Sorghum Cultivation 2025 ज्वारी हे कमीत कमी निविष्टांसह वेगवेगळ्या परिस्थितीत सर्व हंगामात घेता येणारे पीक आहे. सध्य परिस्थितीत तुरळक व कमी पर्जन्यमान असणाऱ्या तामिळनाडू ते उत्तरांचल पर्यंत अनेक राज्यांमध्ये ज्वारीचे पीक धान्य व कडबा मिळविण्यासाठी पेरले जाते.

भारतामध्ये ज्वारीचे पीक मुख्यतः Sorghum Cultivation 2025 महाराष्ट्र (54%) कर्नाटक (18%) राजस्थान (8%) मध्यप्रदेश (6%) आणि आंध्र प्रदेश (4%) मध्ये विधी भोगोलिक परिस्थितीत घेतले जाते.
यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली गाळप कधी सुरु होणार? ऊसाला किती दर देणार?
Sorghum Cultivation 2025 ज्वारीच्या क्षेत्रफळामध्ये मागील 40 वर्षांमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी प्रति हेक्टरी उत्पादकते मध्ये वृद्धी (70 ते 87%) झालेली आहे. राष्ट्रीय ज्वार संशोधन निर्देशालायने व AICSIP ने संशोधित केलेल्या हंगाम-निहाय व अधिक उत्पादन क्षमता असलेल्या सुधारित व संकरित वाणांमुळे तसेच सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादकतेमध्ये इतकी वाढ शक्य झाली आहे.

Sorghum Cultivation 2025 इतर पिकांसोबतच ज्वारीची स्पर्धात्मक क्षमता नवीनतम पीक लागवडीच्या माध्यमातून वाढवणे अंतर पिके व क्रमिक पिके घेणे कमी खर्चात लागवड करणे व विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून मूल्यवर्धन करणे हे अतिशय गरजेचे आहे.
रब्बी ज्वारी लागवडीकरिता सुधारित तंत्रज्ञान:
Sorghum Cultivation 2025 रब्बी ज्वारी पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये उशिरा पडणाऱ्या पावसाचे नियोजन व सुधारित लागवड तंत्रज्ञानाचे अवलंबन करणे हि महत्वाची सूत्रे आहेत.
जमिनीचा पोत व सिंचनाची उपलब्धता लक्षात घेऊन सुधारित ज्वारीच्या वाणांची निवड करण्यात अत्यंत महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र: Sorghum Cultivation 2025
| शिफारस केलेल्या सुधारित जाती | शिफारस केलेल्या संकरित जाती |
| मालदांडी सी. एच. व्ही. 14 | सी. एस. एच. 12 आर, कोरड वाहू भागासाठी |
| सी. एच. व्ही. 216 | सी. एस. एच. 19 आर, मध्यम ते भारी जमीन योग्य |
| सी. एच. व्ही. 21 | सी. एस. एच. 15 आर, बागायती भागासाठी |
| पी. के. व्ही. क्रांती | सी. एस. एच. 12 आर |
| एस. पी. व्ही. 18 | सी. एस. एच. 13 आर |
| सी. एस. व्ही. 216 | सी. एस. एच. 15 आर, मध्यम ते हलक्या जमिनीसाठी |
| फुले माऊली, फुले चित्रा | सी. एस. एच. 13 आर, कोरडवाहू |
| फुले यशोदा, फुले अनुराधा | बागायती |
| फुले वसुधा, फुले रेवती, पंचमी | हुरड्यासाठी उपयुक्त |
कर्नाटक: Sorghum Cultivation 2025
| शिफारस केलेल्या सुधारित जाती | शिफारस केलेल्या संकरित जाती |
| मालदांडी 35-1 | सी. एस. एच. 12 आर, कोरडवाहू भागासाठी |
| एस. पी. व्ही. 5 | सी. एस. एच. 13 आर, मध्यम ते भारी जमीनयोग्य |
| सी. एस. व्ही. 14 | सी. एस. एच. 15 आर, बागायती भागासाठी |
| एस. पी. व्ही. 4 | सी. एस. एच. 12 आर, ट्रान्सीसनल क्षेत्रासाठी |
| एस. पी. व्ही. 216 | सी. एस. एच. 13 आर |
जमिनीत पाणी मुरण्याचे व ओलावा टिकवण्याचे तंत्र
बांध बंदिस्ती: शेतातील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाचे पाणी अडवून जिरविण्याकरिता उथळ व मध्यम खोल जमिनीत ढाळीचे बांध टाकावेत. त्यामुळे ओलावा अधिक काळ टिकविण्यास मदत होते.
शेताचा आकार लक्षात घेऊन बांधाचे क्षेत्रफळ 3*3 मी. किंवा 4.5*4.5 मी असे ठेवावे तर बांधाची उंची 15 ते 25 सें. मी. ठेवावी.
अंतर बांध व्यवस्थापन: पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळा सुरू होताच, जमिनीत सरी वरंबे पाडून किंवा लहान सरे पाडून जमीन तयार करावी.
वरंब्याची उंची 20 सेमी आणि सऱ्यांची जाडी 45 सेमी असावी.
पावसापूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी वरंबे करण्यात यावे. त्यामुळे पावसाचे पाणी आडून ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरते व ओलाव्याची अधिक उपलब्धता होते.
उतारास आडवी मशागत: नांगरणी, वखरणी, पेरणी, फुटवणी व कोळपणी यासारखी मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावी.
कोळपणीमुळे तणांचा नाश होतो तने पिकापेक्षा दुप्पट ओलावा शोषून घेतात.
अंतर मशागतीकरता खुरपणी करणे महत्त्वाचे आहे ज्यावेळी जमीन मऊ आहे आणि तण वाढत आहे, त्यावेळी खुरपणीचा उपयोग होतो.
आच्छादनाचा वापर: पेरणीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, यासारख्या पिकाचा भुसा, धसकटे, वाढलेले गवत, गव्हाचे काड, इत्यादींचा हेक्टरी 5 ते 10 टन या प्रमाणात प्रत्येक ओळींमध्ये आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनाचा वापरामुळे बाष्पीभवन थांबवणे व तणांचा बंदोबस्त करण्याकरिता उपयोग होतो. त्यामुळे 30 ते 25 टक्के उत्पादन वाढते.
शेत तळी: शेताच्या पाणलोट क्षेत्रात शेततळे खोदून वाहून जाणारे पाणी त्यात साठविता येते. तळ्यात साठवलेले पाणी पिकास निकडीच्या अवस्थेत संरक्षक पाणी म्हणून वापरता येते. रब्बी ज्वारीस एक संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात 50 ते 60 टक्के वाढ होते.
पेरणीची योग्य वेळ: रब्बी कोरडवाहू ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलाव्यावर 5 सेमी खोल करावी. नत्र खतांची अर्धी मात्रा व संपूर्ण स्फुरद आणि पालाश खते पेरणीच्या वेळी द्यावेत. खत खाली व त्यावर बियाणे पडेल अशा रीतीने पेरणी करावी.
नत्राची उर्वरित अर्धी मात्रा एक महिन्यांनी बागायतीस ज्वारीस पाणी देण्याच्या वेळी व कोरडवाहू ज्वारीस जमिनीत ओलावा असताना द्यावी.
पाणी व्यवस्थापन: पेरणीनंतर पाणी देण्यासाठी 2.70 मीटर रुंदीचे सरे सरेयंत्रणाने पडावेत त्यामुळे बियाणे झाकणे व सऱ्या काढणे हि दोन्ही कामे एकाच वेळी होतात पाण्याच्या उपलब्धतेनुसार ज्वारीच्या महत्वाच्या अवस्थेलाच पाणी द्यावे.
तुषार सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांमध्ये व दुसरे 50 ते 55 दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीच्या उत्पादनात कोरडवाहूच्या तुलनेत 25 ते 30 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
अंतर मशागत: कोरडवाहू जमिनीत पेरणीनंतर पाऊस न आल्यास 30 ते 35 दिवसांनी 140 सेमी खोलीपर्यंत भेगा पडतात. त्यामुळे ओलावा नष्ट होतो व जमिनीच्या वरच्या 2 ते 3 सेमी थराची मशागत करणे आवश्यक आहे. त्याकरिता तीन कोळपण्या (3, 5 व 8 आठवड्याच्या अंतराने) कराव्यात. कोळपणीनंतर एक आठवड्यांणी ज्वारीची खुरपणी करून घ्यावी व पीक तणमुक्त ठेवावे.

खरीप ज्वारीची सुधारित लागवड पद्धती व पीक नियोजन
जमिनीची पूर्व मशागत उन्हाळ्यामध्ये एकदा देशी नांगराने नांगरणी व दोन ते तीन वेळा वखरणी करावी की जेणेकरून जमीन भुसभुशीत होऊन जास्त पाणी मुरण्यास मदत होईल.
पेरणीपूर्वी जमिनीमध्ये 4 ते 5 टन प्रती एकर व 4 ते 5 किलो फ्युरॉडॉन 3 जी दाणेदार कीटकनाशक मिसळावे.
बियाण्याचे प्रमाण: सात ते आठ किलो प्रति हेक्टरी (3 ते 4 किलो प्रति एकर)
झाडांमधील अंतर: पेरणी दोन ओळीत 45 से.मी. व दोन झाडांमध्ये 12 ते 15 सेमी अंतरानी करावी.
सर्व साधारणत: प्रति हेक्टर क्षेत्रात झाडांची संख्या 1,80,000 असायला हवी.
बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास 1.4 मिली इमिडाक्लोप्रिड + 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम ची बीजप्रक्रिया करावी किंवा थायमेथॉक्झाम 3.0 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरावे.
Sorghum Cultivation 2025 रासायनिक खते:
हलकी जमीन व कमी पर्जन्यमानाचे क्षेत्र: हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश वापरावे.यापैकी प्रति हेक्टरी फक्त 30 किलो नत्र संपूर्ण 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 30 किलो नत्र पेरणीनंतर 30 ते 35 दिवसानंतर जमिनीत ओलावा असताना द्यावे.
हेक्टरी 80 किलो नत्र 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश वापरावे. प्रति हेक्टरी 40 किलो नत्र संपूर्ण 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 40 किलो नत्र पेरणीनंतर 30 ते 35 दिवसानंतर जमिनीत ओलावा असताना द्यावे.
ज्वारीवरील प्रमुख किडी व नियंत्रण:
खोडमाशी:
या किडीचा प्रादुर्भाव उगवण झाल्यावर 1 ते 4 आठवड्यांपर्यंत आढळून येतो. अळी कीड वाढत्या शेंड्यास खाते, त्यामुळे मध्यभागी असलेली पाने सुकतात व पोंगे मरतात त्याला पोंगेमर असेही म्हणतात.
नियंत्रण:
पावसाची सुरुवात होताच किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी पेरणी केल्यास या किडीपासून सुटका होऊ शकते. बियाणांचे प्रमाण वाढते ठेवणे फायदेशीर असते.
7 ते 10 दिवसांच्या रोपावर सायपरमेथ्रीन 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास नुकसान टाळता येते.
याशिवाय दाणेदार 3 जी फ्युराडॉन किंवा 10 जी फोरेट पेरणीसोबत किंवा पेरणीपूर्वी 8 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळल्यास हि कीड नियंत्रणात येते.
खोड किडा:
या किडीचा प्रादुर्भाव उगवण झाल्यावर दुसऱ्या आठवड्यापासून तर पीक परिपक्व होईपर्यंत आढळतो. सुरुवातीस अळ्या कोवळ्या पानाच्या वरच्या बाजूस खातात परिणामी ओळीने दिसणारी छिद्रे व दांड्यांच्या आतील भाग पोखरल्याचे ओरखडे दिसून येतात.
अळ्या दांडांच्या आत शिरतात व खोड पूर्णपणे पोखरतात. याचा परिणाम कणसावर होऊन कणसे तुटतात किंवा अर्धवट अथवा पूर्णपणे सुकतात.
नियंत्रण:
या किडीचा एक हंगामापासून दुसऱ्या हंगामापर्यंत प्रसार होतो. हे टाळण्यासाठी पीठ कापणीनंतर शेतातील धसकटे व अवशेष उपटून काढावेत व जाळून नष्ट करावेत.
कार्बोफ्लोरॉन 3 जी किंवा फ्युरॉडॉन 3 जी कीटकनाशक 4 ते 5 किलो प्रती एकर या प्रमाणात उगवणीनंतर 20 ते 35 दिवसांनी प्रत्येक झाडांच्या पोंग्यांमध्ये टाकावे.
ज्वारीवरील प्रमुख रोग व नियंत्रण:
दाण्यावरील बुरशी:
Sorghum Cultivation 2025 बुरशीच्या प्रादुर्भावामुळे दाणे हलक्या भुरकट अथवा गुलाबी तर कधी काळ्या रंगाचे होतात. बुरशीच्या प्रकारावर त्याचा रंग अवलंबून असतो.
बुरशीमुळे दाण्यांचा रंग खराब होतो. दाण्याची उगवण क्षमता, पोषकता कमी होणे, दाण्याचे वजन व आकार कमी होत जाऊन वजन वाढते व बाजारभाव फार कमी मिळतो.
नियंत्रण:
दाण्याची शारीरिक परिपक्वता झाल्याबरोबर पिकाच्या कापणीस विलंब करू नये.
पर्जन्यमानाच्या काळात परिपक्व होणाऱ्या वाणांची लागवड टाळणे.
प्रोपीकोनॅझोल 3 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून पीक फुलोऱ्यावर असताना पहिली फवारणी व नंतर 10 दिवसांच्या अंतरात केल्यास बुरशीचे नियंत्रण करता येते.
कॅप्टन 0.30% + डायथेन एम 45 0.30% यांची कणीस निवसण्यास सुरुवात झाल्यापासून प्रत्येकी 10 दिवसाच्या अंतरास दाण्यांवरील बुरशीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो.

Sorghum Cultivation 2025 कापणी व मळणी:
ज्वारीचे पीक परिपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी व मळणी करावी, जेणेकरून ज्वारी पावसामध्ये न सापडता बुरशीमुळे खराब होणार नाही.
साठवण: Sorghum Cultivation 2025 काळ्या रंगाच्या प्लास्टिक ताडपत्रीवर ज्वारी पसरवून त्यावर पांढऱ्या प्लास्टिक ताडपत्रीने झाकून उन्हामध्ये कडक वाळवावी की जेणेकरून ज्वारीमध्ये 10 ते 12 टक्के ओलावा शिल्लक राहील त्यानंतर ज्वारी लोखंडी कणगीमध्ये साठवून ठेवावी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |