Solar Pumps 2025 शेतीसाठी दिलासा देणाऱ्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखोंचा हिस्सा भरला. पण प्रत्यक्षात त्यांना काही मिळाले नाही. महिनोमहिने प्रतीक्षा, कार्यालयाचे फेरे आणि कोटेशन बंद. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा काळजीत पडले आहे.

शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या हेतूने शासनाने सुरू केलेली ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ मागील योजना सध्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्र कुठे! बरसणार जोरदार सरी? वाचा सविस्तर;
लाभार्थीचा भरून ही अनेक शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून सौर पंप मिळालेला नाही. त्यातच कृषी पंपासाठीचे वीज कोटेशन बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहे.

कुसुम योजनेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 11 हजारांवर सौर कृषी पंप बसविण्यात आल्याचा दावा यंत्रणे कडून करण्यात येतो. जून ते डिसेंबर दरम्यान पाणी पातळी बऱ्यापैकी वर असते.
परंतु या काळात ढगाळ वातावरण असते. त्यामुळे सौर पंपांचा उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर डिसेंबर नंतर पाणी पातळी खालावते. अशा परिस्थितीत बोअरमधून 200 ते 300 फुटाखालील पाणी ओढत नाही. त्यामुळे वीस कोटीशन सुरू करण्याची मागणी होत आहे.
महिनोमहिने प्रतीक्षा कार्यालयान फेऱ्या सुरूच
Solar Pumps 2025 हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत आवश्यक रक्कम भरून अर्ज सादर केले आहेत. मात्र सौर पंप न मिळाल्यामुळे त्यांना वारंवार महावितरण कार्यालयांचे फेऱ्या माराव्या लागत आहेत.
कोटेशन बंद असल्याचे वीज जोडणी ही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनंतरही शेती सिंचन करू शकत नाहीत.
Solar Pumps 2025 पुरवठादारांकडील साठा संपला
अनेक शेतकऱ्यांनी अर्ज अपलोड करून आपली रक्कम भरली आहे. परंतु संकेतस्थळावर सतत पुरवठादारांकडील साठा संपला असा संदेश दिसतो आहे.
यामुळे हजारो शेतकरी मानसिक तणावात असून, त्यांना शेतीच्या नियोजनात अडथळे येत आहेत.
ढगाळ हवामानात सौर कंपनी निष्क्रिय
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळा व हिवाळ्याच्या काळात वातावरण ढगाळ असते आणि अशावेळी सौरभ कृषी पंप कार्यरत राहत नाहीत. दुसरीकडे, वीज कोटेशन ही बंद असल्याने शेतीसाठी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.
यामुळे शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून पैसे भरले, पण शेती करता येईना अशी अवस्था निर्माण झाली आहे.
Solar Pumps 2025 आकडेवारी काय सांगते
हिंगोली जिल्ह्यात जवळपास 5000 पेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ 345 सौर पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
कोटेशन पुन्हा सुरू करा
- शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की कृषी पंपासाठीचे कोटीशन पूर्वीप्रमाणे सुरू करावे.
- तसेच सौर पंपाचा साठा कधी उपलब्ध होणार याविषयी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे.
- लोकप्रतिनिधींनी आहे ही याबाबत आवाज उठवावा अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
- पैसे भरल्यानंतरही सौर पंप मिळत नाही. कोटेशनही बंद. शेतीसाठी पाणी आहे. पण वापरता येत नाही. आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा अहवाल शेतकरी सवाल शेतकरी करत आहेत.
- ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना सुरू असली तरी अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोटेशन पुन्हा सुरू करणे, सौर पंपाचा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |