Soil Management 2025 सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बागायती क्षेत्रात ठराविक कालावधीमध्ये दोन ते तीन पिके घेत आहोत. त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. तसेच बागायती पिकांना अन्नद्रव्यांची गरज ही जास्त असते. परंतु त्या प्रमाणात त्यांची गरज भागविली जात नाही. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांची पातळी कमी झाली.

जमिनीची जडण-घडण पूर्णपणे बिघडली. हवा आणि पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त झाले. जमिनी घट्ट व कडक बनू लागल्या. उपयुक्त जिवाणूंची संख्या व कार्यशक्ती कमी झाले. एकंदरीत जमिनी आजारी पडू लागल्या. काही जमिनी क्षारयुक्त चोपण, चुनखडीयुक्त, धुपे मुळे अशक्त पाणथळ झाल्या आहेत.
शाश्वत! पीक उत्पादनासाठी आंतरपीक पद्धती फायद्याची!
त्यामुळे जमिनीची सुपीकता व पीक उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी झालेली आहे. थोडक्यात जमिनीचे आरोग्य धोकादायक बनले आहे. हरितक्रांतीमध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी सुधारित जाती, कीटकनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते आणि पाणीपुरवठ्यांमुळे निश्चित चांगला फायदा झाला.

Soil Management 2025 आपल्या शेतीमध्ये सिंचन क्षेत्र वाढविण्यास मर्यादा असून जवळ-जवळ 80 ते 85 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. म्हणून सुधारित जाती आणि रासायनिक खतांच्या वापरावर अधिक भर देऊन वाढत्या लोकसंख्येला लागणारे अन्न उत्पादन घेण्यात आली आले. परंतु जमिनीची उत्पादकता व त्यातील सातत्य टिकवून ठेवण्याकडे दुर्लक्ष झाले आणि उत्पादन वाढीमध्ये जास्त वाढ झाली नाही. शास्त्रीय अभ्यासांती सदर अशाश्वत परिस्थितीत जमिनीचे अनारोग्य बिघडत असल्याचे दिसून आले.
जमिनीचे आरोग्य हे त्या जमिनीच्या घटकांच्या नैसर्गिक संतुलनावर अवलंबून राहते. जमीन ही खडकापासून बनलेली आहे. एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागते व जमीन ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून त्याचा योग्य व चांगला उपयोग करून घेणे गरजेचे आहे. जमिनीमुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. जर जमीन नसती तर आपण सर्व सजीव जिवंत राहू शकलो नसतो. जमिनीचे महत्त्वाचे तीन प्रमुख घटक असून हवा, पाणी आणि माती याचा समावेश होतो.
Soil Management 2025 सुपीक जमिनीमध्ये 25% हवा, 25% पाणी आणि 50% माती यामध्ये 45% मातीचे कण तर 5% सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. जमिनीमध्ये 25 टक्के हवा असते. प्रत्येक सजीव हवेशिवाय जगू शकत नाही. माती सुद्धा सजीव आहे. यामध्ये बरेच सूक्ष्मजीवाणू असतात. तसेच विविध रासायनिक क्रियेमध्ये भाग होतात. वातावरणामध्ये जसा ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन असतो. त्या प्रमाणातच तो जमिनीतही असतो. परंतु कार्बनचे प्रमाण मात्र जास्त असते.
त्या बरोबर पाणी सुद्धा पिकांना आवश्यक आहे. सर्व अन्नद्रव्ये जमिनीतील आणि रासायनिक खतातील पाण्यामध्ये विरघळतात. त्यानंतर पिके मुळावाटे शोषून घेतात. जर यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर जमीन पाणथळ बनतात. त्यांची सुपीकता आणि उत्पादकताही कमी होते.
भौतिक रासायनिक आणि जैविक हे जमिनीचे गुणधर्म आहेत. हरितक्रांतीच्या काळामध्ये जैविक गुणधर्म संवर्धन करण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. साहजिकच जमिनीतील नैसर्गिक जैविक संपदा बऱ्याच अंशी कमी झाली. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक खतांना प्रतिसाद कमी मिळत गेला.
Soil Management 2025 कारण बरीच अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जैविक संपदा असणे गरजेचे असते. तसेच सेंद्रिय पदार्थही जमिनीस देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जमिनीच्या तिन्ही गुणधर्मावर अनिष्ट परिणाम झाला. अशा जमिनीत उत्पादन वाढीसाठी जास्त रासायनिक खतांचा वापर वाढला आणि जमिनीचे आरोग्याची परिस्थिती बिघडण्यास हातभार लागला.
जमिनीच्या जैविक गुणधर्म एवढेच भौतिक गुणधर्मास महत्त्व आहे. पीक उत्पादन वाढीमध्ये जमिनीची जडणघडणीचे महत्त्व असून त्यामुळे जमिनीतील पाण्याचे आणि हवेचे प्रमाण योग्य राहते. अशा परिस्थितीत जैविक प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया आणि जमिनीचा निचरा सुधारून अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे पिकांची वाढ होऊन पीक उत्पादन चांगले मिळते. जमिनीची जडणघडण सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
Soil Management 2025 त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, करंजी पेंड, कंपोस्ट खत, खाद्य, अखाद्य पेंडी, गांडूळ खत, हिरवळीचे खत त्यामध्ये चवळी, ताग, धेंचा तसेच पिकांचे अवशेष याचा वापर करावा. सेंद्रिय खताने जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. त्याबरोबरच जमिनीचा निचरा सुधारून क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
रासायनिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा सामू, जमिनीतील कर्ब, पदार्थ प्रमुख, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि क्षारता यांचा समावेश होतो. बहुतांशी जमिनीमध्ये सामूचा परिणाम अन्नद्रव्य उपलब्धतेवर होतो. सर्वसाधारणपणे उदासीन सामूच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त असते. काही जमिनींचे सामू अमलधर्मीय आणि विल्म धर्मीय असतो. जमिनीचा सामू जर विल्म धर्मीय असेल तर अशा जमिनीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
Soil Management 2025 तर लोह, जस्त, तांबे, मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. सेंद्रिय पदार्थ हे अन्नद्रव्याचे कोठार असून पिकास हळूहळू यातून अन्नद्रव्य सेंद्रिय कर्ब मधून मिळते. जर जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसू लागली की आरोग्य बिघडते. रोग व केळींचा पिकांवर प्रादुर्भाव होतो. तसेच स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता, आम्ल आणि विमलाचे प्रमाण वाढल्याने कमी होते. उदा. आम्लयुक्त जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपातील स्फुरद, लोह आणि अल्युमिनियम बरोबर स्थिर होतात. विमल युक्त जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यास स्फ़ुरदाचे स्थिरीकरण होते.
क्षारयुक्त जमिनीमध्ये क्षारांचा पांढरा थर असतो. जमिनीमध्ये जास्त क्षार साठून राहिल्यास पिकांच्या उगवणी पासून ते पिकांच्या संपूर्ण वाढीच्या कालावधीमध्ये पिकांवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीमध्ये पुरेशी अन्नद्रव्य साठा असूनही पिकास उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पिकांची वाढ होत नाही. प्रामुख्याने कमी पाऊस व भारी चिकन मातीचे प्रमाण जास्त अशा जमिनीमध्ये क्षार साठतात अशा जमिनीचा निचरा कमी असतो.
बाष्पीभवन प्रमाण अधिक असल्याने सातत्याने जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि केशाकर्षाने जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होते असे क्षार पृष्ठभागावर येऊन साठतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी क्षारांच्या प्रकारानुसार निचरा आणि क्षारांचे रूपांतर रासायनिक प्रक्रिया घडवून निचरा होणाऱ्या क्षारांमध्ये होणे गरजेचे असते.
Soil Management 2025 अशा जमिनीत क्षारयुक्त पाणी देऊ नये. चोपण व क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये सोडिअम क्षार वेगळा करण्यासाठी कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम, गंधक आणि पायराइड सारख्या भूसुधारकचा वापर करावा. तसेच, जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये गाडावेत. जमिनीत क्षारयुक्त होऊ नये म्हणून रासायनिक खतांचा व पाण्याचा अति वापर टाळावा आणि योग्य निचरा करावा त्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राहील.
जमिनीचे तापमान योग्य राखणे जमिनीच्या जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अति थंड अथवा अतिउष्ण हवामानात जमिनीचे तापमान कमी जास्त होऊन जमिनीच्या गुणधर्मांमध्ये असंतुलन होते आणि त्याच्या पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
त्यासाठी विविध प्रकारचे आच्छादने वापरून तापमानातील टोकाचे बदल कमी करणे शक्य होते. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Soil Management 2025 जमीन ही वर्षानुवर्ष कमी होत आहे. लोकसंख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी रासायनिक खताबरोबर शिफारशीत सेंद्रिय खत पीक पेरणीच्या आधी 15 दिवस द्यावे. रासायनिक खते जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशीत खतमात्रा, माती परीक्षण करूनच द्यावे, तसेच काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तरच द्यावी. पिकांच्या बियाण्यांना जिवाणू खते, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या, स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा. पाण्याचा वाजवी वापर म्हणजेच पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्येच जमीनुसार द्यावे.
जमिनीचा निचरा यामध्ये उघडे सर आणि बंदिस्त निचरा प्रणालीचा वापर करावा. या सर्व बाबींकडे विशेष लक्ष दिले तर आपण सुपीकता आणि उत्तम जमीन भावी पिढीस देता येईल. त्यामुळे आपले पीक उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यात शंका राहणारच नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |