Shingada Pik 2025 राज्यात पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव/बोड्या मध्ये मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या शिंगाड्यापासून उच्च पोषणमूल्य असणारे विविध उप पदार्थ बनविले जातात.

पारंपरिक धानशेती सोबत शिंगाडा लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील बेरोजगारीवर देखील मात करता येऊ शकते.
सोलर प्लांटला एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर;
Shingada Pik 2025 तथापि शिंगाडा फळाचा कृषी पिकामध्ये समावेश नसल्याने शिंगाडा उत्पादक शेतकऱ्यांना इतर कृषी पिकांसाठी लागू असलेल्या योजनांचा लाभ होत नाही.

सद्य:स्थितीत पणन विभागाने आधीसूचनेद्वारे “शिंगाडा” याचा शेती उपजांचे कलम 2(1-अ) खालील अनुसूची मध्ये समावेश केला आहे.
Shingada Pik 2025 त्याचप्रमाणे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी शिंगाडा पिकाचा फळे व भाजीपाला या पिकामध्ये समावेश करण्याचे अभिप्राय संदर्भ क्र.5 अन्वये दिले आहेत.
या बाबीचा विचार करून शिंगाड्याला फळे व भाजीपाला संवर्गातील कृषी पीक म्हणून मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Shingada Pik 2025 शिंगाडा पिकास ‘फळे व भाजीपाला संवर्गातील कृषी पीक’ म्हणून मान्यता देण्यात आल्याने शिंगाडा पिकास, इतर कृषी पिकांना अनुनेय असलेल्या लाभ सवलती प्राप्त होतील.
त्या नुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त कृषी यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात येतील.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |