जमीन सुधारक जिप्सम!! Soil Improver Gypsum 2025

Soil Improver Gypsum 2025 जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, जिप्सम हे जास्त प्रमाणात डिहायड्रेट स्वरूपात असते. कॅल्शियमच्या एका रेणूला पाण्याचे दोन रेणू जोडलेले असतात. रासायनिक समीकरण (CaSO4.2H2o) असे आहे. आपल्या देशामध्ये जीएसएफसी, आर.सी.एफ. सारख्या रासायनिक खतांची निर्मिती होते.

Soil Improver Gypsum 2025

Soil Improver Gypsum 2025 फॉस्फोरिक आम्ल तयार करण्यासाठी लागणाऱ्या रॉक फॉस्फेट व गंधक आम्ल यांच्या प्रक्रियेपासून मिळणारे हे उत्पादन आहे. जिप्सम हे पावडर स्वरूपात असून 50 किलोचे पोत्यामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध केले आहे. यामध्ये कॅल्शियम व सल्फर हे पिकांना पोषक असलेली अन्नघटकाद्रव्य असतात.

सोयाबीन मधील किडींची ओळख व एकात्मिक कीड व्यवस्थापन!!

Soil Improver Gypsum 2025 जिप्सम हा उपपदार्थ असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारा आहे. आपल्याकडे विशेषता उसासारखे पिकासाठी पाण्याचा शेतात शेतकऱ्यांकडून अतिरिक्त वापर झाल्यामुळे जमिनी क्षार व विंबयुक्त झाल्या आहेत. या जमिनी सुधारण्यासाठी जिप्समचा विशेष उपयोग होतो. अशा जमिनीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश व्यवस्थापना इतकेच शिफारसी मध्ये जमिनी वापर करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

जमिनीच्या माती परीक्षणानुसार क्षारांचे प्रमाण 1.00 मी.मी. पेक्षा जास्त असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी जिप्सम वापरणे फायदेशीर आहे. त्याबरोबर शिफारसीतील इतर गोष्टींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जिप्सम चे अनेक फायदे आहेत त्यापैकी खाली दिलेले आहे.

  1. Soil Improver Gypsum 2025 जिप्सममध्ये कॅल्शियम व सल्फर ही पिकांना लागणारी अन्नद्रव्य आहे. जिप्सम हा पिकांना लागणारे सर्व पुरवठा करणारा उत्तम स्त्रोत असून यामुळे पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर जमिनीतील अन्नद्रव्य पिकांचे मुळावाटे शोषण होण्यासाठी कॅल्शियमचा उपयोग होतो. कॅल्शियम वापरामुळे मुळांची वाढ चांगली होते.
  2. जिप्सममुळे जमिनीतील मातीच्या कणांची रचना सुधारते यामुळे अनेक मातीचे लहान लहान कण एकत्र होऊन संख्येने कमी परंतु आकार मोठा अशी माती कणांची रचना होते. मुळांची वाढ व्यवस्थित होऊन जमिनीतील हवा व पाणी यांचे उत्तम व्यवस्थापन होते.
  3. जिप्सममुळे जमिनीची पाणी मुरवण्याची क्षमता वाढते. जमिनीमध्ये असलेले जास्त प्रमाणातील सोडियम जमिनीची फुगवा क्रिया आणि जमिनीतील जास्त पाणी यामुळे जमिनीत साठून राहते. उत्सम वापरामुळे पाणी निचरा होण्याचा दर व पाणी व वाहनता वाढते व त्यामुळे पाणी मुरण्याची क्षमता वाढते.
  4. जिप्सममुळे जमिनीची धूप थांबते व त्याचबरोबर जमिनीतील अन्नद्रव्य वाहून जाण्याचे थांबते विद्राव्य स्फुरद वाहून जाणे थांबण्यासाठी जिप्समचा वापर योग्य व्यवस्थापन आहे.
  5. जिप्सममुळे सोडियमयुक्त जास्त सामू ताबडतोब कमी करते. 8 पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीचा सामू शिफारसी मध्ये वापरलेल्या जिप्सममुळे 7.5 ते 7.8 पर्यंत नियंत्रित करता येते. या नियंत्रित केलेल्या सामू मध्ये बहुतेक सर्व पिकांची वाढ व्यवस्थित होते.

  1. Soil Improver Gypsum 2025 जिप्सममुळे पाणी वापर कार्यक्षमता वाढते विशेषतः दुष्काळजन्य परिस्थिती असताना हे महत्त्वाचे ठरते वाढलेला पाणी निचरा होण्याचा दर वाढलेली जमिनीची पाणी वाहानता जमिनीतील वाढलेला पाणी साठा यामुळे मुळांचे खोलीकरण व पाणी वापर व कार्यक्षमता वाढते. जिप्सम वापरलेल्या जमिनीमध्ये न वापरलेल्या जमिनीपेक्षा 25 ते 100% पर्यंत पाण्याची उपलब्धता जास्त दिसून आली.
  2. जिप्सममुळे कॅल्शियम घटक युरियामधील वाफेद्वारा उघडून जाणाऱ्या अमोनिकल नत्राचे प्रमाण घटवते म्हणजेच युरियाची कार्यक्षमता वाढवते.
  3. जिप्सम हा वनस्पतींना प्राणवायू पुरविणारा स्त्रोत आहे. जेव्हा वनस्पतींकडून सल्फेटचे शोषण होते तेव्हा चयापचय क्रिया होऊन प्राणवायू मुक्त होतो. जो पीकांच्या मुळांसाठी उपयुक्त स्त्रोत ठरतो.
  4. जिप्सम वापरामुळे वापरलेली खते व इतर कृषी निविष्ठा यांची कार्यक्षमता वाढते व पीक उत्पादनामध्ये साधारणपणे 10 ते 50 टक्के पर्यंत वाढ होते.

जिप्सममुळे जमीन कशी सुधारतात: Soil Improver Gypsum 2025

जिप्सम जमिनीत मिसळल्यानंतर त्यातील चुन्याची जमिनीतील सोडियम क्षारांबरोबर निमयाची क्रिया होऊन मातीच्या अति सूक्ष्म कणांवरील सोडियमचे क्षार वेगळे होतात व पाण्यात विरघळतात. तसेच पाण्याबरोबर निचरा होऊन निघून जातात. त्यामुळे जमिनीतील चिकटपणा जाऊन जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची पीक उत्पादनक्षमता वाढीस लागते. जिप्सम मधील पिकांना पोषक असणारी अन्नघटक द्रव्य कॅल्शियम व सल्फर पिकांना उपलब्ध होतात.

WhatsApp Group Join Now

जिप्सममुळे जमिनी सुधारण्याची पद्धत: Soil Improver Gypsum 2025

क्षार विमल युक्त जमिनी सुधारण्याची अंमलबजावणी उन्हाळ्यात करावी. माती परीक्षण अहवालानुसार शिफारसी येथील जिप्सम जमिनीवर एकूण लोखंडी नांगराणे 15 सेमी खोल नांगरणी करावी. याबरोबर एकेरी 12 ते 16 गाड्या कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पाण्याच्या निचऱ्यासाठी चरी काढल्यानंतर जमिनीस भरपूर पाणी द्यावे. म्हणजे जिप्सम मुळे मातीच्या कणांपासून विभक्त झालेले सोडियम सल्फेट क्षार पाण्यात विरघळवून निचरा होऊन जातील, व जमीन भुसभुशीत होईल.

अशा जमिनीत फेरपालटीने व क्षार सहन करणारे पिके घ्यावेत जमीन सुधारणा अमलात आणल्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा त्या जमिनीचे परीक्षण करावे व पुन्हा शिफारसीनुसार अंमलबजावणी करावी. पीक उत्पादनासाठी कंपोस्ट व समतोल रासायनिक खतांच्या शिफारसी कटाक्षाने अमलात आणाव्यात.

जिप्सम वापरासंबधी शिफारशी:

Soil Improver Gypsum 2025 भुईमूग पिकासंबंधी रानबांधणीचे वेळ 100 किलो व फुलोरा अवस्थेत 100 किलो असे एकूण 200 किलो जिप्सम वापरावे. क्षार व विमलयुक्त जमीन सुधारण्यासाठी 1 ते 2 टन एकरी जिप्सम माती परीक्षणावर आधारित शिफारसीनुसार वापरावे. बटाटा, बीट यासारख्या पिकांसाठी सुरुवातीला राणबांधणीचे वेळी 200 किलो खतांबरोबर वापरावे उसासाठी 500 किलो राणबांधणीचे वेळ व 500 किलो पक्के बांधणीचे वेगळे एकरी वापरावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment