सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर; Solar Kumpan Yojana 2025

Solar Kumpan Yojana 2025 मुंबई : वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान, पशुधनावर होणारे हल्ले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. हीच मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Solar Kumpan Yojana 2025

गेल्या सरकारमध्ये सोलर कुंपण योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. तसेच, शेतकऱ्यांना सोलर कुंपण देखील उपलब्ध करून देण्यात येत होते. अनेक अडथळे या योजनेत पाहायला मिळाले. यापूर्वी या योजनेत ७५ टक्के अनुदान म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. मात्र, आता हे अनुदान थेट शंभर टक्के मिळणार असून 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, मागील हफ्तेही मिळतील, वाचा सविस्तर…

एकंदरीत श्यामाप्रसाद मुखर्जी जनमन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर कुंपण देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे. ही योजना मात्र महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये राबवली जाते. वनालगतची जी काही क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. अशा गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात येते. प्रत्येक वर्षी या यादीमध्ये काही नवीन गावांचा देखील समावेश करण्यात येतो.

WhatsApp Group Join Now

Solar Kumpan Yojana 2025 अर्ज करण्याची स्थिती तपासा…

  1. सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्या लॉगिन आयडीद्वारे लॉगिन करायचा आहे.
  2. लॉग इन केल्यानंतर अर्ज करा मध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली सौर कुंपण योजना अशी बाब दाखवली जाईल.
  3. या बाबीवर क्लिक करायचे आहे, केल्यानंतर अर्ज भरत असताना जर तुमचे गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच या अंतर्गत तुम्हाला अर्ज सबमिट करता येणार आहे.
  4. जी गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment