Soyabean Bajarbhav 2025 नागपूर: केंद्र सरकारने हम कच्चा सोयाबीन, सूर्यफूल व माफ तेलावरील आयात शुल्क 20 20 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून ऑक्टोबर पासून पुढे सोयाबीनचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा कमी राहणार आहे. परिणामी, सरकारच्या या निर्णयाच्या देशातील सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसणार आहे.

सरकारने 2024 मध्ये कच्चा खाद्यतेलावरील 20 टक्के, तर रिफाइंड खाद्य तेलावर 29.75 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला होता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्य तेलाच्या आयातीसाठी 27.50% तर रिफाइंड तेलासाठी 35.75 टक्के शुल्क द्यावा लागायचा.
शेतकरी, मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापरण्याचे कृषी अभ्यासकांचे आवाहन, वाचा काय आहेत फायदे!
देशात सोयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने बिहार व पश्चिम बंगाल विभाग विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 30 मे रोजी कच्चा खाद्य तेलावरील 50 टक्क्यांनी कपात केली आहे.

रिफाइंड सोयाबीन सूर्यफूल व पामतेलवरील आयात शुल्क कायम ठेवले आहे . कच्च्या खाद्य तेलाच्या आयातीला उपकारांसह 16.50% कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील खाद्यतेल उत्पादक कंपन्यांचा फायदा ठरणार असून, शेतकऱ्यांना मात्र एम एस पी पेक्षा कमी दरात सोयाबीन पिका विकावी लागणार आहे.
Soyabean Bajarbhav 2025 ऑगस्ट पासून डिलिव्हर सुरू
या सर्वाधिक कच्चा सोयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी सौदा सुरु केले असून, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तेल देशात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर 4000 ते 4300 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार शेतकऱ्यांकडे संपूर्ण सोयाबीन एम एस पी दराने खरेदी करण्याची सुतराम शक्यता नाही.
Soyabean Bajarbhav 2025 ब्राझीलचे सौदे 11 डॉलर प्रतिबुशेल
- ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे.
- मात्र तेथील, शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन 2026 साठी त्यांच्या सोयाबीनचे 11 डॉलर प्रतिबुशेल (एक बुशेल- 27.22 किलो) दराने आत्ताच सौद केले आहे.
- त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचे दर 3,458 ते 3,550 रुपये प्रतिक्विंटल असेल.
- या हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी 5,328 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |