सौरचलित फवारणी पंप मिळणार 100% अनुदानावर; असा करा अर्ज : Solar favarni pump 2025

राज्यातील शेतकऱ्यांना आता सौरचलित फवारणी पंप यासाठी अर्ज करता येणार आहे मागील वर्षी 2024 मध्ये शेतकऱ्यांना फवारणी पंप अनुदान मिळत होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट पंप राज्य सरकार मार्फत वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आता राज्य सरकारने यामध्ये संरचलित फवारणी पंप शेतकऱ्यांना वाटप करण्याचे सुरू केलेले आहे. शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात आणि यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा अर्ज कोठे करावा याबद्दल या लेखांमध्ये माहिती दिलेली आहे.

Solar favarni pump 2025 सध्या राज्यात हवामान बदलामुळे हरित पेरण्या त्याचबरोबर रब्बी पेरण्या याचे शेड्युल बदलल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले शेतकऱ्यांना पीक फवारणी करण्यासाठी फवारणी पंपाची आवश्यकता असते पण सध्या फवारणी पंपाच्या किमती पाहून शेतकरी फवारणी पंप घेऊ शकत नाहीत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत फवारणी पंप वाटप करण्याचे राज्य सरकारने सुरू केलेले आहे.

Table of Contents

WhatsApp Group Join Now

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप नंतर सौरचलित फवारणी पंप वाटप:

खरीप हंगामा 2024 मध्ये राज्य शासनामार्फत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप करण्यात आले होते. सदर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना 100% अनुदानावर लॉटरी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले. सदर बाब ही महा – डीबीटी पोर्टलवर एक वेगळ्या पद्धतीने राबवण्यात राबविण्यात आली होती.

त्यानंतर आता, कृषी विभागामार्फत 100% अनुदानावर सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहे, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु सदर सौरचलीत फवारणी पंप ही बाब महा-डीबीटी पोर्टलवर आधीपासून समाविष्ट आहे.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाची गरज (Solar favarni pump 2025) :

पिकांवर फवारणीसाठी फवारणी पंप अत्यावश्यक असतो मात्र आर्थिक तुटवल्यामुळे अनेक शेतकरी फवारणी पंप खरेदी करू शकत नाहीत या अडचणींचा विचार करून शासनाने सौरऊर्जेवर चालणारा फवारणी पंप मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेबद्दल माहिती :

योजनेचे नाव :सौरचलित फवारणी पंप योजना 2024
विभाग :कृषी विभाग
लाभ :सौरचलित फवारणी पंप वाटप
लाभार्थी :राज्यातील शेतकरी
राज्य :महाराष्ट्र
वर्ष2025-26

सौरचलित फवारणी पंपाचे फायदे :

  • सौर फवारणी पंपामुळे शेतकऱ्यांना फवारणी करणे सोपे होते.
  • सौर फवारणी पंपामुळे शेती उत्पादनात वाढ होते.
  • सौर फवारणी पंपामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होतो.
  • सौर फवारणी पंपाच्या माध्यमातून ऊर्जा वाचते.

अनुदान योजनेची वैशिष्ट्ये (Solar favarni pump 2025) :

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानावर सौरचलित फवारणी पंप उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक भार न पडता संरचलित पंप मिळू शकतो.

विविध पिकांमध्ये होणार फायदा :

WhatsApp Group Join Now

कापूस सोयाबीन व इतर तेलबियाच्या उत्पादक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्देश राज्य सरकारने घेतलेले आहे यामध्ये कापूस सोयाबीन वगळता इतर पिकांनाही याचा फायदा होणार आहे यामध्ये मका ज्वारी ही पिके ही असणार आहे त्याचबरोबर हरभरा व पालेभाज्या ही समाविष्ट आहेत

100 टक्के अनुदान कसे मिळणार (Solar favarni pump 2025) :

राजश्री शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर यापूर्वी नॅनो युरिया डीएपी आणि बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात होते यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये फवारणी पंप वाटप केले होते. आता राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप फवारणीसाठी महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करायचे आहेत आणि यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

सौर फवारणी पंप याचा अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव लॉटरीमध्ये लागणार आहे अशा शेतकऱ्यांना सौरभ फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहे तरी राज्यातील शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करून आपल्याला मिळणाऱ्या सौर पंप योजनेचा फायदा घ्यावा.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

सातबारा उतारा व आठ अ उतारा

जमिनीचा दाखला

मोबाईल नंबर

पॅन कार्ड

अर्जाचा नमुना

योजनेसाठी पात्रता :

  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेत जमीन असावी.
  • अर्जदार अल्पभूधारक असावा.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी महाडीबीटी द्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा.
  • शेतकऱ्यांनी यापूर्वी फवारणी पंप योजनेसाठी अनुदान घेतलेले नसावे.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

  • सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय स्वरूपात अपलोड करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्या किंवा अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा.

अर्ज करण्याची प्रक्रिया :

सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी लॉगिन करायचा आहे

त्यानंतर खालील सांगितल्याप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण पर्यावरण क्लिक करायचा आहे

त्यानंतर खालील बाबी निवडायचे आहेत

मुख्य घटककृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
तपशीलमनुष्यचलित अवजारे
यंत्रसामग्रीपिक संरक्षण अवजारे
मशीन चा प्रकारसौरचलित फवारणी पंप 2025

या सर्व बाबी निवडल्यानंतर खालील दिलेल्या चेक बॉक्स वर मार्क करायचे आहे व त्यानंतर ते जतन करायचे आहे त्यानंतर मेनूवर परत जायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करायचं आहे

यानंतर सांग खालील सांगितल्याप्रमाणे पहा या बटणावर क्लिक करून प्राधान्य क्रमांक निवडून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुम्हाला अर्ज फी म्हणून 23 रुपये 60 पैसे एवढे शुल्क भरायचे आहेत

शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रत आपणास प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्ही स्वयंचलित फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकता.

शेतकऱ्यांसाठी सूचना :

  • अर्ज करण्यास विलंब करू नका; अंतिम तारीख की पूर्वी अर्ज सादर करा.
  • अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
  • सौरचलित फवारणी पंपाच्या वापरासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्या, ज्यामुळे त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर सुनिश्चित होईल.

सौरचलित फवारणी पंप योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा :

येथून करा अर्ज :

फवारणी पंप अर्ज लिंक :येथे क्लिक करा
इतर योजना विषयी माहिती :येथे क्लिक करा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQ :

i) सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज कुठे करावा ?

सौरचलित फवारणी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर भेट देऊन तिथून अर्ज करावा

ii) सौरचलित फवारणी पंप यासाठी अर्ज कसा करावा ?

सौरचलित फवारणी पंप याचा अर्ज महाडीबीटी अंतर्गत करावा यासाठी विविध कागदपत्रे आवश्यक आहेत.

iii) कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सौरचलित फवारणी पंप ?

राज्यातील सर्व शेतकरी सौरचरीत फवारणी पंप साठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment