Shet Tale Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यात ठराविक भागासाठी सुरू करण्यात आली.

ही योजना आता संपूर्ण राज्यभर सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचना पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे.
जमीन ओलावा राहील, पाणी बचतही होईल, असे करा कमी खर्चात आच्छादन!
Shet Tale Yojana 2025 वित्त विभागामार्फत मंजूर
वर्ष 2024-25 मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तर तो तिच्या मर्यादित मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटींच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 300 कोटी व वैयक्तिक शेततळे घटकासाठी शंभर कोटी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Shet Tale Yojana 2025 अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरण
वर्ष 2024-25 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 529.50 लक्ष (रुपये पाच कोटी 29 लाख 50 हजार मात्र) निधी आयुक्त (कृषी) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वितरित करण्यात येत आहेत.
लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही महा-डी-बीटी प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय प्रणाली द्वारे जमा केली जाणार आहे.
529 लक्ष निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्य:स्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने योजनेत तरतूद केली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |