शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार!! Shet tale Yojana Anudan 2025

Shet tale Yojana Anudan 2025 पुणे: मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्यांसाठी 100 कोटींपैकी केवळ 15 कोटींचा निधी देण्यास कृषी विभागाने मान्यता दिली.

Shet tale Yojana Anudan 2025

Shet tale Yojana Anudan 2025 राज्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सुमारे 46 लाख 57 हजार 320 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यातून किती शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

हरभरा पिकातील कीड व्यवस्थापन!!

Shet tale Yojana Anudan 2025 राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षणग्रस्त, आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात ऑगस्ट 2019 पासून सिंचन योजना राबविण्यात येत होती.

WhatsApp Group Join Now

Shet tale Yojana Anudan 2025 ही योजना नोव्हेंबर 2021 पासून राज्यातील उर्वरित भागातही राबविण्यात येत आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचन अनुदानासोबतच वैयक्तिक शेततळे, अस्तरीकरण, हरितगृह उभारणी, शेडनेट उभारणी या घटकांसाठीही अनुदान देण्यात येते.

राज्य सरकारने 2025-26 मध्ये या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन पूरक अनुदान घटकासाठी 400 कोटी आणि वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.

मात्र, शेततळे अनुदानातील एक रुपयाही वितरित करण्यात आला नव्हता. याबाबत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यानंतर राज्य सरकारने तातडीने 15 कोटींचा निधी वितरणाचे आदेश दिले आहेत. आणि हा निधी शेततळे योजनेत ज्यांची निवड झाली त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Shet tale Yojana Anudan 2025 राज्यात शेततळे योजनेअंतर्गत आतापर्यंत 46 लाख 56 हजार 320 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

नवीन पद्धत लागू: Shet tale Yojana Anudan 2025

पूर्वी हि निवड लॉटरी पद्धतीने केली जात. त्यात अनेक पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बदल करण्यात आला.

यंदापासून ही नवीन पद्धत लागू करण्यात आली. मात्र, सरकारने या अनुदानापोटी निधी वितरण न केल्यामुळे अनुदानापासून वंचित रहावे लागत होते.

15 टक्केच वितरित: Shet tale Yojana Anudan 2025

सरकारने शेततळ्यांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात आता निधी देताना केवळ 15 टक्केच वितरित केला आहे.

त्यामुळे या मंजूर निधीतून किती शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची स्पष्टता अजून नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment