सामू (pH) चा जमिनीच्या सुपीकतेवर पिकांवर व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना!! Soil Fertility,Crops & Nutrient 2025

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 सामू म्हणजे जमिनीची आम्लता विम्लता दर्शविणारा निर्देशांक जमिनी पीक संबंधात सामाना खूप महत्त्व आहे. नुसत्या सामूवरून सुद्धा आपणास जमिनीच्या सुपीकता पातळीचा आणि जमिनीतील समस्यांचा अंदाज येतो. प्रत्येक जमिनीचे विशिष्ट असे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म असतात.

Soil Fertility,Crops & Nutrient 2025

या गुणधर्मातील बदलाप्रमाणे जमिनीची सुपीकता पातळी तिची उत्पादनक्षमता व तिच्या नियोजनातील समस्या यात बदल होतात. जमीन हि मुळातच सजीव स्वरूपाची असल्यामुळे पीक उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जमिनीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

हळद पिकातील कीड व रोगांचे नियंत्रण!!

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 भौतिक गुणधर्मामुळे जमिनीचे फुल, निचराक्षमता, आकार, रचना, घनता, हवा, व पाणी यातील समतोल यांची माहिती होते. तर रासायनिक गुणधर्माच्या माहितीमुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण विशिष्ट अन्नद्रव्याचे स्थिरीकरण याची कल्पना येते. गुणधर्मामुळे जमिनीतील कार्यक्षमता कळते.

WhatsApp Group Join Now

जमिनीचा सामू कमी अथवा वाढविण्यासाठी उपाययोजना

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 जमिनीचा सामू उदासीन असणे कधीही चांगले असते. जमिनीचा सामू 7 च्या खाली असेल तर ती जमीन आम्लधर्मी आहे असे समजले जाते. आणि 7 च्या वरती असेल तर ती जमीन विम्लधर्मी आहे असे समजतात. सुपीक व निरोगी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असतो. त्यादरम्यान असल्यास पिकांना सर्वांना घटक सहजासहजी उपलब्ध होते. पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे उत्पादनवाढीस मदत होते. जमिनीचा सामू जर 6.5 ते 7.56 खाली किंवा वर असेल तर तो पीक वाढीच्या दृष्टीने व जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.

आम्ल जमिनीचा सामू हा कमी असतो आणि तो वाढवण्यासाठी चुनखडी किंवा डोलोमाइट चा वापर करावा. विम्ल जमिनीत सामू कमी करावा लागतो. विम्ल जमिनीत कमी करण्यासाठी जिप्सम, आयर्न पायराईट, प्रेसमड केक यांसारख्या भूसुधारकांचा वापर करावा. भूसुधारकांचा वापर केल्यावर सामू उदासीन पातळीत यायला कित्येक महिने किंवा वर्षे जातात, कारण जमिनीमध्ये एक सामूबल विरोधक नैसर्गिक ताकद असते तिला बफरिंग कॅपॅसिटी असे म्हणतात.

सामूचा जमिनीच्या फुलावर व पोतावर होणारा परिणाम

जमिनीचा सांग 6 ते 8 असल्यास जमिनीची घडण किंवा फुल टिकून राहते, परंतु सामू 8 च्या वर गेला तर जमिनीचे फुल बिघडू शकते.

WhatsApp Group Join Now

सामूच्या बदलामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मात दोष निर्माण होऊन पिकांच्या नैसर्गिक वाढीत अडथळे निर्माण होतात.

जमिनीचे फुल बिघडण्यास वेळ लागत नाही पण फुल किंवा घडण दुरुस्त होण्यास मोठा कालावधी लागतो व त्यामुळे जमिनीचे उत्पादनक्षमता घटून आर्थिक नुकसान होते.

जमिनीची घडण व्यवस्थित ठेवणे हा जमीन नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे.

जमिनीचा सामू वाढल्याने आणि जमीन चोपन बनते जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही.

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 सामू व सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता

बॅक्टेरियाना फार आम्लता मानवत नाही, तर बुरशींनां फार विम्लता मानवत नाही.

सेंद्रिय पदार्थांचे विघटन, युरिया खताचे नात्रीकरण, हवेतील नत्राचे स्थिरीकरण, इत्यादी प्रक्रिया या बॅक्टेरिया बुरशीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहतात.

सर्व तऱ्हेच्या सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता गांडूळाची कार्यक्षमता ही जमिनीचा सामू 6 ते 8 असताना जास्त प्रभावशाली असते.

रायझोबियम स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू हे देखील जमिनीचा सामू 6 ते 8 या मर्यादेत जास्त कार्यक्षम राहतात.

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 सामूचा पिकावर होणार परिणाम

जास्त आम्ल जमिनीत आम्लपनामुळे व जास्त विम्ल जमिनीत विम्लपणामुळे पिकाच्या मुळांवर व त्यांच्या पेशीवर विपरीत परिणाम होऊन ते निकृष्ट बनतात.

पिकांची बी उगवण क्षमता कमी होते.

आम्ल जमिनीतील लोह, ॲल्युमिनियम, तांबे यांचे प्रमाण वाढते व त्याचा विषारी परिणाम पिकांवर होतो.

काही बुरशीजन्य रोग आम्ल जमिनीतच होतात तसेच काही कृमी जंतूमुळे होणारे रोग जास्त आम्ल अथवा विम्ल जमिनीत होतात.

उसावरील केवडा रोग जास्त विम्ल जमिनीतच प्रामुख्याने आढळून येतात.

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 सामू व अन्नद्रव्य पदार्थांची उपलब्धता

पिकांना लागणारे सर्व आवश्यकता अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यात सामू चा मोठा वाटा आहे.

जमिनीच्या सामू थोडा जरी बदल झाला तरी विशिष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा एकदम कमी होतो व त्यामुळे पिकांची वाढ खुंटते.

सामूतील बदलामुळे सूक्ष्म जीवाणूंच्या कार्यक्षमतेत बदल होत असल्याने अन्नद्रव्य पुरवठा वर ही त्याचा विपरीत परिणाम होतो.

स्फुरद अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असेल तर जास्त असते.

जमिनीचा सामू हा 6 ते 9 च्या दरम्यान असेल तर पालाश व गंधक पिकांना योग्य प्रमाणात मिळू शकते.

बोरॉनचा पुरवठा पिकांना योग्य होण्यासाठी 5 ते 7 च्या दरम्यान असायला हवा, तसेच तांबे व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा ही सामू 5 ते 7 च्या दरम्यान असल्यास चांगला होतो.

सामू व जमिनीचे नियोजन

पिक उत्पादन वाढ ही जमिनीच्या सुयोग्य नियोजनावर अवलंबून राहते जमिनीच्या नियोजनाची दिशा ही जमिनीच्या सामूवर अवलंबून असते.

उत्पादन वाढीसाठी जमिनीत विद्राव्य क्षार नसणे, पाण्याचा चांगला निचरा होणे, सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा माफक प्रमाणात राहणे, जमिनीचे घडण सुस्थितीत राहणे, खतातून दिलेल्या अन्नद्रव्यांचे खनिजीकरण होणे, या गोष्टी साध्य कराव्या लागतात. खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

सामू जास्त किंवा कमी असल्यास तो उदासीन पातळीवर आणण्यासाठी जमीन भूसुधारते, भरकते, गांडूळखत, पीक फेरपालट, द्विदल पिकांचा फेरपालटात समावेश इत्यादी उपायांचा अवलंब करावा.

काही पिकांची आम्लता व विम्लता सहन करण्याची क्षमता

तीव्र आम्लता सहन करू शकणारी पिकेबटाटे, भात
मध्यम आम्लता सहन करू शकणारी पिकेनाचणी, गहू, मका, सोयाबीन, चवळी, टोमॅटो, राळा
थोडीशी आम्लता व थोडीशी विम्लता सहन करू शकणारी पिकेशर्करा कंद, फुलकोबी, वाटाणा, कोबी, गाजर

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment