आता भाज्या फेकून देऊ नका, ‘हे’ मशीन घ्या आणि चांगला नफा कमवा…वाचा सविस्तर; Solar Dehydrator 2025

Solar Dehydrator 2025 शेतकऱ्यांना अनेकदा कमी किमतीत त्यांचे पीक विकावे लागते. जेव्हा टोमॅटो, कांदे आणि इतर भाज्या बाजारात अपेक्षित किमतीत विकल्या जात नाहीत, तेव्हा शेतकरी जनावरांना खाऊ घालतात किंवा रस्त्यावर फेकून देतात. पण फेक झोकीपेक्षा यातूनच पैसे कमविण्याचा मार्ग सोलर डिहायड्रेटर साह्याने उपलब्ध झाला आहे.

Solar Dehydrator 2025

सोलर डिहायड्रेटर मशीन ही एक तंत्रज्ञान आहे. जी सौरऊर्जेचा वापर करून फळे आणि भाज्या सुकवते. हे यंत्र शेतकऱ्यांना उत्पादन जास्त काळ टिकवून ठेवण्यास आणि ऑफ सीझनमध्ये चांगल्या किमतीत विकण्यास मदत करते. सोलर डिहायड्रेटर मशीन ही एक तंत्रज्ञान आहे, जी सौरऊर्जेचा वापर करून फळे आणि भाज्या सुकवते. वळल्यावर मशीनने वाळवल्यावर फळे आणि भाज्यांचा रंग बदलत नाही आणि ते स्वच्छ देखील राहतात.

ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांच्या पसंतीला; एका दिवसात तब्बल 3 लाख उतारे डाऊनलोड करण्याचा विक्रम;

Solar Dehydrator 2025 ‘हे’ यंत्र कसे काम करते?

  • सोलर डिहायड्रेटर मशीन मध्ये एक मोठा भाग असतो, ज्यामध्ये फळे आणि भाज्या सुकविण्यासाठी ठेवल्या जातात.
  • चेंबर काचेच्या झाकणाने झाकलेले असते आणि उन्हात वाळवण्यासाठी सोडले जाते.

WhatsApp Group Join Now

  • या यंत्रात एक सौर पॅनल आणि एक पंखा देखील आहे, जो हवेचा प्रवाह राखतो.
  • Solar Dehydrator 2025 तर जेव्हा फळे आणि भाज्या उघड्यावर वाळवल्या जातात, तेव्हा त्यांचा रंग फिकट पडतो आणि धूळ, माती इत्यादी देखील त्यात मिसळतात.
  • सोलर डिहायड्रेटर ठेवलेली फळे आणि भाज्या बाहेर काढल्यावर कोरड्या राहतात आणि पाण्यात टाकल्यावर पुन्हा हिरव्या होतात.
  • बाजारात सोलर ड्रायरची किंमत 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.

भाज्या सुकवून नफा मिळवा…

आले, हळद, टोमॅटो, कांदा, कारले, काकडी, सफरचंद आणि नारळी यासारख्या पिकांसाठी सोलर डिहायड्रेटर मशीन ही एक उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे.

टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या सौर ड्रायर मध्ये वाळवण्यासाठी दोन ते अडीच दिवस लागतात, तर उघडा सूर्यप्रकाशात वाढवण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात.

Solar Dehydrator 2025 सोलर डिहायड्रेटर मशीन मध्ये भाज्या आणि फळांची चव, रंग, सुगंध, वास तसेच पोषण अबाधित राहते. त्याचा वापर आणि देखभालीचा खर्चही जवळजवळ नगण्य आहे.

हे यंत्र हिवाळ्यात जशी कामे करते तसेच उन्हाळ्यात ही कामे करते. त्यात बसवलेले सौर आणि पॅनल 45 अंशापर्यंत वाकवता येते.

WhatsApp Group Join Now

अशा प्रकारे हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशातही ते चांगले काम करते. तर उन्हाळ्याच्या दिवसांसाठी ते 27 ते 30 अंशापर्यंत सेट करण्याची सुविधा देखील आहे.

Solar Dehydrator 2025 सोलर डिहायड्रेटर मशीनचे फायदे!

  1. हे यंत्र फार महाग नाही आणि ते सहजपणे वापरता येते.
  2. सोलर डिहायड्रेटर मशीन वापरून वाळवल्यावर फळे आणि भाज्यांचा रंग बदलत नाही आणि ते स्वच्छ राहतात.
  3. तर उघड्यावर वाळवल्यावर त्यांचा रंग फिकट होतो आणि धुळदेखील त्यांच्यावर चिकटते.
  4. हे यंत्र एका दिवसात मसाले आणि भाडे सुकवते भाज्या सुकवते.
  5. हळद आणि आले यांसारखे भाज्यांचे लहान तुकडे करण्यासाठी स्लयसर वापरले जातात, ज्यामुळे त्या लवकर सुकण्यास मदत होते.
  6. हळद आणि आले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे तंत्र विशेषतः उपयुक्त आहे, कारण त्यांना ते वाळवताना सर्वात जास्त त्रास होतो.
  7. हे यंत्र शेतकऱ्यांना त्यांचे पीक जास्त काळ टिकून ठेवण्यास मदत करते, जेणेकरून ते त्यांचे उत्पादन चांगले किमतीत विकू शकतील.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment