्या मर्यादेत 75 किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे.

Soyabean Biyane 2025

WhatsApp Group Join Now

मात्र, मोफत दिल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या प्रत्येक बॅगेमध्ये 3 किलो बियाणे कमी येत असल्याने शेतकऱ्यांना मधून नाराजी व्यक्त होत आहे.

मृग नक्षत्रात पेरणीची तयारी, कृषी विभाग देतोय सतर्कतेचा सल्ला! वाचा सविस्तर;

जिल्ह्यात कृषी विभागाला 293 क्विंटल सोयाबीन बियाणे वाटपाचे उद्दिष्ट आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरण्यासाठी कमी खर्चात व काही बियाणे मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते

WhatsApp Group Join Now

त्यात तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांची बियाणे अनुदान तत्वावर दिले जातात. तर सोयाबीनचे बियाणे मोफत दिले जाते. महाबीजकडून बियाणांचा पुरवठा केला जात आहे.

Soyabean Biyane 2025 सध्या मोफत असलेले सोयाबीन बियाणे घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरून निवड झालेल्या शेतकऱ्यांना सध्या सोयाबीन बियाण्याचे वाटप होत आहे.

एक हेक्टरसाठी 75 किलो बियाणे मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीकडून 22 किलो बियाणांची बॅग बनवली असून 3 बॅग दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रति बॅग 3 किलो प्रमाणे 9 किलो बियाणे कमी मिळत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.

शासनाच्या या धोरणावर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर कृषी विभागाने दोन तीन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे घेण्याचे आवाहन केले आहे.

Soyabean Biyane 2025 बियाण्याच्या बॅगावर क्यूआर कोड

महाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे साथी पोर्टलमधून नोंदणी केलेले आहे. बियाणांच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड आहे.

हा कोड स्कॅन केल्यानंतर बियाण्यांसाठी वापरलेले स्त्रोत बियाणे कोठून मिळाले, उत्पादन व प्रक्रिया कुठे झाले आहे, तपासणी लॅब रिपोर्ट अर्धीची माहिती मिळणार आहे, असे महाबीजचे व्यवस्थापक सुनील फिरके यांनी सांगितले.

50 टक्के अनुदानावर मिळते बियाणे

Soyabean Biyane 2025 तूर 145 रुपये प्रति किलो, मुग 140 रुपये प्रति किलो, उडीद 135 प्रति किलो दर असणार आहे. 50% अनुदानावर हे बियाणे मिळत आहेत. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी विविध वाणाचे बियाणे 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होत आहे.

महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीनच्या बियाणांसाठी मेसेज आल्यानंतर कागदपत्र घेऊन दुकानदाराकडे गेलो असता त्यांनी 22 किलोच्या तीन तीन बॅग दिल्या. परंतु नियमाप्रमाणे एक हेक्टरसाठी 75 किलो बियाणे मिळणे अपेक्षित होते. 9 किलो कमी मिळाल्याने उर्वरित बियाणे खरेदी करावे लागेल. -संदीप ढाले, शेतकरी, सोनई, ता. नेवासा”

इतर माहि तीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment