Sorghum Cultivation 2025 क्षेत्र उत्पादन व उत्पादकता : शास्त्रीयदृष्ट्या ज्वारी हे c4 या वर्गातील पीक आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय कार्यक्षमतेने केली जाते. हे पिक ग्रामीण या वंशातील असून त्यांच्या शास्त्रीय नाव सोरगम बायकोलार असे आहे. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू, मका, भात व बार्ली यांच्या नंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्यधान्य पीक आहे.

2010-11 मध्ये जगातील 110 देशात 40.5 दशलक्ष हे क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले असून 55.65 दशलक्ष टन एवढे उत्पादन मिळाले होते. भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या 18 टक्के वाटा भारताचा आहे. भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे.
भातशेतीत अचूक नत्र व्यवस्थापनाचा नवा पर्याय; लीफ कलर चार्ट!!
Sorghum Cultivation 2025 जमिनीची निवड:
रब्बी ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही व वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते. जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 असावा.

Sorghum Cultivation 2025 पेरणीचा कालावधी:
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाच्या ओलीवर 5 सेमी रब्बी ज्वारीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा हा कालावधी सर्वात चांगला आहे.
Sorghum Cultivation 2025 वाणांची निवड:
हलकी जमीन : 30 सेमी पर्यंत खोल- फुले अनुराधा, फुले माऊली.
मध्यम जमीन : 60 सेमी पर्यंत खोल- फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-35-1
भारी जमीन : 60 सेमी पेक्षा जास्त खोल- फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसबी 22, पीकेव्ही क्रांती, सीएसएच 15, सीएसएच 19.
बागायती जमीन : फुले रेवती, फुले वसुधा, सीएसबी 18, सीएसएच 15, सीएसएच 19, परभणी मोती, परभणी ज्योती. हुरड्यासाठी फुले उत्तरा, फुले मधुर या जातींची लाह्यासाठी फुले पंचमी, तर पापडासाठी फुले रोहिणी या जातींची निवड करावी.
बियाणांचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया:
हेक्टरी 10 किलो बियाणांची शिफारस आहे. घरचे बियाणे वापरताना काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी 300 मेष गंधक 4 ग्राम प्रति किलो या प्रमाणात आणि पेरणी उशिरा झाल्यास खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम 70 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो अशी बीज प्रक्रिया करावी.
चाऱ्यासाठी ज्वारी लागवड करताना एकरी 16 किलो बियाणे दोन ओळीतील अंतर 30 सेमी ठेवून पेरावे. आणि रोग व खोडकीड प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास गंधक 300 मेष 4 ग्रॅम व थायोमेथॉक्झाम 35 डब्ल्यूएस 3 ग्रॅम चोळावे. त्यानंतर 25 ग्रॅम झोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम पीएसबी प्रति किलो बियाणास जिवाणूसंवर्धकांची बियाणेप्रमाणे करावी.

सरी काढून त्यात पेरणी करणे-
मध्यम ते भारी 45 सेमी खोल जमिनीवर बळीराम नांगरणे व दोन ओळीतील अंतर 45 सेमी किंवा सुधारित वखरने 45 सेमी अंतर ठेवून पेरणी पूर्वी 15 दिवस अगोदर सऱ्या काढाव्यात. आणि तीफनीच्या साह्याने पेरणी करावी. सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासनी करू नये.
रासायनिक खताचा वापर
माती परीक्षणानुसार पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांची योग्य मात्रा दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. जिरायती हलक्या जमिनीमध्ये एकरी 10 किलो नत्र पेरणीचे वेळी द्यावे. मध्यम जमिनीत एकरी 16 किलो नत्र 8 किलो स्फुरद आणि बागायती मध्यम जमिनीत 32 किलो नत्र 16 किलो स्फुरद व 16 किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
जिरायती भारी जमिनीत एकरी 24 किलो नत्र 12 किलो स्फुरद आणि बागायती भारी जमिनीत 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति एकरी द्यावे. जमिनीत संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोनचाड्याच्या पभरणी ने पेरणीच्या वेळी पेरून घ्यावे.
बागायती जमिनीस अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. राहिलेले नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. झिंक कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये 8 किलो झिंक सल्फेट प्रति एकरी शेण काला 1:4 प्रमाणात एक आठवडा मुरवून पेरणीनंतर 30 दिवसांनी सिंचनाच्या पाण्यासोबत घ्यावे.
Sorghum Cultivation 2025 अंतर मशागत:
उगवणीनंतर तीन आठवड्याने दोन रोपातील अंतर बागायती लागवडीसाठी 12 सेमी व जिरायती लागवडीसाठी 15 सेमी ठेवून विरळणे करून एकरी योग्य ताटांची संख्या ठेवावी. पेरणीनंतर 35 ते 40 दिवस पिक तनविहरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी व 3 वेळा कोळपणी करावी. पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात एकरी 2 टन या प्रमाणात 2 ओळीत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन (तण तुरकाट्या इ.) करावे.
Sorghum Cultivation 2025 आंतरपीक
वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास ज्वारीवर चिकटण्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते. यावर अधिक थंडीमुळे करडईचे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या समतोलपणाचा विचार केला तर ज्वारी अधिक करडईयांचे 4:4 किंवा 6:3 या प्रमाणाचे आंतरपीक घ्यावे.

एकात्मिक कीड व रोग नियंत्रण
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून दोन-तीन कुळव्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यामुळे किडींच्या सुक्ताअवस्था नष्ट होतात.
ज्वारीची पेरणी वेळेवर करावी.
एकाच वेळी पक्व होणाऱ्या कीड आणि रोगांना प्रतिकारक वाणांची निवड करावी.
पिकाची द्विदल पिकासोबत योग्य फेरपालट करावी.
कानी रोग व खोडकीड प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास गंधक 300 मेष 4 ग्रॅम थायोमेथॉक्झाम 35 डब्ल्यूएस 3 ग्रॅम चोळावे.
खोडमाशी व खोड किडीने आर्थिक नुकसानीच्या पातळी गाठल्यानंतर निंबोळी अर्क 5 टक्के किंवा क्विनॉलफॉस (25 इसी ) 1.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
खडखड्या रोगासाठी कमी ओलावा व अधिक उष्णता कारणीभूत असल्यामुळे विशेषतः फुलोऱ्यात सौरक्षित पाणी द्यावे पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात एकरी 2 टन या प्रमाणात 2 ओळीत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
काढणी व उत्पादन:
Sorghum Cultivation 2025 ज्वारी काढणीच्या वेळी कंसातील दाणे टणक होतात. ज्वारीचे पीक जातीपरत्वे 110 ते 130 दिवसांमध्ये तयार होते. ज्वारी काढण्यानंतर 8 ते 10 दिवस उन्हात वाळवून मळणी करावी. धान्य उफणनी करून तयार झाल्यानंतर साठवणुकीपूर्वी पुन्हा वाळवावे व साधारणता 50 किलो पोत्यात भरून ठेवावे. सुधारित पद्धतीने ज्वारी लागवड केल्यास बागायत ज्वारीचे प्रती एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन घेणे शक्य आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |