सौरपंप योजनेला ‘स्पीडब्रेक’ विलंबाचा पिकांना पाणी देण्यासाठी फटका बसणार का? Solar Pump Scheme Delay 2025

Solar Pump Scheme Delay 2025 गेल्या दोन वर्षांपासून सौर कृषीपंप योजनेअंतर्गत धाराशिव जिल्यातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा सुलभ करण्यासाठी योजना राबवली जात आहे.

Solar Pump Scheme Delay 2025

Solar Pump Scheme Delay 2025 मात्र, या योजनेतील अंमलबजावणीत येणाऱ्या उशिरामुळे हजारो शेतकऱ्यांचे पंप अजूनही बसलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

तंत्र मका लागवडीचे!! 

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात एकूण 36 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी 19 हजार शेतकऱ्यांनी 25 हजार रुपये शुल्क भरले आहे. मात्र, यातील फक्त 4 हजार शेतकऱ्यांनाच पंप बसवून दिले गेले आहेत. उर्वरित 10 हजार प्रकरणे अजूनही प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

WhatsApp Group Join Now

नियमांचे उल्लंघन आणि नाराजी:

योजनेनुसार, अनुदान रक्कम भरल्यानंतर 60 दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक एजन्सी या नियमाचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही शेतकऱ्यांना तीन ते सहा महिने उलटूनही पंप मिळालेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत चालला आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप पिके नष्ट झाली, आता रब्बीतून उत्पन्न मिळवायचे आहे. महावितरणकडून दिवसा वीज पुरवठा होत नाही, म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी सौर पंप अत्यंत गरजेचा आहे.

शेतकऱ्यांची आकांशा आणि मागणी

रब्बी हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी सौर पंपची गरज भासत आहे. यासाठी 19 हजार शेतकऱ्यांनी अनुदान रक्कम भरली असून 3 ते 6 महिने उलटून गेले तरी पंप बसलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि अनेक शेतकरी कृषिपंपासाठी जोरदार ओरड करत आहेत.

WhatsApp Group Join Now

योजनेतील अडथळे आणि पुढील पावले

महावितरणने पंप बसवण्यासाठी दुसरे टेंडर काढले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे संबंधित यंत्रणेला सौर पॅनल बसवता आलेला नाही. महावितरणचे अधिक्षक अभियंता संजय आडे यांनी स्पष्ट केले की, शेतातील पाणी कमी झाल्यास पंप बसवण्याचे काम वेगाने करण्यात येईल.

योजनेचे महत्व: Solar Pump Scheme Delay 2025

सौर कृषीपंप योजना विजेच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राबवली जाते. पाणी नसल्यामुळे शेतकरी पिके वाळवत आहेत. योजनेत अडथळा आल्यास योजनेचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून शासन आणि प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

सौर पंप मिळणे ही शेतकऱ्यांसाठी प्राथमिक गरज आहे, विशेषतः अतिवृष्टी नंतर पीक जिवंत ठेवण्यासाठी मदत मिळणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सौर कृषीपंप योजनेत हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. अनुदान रक्कम भरल्यानंतरही पंप बसवण्यात होणारे विलंब हे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस अडथळा ठरत आहे. रब्बी हंगाम सुरू होत असताना पिकांना पाणी पुरविण्याकरता हे प्रकरण शासनाच्या लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नियमानुसार शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम भरल्यानंतर 60 दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक आहे. परंतु अनेक एजन्सी या नियमाचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही शेतकऱ्यांना तर तीन महिने उलटूनही अजून पंप मिळालेले नाहीत.-संभाजी गादेकर, शेतकरी.”

सौर पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पैसे भरले असतील तर त्यांना लवकरच पंप बसतील यासाठी शासनाने दुसरे टेंडर काढले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे संबंधित यंत्रणेला सौर पॅनल बसवता आले नाही. आता काम वेगात करण्यात येणार आहे. -संजय आडे, अधीक्षक अभियंता, धाराशिव.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment