Shet Tale Plastic Anudan 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील.
राज्यात पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा, काय आहे IMD रिपोर्ट वाचा सविस्तर;
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.
WhatsApp Group
Join Now

Shet Tale Plastic Anudan 2025 पात्रता निकष
- लाभार्थी अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असावा.
- जात प्रमाणपत्र असावे.
- नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- सामूहिक शेत जमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
- इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- कमाल शेत जमीन मर्यादा 6.00 हेक्टर आहे.
- सातबारा आणि आठ-अ उतारा आवश्यक आहे.
- आधार कार्ड आवश्यक आहे.
- बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे.
- स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
- वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
- उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
- ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
Shet Tale Plastic Anudan 2025 आवश्यक कागदपत्रे
- सातबारा दाखल आणि आठ अ उतारा.
- 6 ड उतारा (फेरफार).
- जात प्रमाणपत्र.
- तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला.
- आधार कार्डची छायांकित प्रत.
- बँक पासबुकची छायांकित प्रत.
Shet Tale Plastic Anudan 2025 अर्ज कसा करावा
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो.
- ऑनलाइन अर्ज भरल्यावर लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने होते.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login |
संपर्क | अधिक माहितीसाठी आपल्या जवळील कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही संपर्क साधू शकता. |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |