नवीन हंगामापूर्वी बाजारात शेतमाल आवक वाढली; तिळाला मिळाले उच्चांकी भाव!! Shetamal Bajar Bhav 2025

Shetamal Bajar Bhav 2025 अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच खुल्या बाजारात शेतमालाचे दर सतत घसरत आहेत. यंदा नेहमीप्रमाणे नवीन हंगाम सुरू होण्याआधी दर वाढण्याऐवजी घट होत आहे.

Shetamal Bajar Bhav 2025

Shetamal Bajar Bhav 2025 यवतमाळ येथील चिंतामणी खासगी बाजार समितीत तब्बल 2 हजार क्विंटल तूर, सोयाबीन, तीळ, गहू, चणे आदींची आवक वाढताना दिसली.

केळी पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन!!

Shetamal Bajar Bhav 2025 पुढील काही दिवसांत तूर, सोयाबीन, तीळ यांचा नवीन माल बाजारात येणार असल्याने दर आणखी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतमाल साठवून ठेवलेले उत्पादकही विक्रीसाठी धावत आहेत.

WhatsApp Group Join Now

गुरुवारी यवतमाळ-दारव्हा मार्गावरील चिंतामणी खासगी बाजार समितीत तब्बल 2 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली. बाजार हाऊसफुल झाला होता. सर्वाधिक आवक तुरीची (सुमारे 1,500 क्विंटल ) राहिली तर ,300 क्विंटल सोयाबीन, तसेच तीळ, चणे आणि गहू विक्रीसाठी आले.

Shetamal Bajar Bhav 2025 तुरीच्या दारात घट:

जून ते ऑगस्ट दरम्यान तुरीला नेहमी जास्त दर मिळतात, पण यावर्षी 8,000 रुपये क्विंटल पर्यंत गेलेले दर घटून आता 5,800 ते 6,370 क्विंटल इतके राहिले आहेत. पावसामुळे तुरीचा रंग बदलत असल्याने आणि दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला माल विक्रीसाठी सोडला.

सोयाबीनचे भाव कोसळले:

मागील वर्षाच्या हंगामातील सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांकडे साठा स्वरूपात आहे. ‘कधी दर वाढतील’ या अपेक्षेने थांबलेले शेतकरी आता तोटा टाळण्यासाठी विक्रीकडे वळले आहेत. 6 हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेले भाव आता फक्त 4,300 क्विंटल वर आले आहेत.

WhatsApp Group Join Now

तिळीला दिलासा, मिळाले उच्चांकी भाव:

दर घसरत असलेल्या तीळीला यवतमाळच्या खाजगी बाजारात गुरुवारी 8 हजार 500 ते 9 हजार 400 क्विंटल दर मिळाले. इतर धान्यांच्या तुलनेत तीळ पिकाला अजूनही चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तीळ विक्रीसाठी आणला.

शेतकऱ्यांची वाढती चिंता:

Shetamal Bajar Bhav 2025 शेतकऱ्यांचा साठवलेला माल बाजारात येऊ लागल्याने विक्रीसाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. दर आणखी घसरू नयेत, म्हणून उत्पादकांनी वेळीच शेतमाल विकण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या शेकऱ्यांपुढे योग्य दर मिळवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment