सिल्क समग्र-2 योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी वाचा सविस्तर; Silk Samgr Yojana 2025

Silk Samgr Yojana 2025 केंद्र पुरसकृत “सिल्क समग्र-2” (ISDSI) अंतर्गत सन 2023-24 मधील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठीचा अखर्चित केंद्र हिस्सा रु. 88.895 लाख इतका होता.

Silk Samgr Yojana 2025

प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या 36 लाभार्थ्यांकरिता केंद्र हिस्सा रु. 33.81 लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा रु. 13.00 लक्ष असा एकूण रु. 46.80 लक्ष इतका निधी पुढील तक्त्यात नमूद केलेल्या बाबींसाठी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

सांगोला तालुक्यासाठी येत्या 10 एप्रिल पासून टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी सोडणार;

योजनेचे नावयुनिट कॉस्टलाभार्थी संख्याहिश्याचे प्रमाण (केंद्र: राज्य: लाभार्थी)केंद्र हिस्सा(4)राज्य हिस्सा (5)एकूण निधी (4+5)
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (250 अंडी पुंज क्षम ता) लागवड (2 एकर)1.20565:25:103.901.505.40
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (150 अंडी पुंज क्षम ता) लागवड (1 एकर)0.602065:25:107.803.0010.80
तुती रेशीम कीटक संगोपन पॅकेज (150 अंडी पुंज क्षम ता) लागवड (1 एकर) कीटक संगोपन गृह बांध कामासाठी सहाय्यता योजना (600 स्क्वे फुट)3.251065:25:1021.12 58.12529.250
किसान नर्सरी1.50165:25:100.9750.3751.350
एकूण रक्कम33.8013.0046.80

WhatsApp Group Join Now

Silk Samgr Yojana 2025 सदर योजना राबविताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे

  • सदर निधी केंद्र पूरसकृत “सिल्क समग्र-2” (ISDSI) सुधारित मानकांना दिलेल्या प्रशासकीय मंजुरी नुसार व त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनानुसार संचालक रेशीम यांनी खर्च करावा.
  • तसेच, ज्या योजनांसाठी व बाबींसाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध केला आहे. त्याच बाबींवर सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. वितरित करण्यात आलेल्या निधीतून झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्रीय रेशीम मंडळ व शासनास विहित मुदतीत सादर करण्याचे कार्यवाही संचालक (रेशीम) यांनी करावी.
  • सन 2024-25 या वित्तीय वर्षांमधील उपलब्ध तरतुदी मधून मागील वर्षातील निधी खर्च करताना, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम, प्रचलित अटी व शर्तीचे तसेच नियोजन विभाग वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीच्या अधिन राहून मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
  • सदर योजनेअंतर्गत अनुदान देताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्र) व इतर शासकीय योजनेअंतर्गत लाभ दिला नसल्याची खात्री करूनच पात्र लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही संचालक रेशीम यांनी करावी.
  • सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लाभार्थ्यांना अदा करण्याची कार्यवाही करावी.
  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेल्या बाबीअंतर्गत उभारण्यात आलेल्या मालमत्तेचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील.
  • Silk Samgr Yojana 2025 सदर योजनेचा लाभ दिल्यानंतर/ अंमलबजावणीनंतर प्रकल्प/ लाभार्थी केंद्रित घटकांचे व्हिडिओ दस्तऐवजीकरण करणे बंधनकारक असून याबाबतची कार्यवाही संचालक रेशीम यांनी करावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment