घाटमाथ्यावर पेरणीपूर्वी मशागतींना वेग; कसे आहेत सध्या मशागतीचे दर? Shet Mashagat Mahiti 2025

Shet Mashagat Mahiti 2025 घाटनांद्रे : उन्हाळी अवकाळी पाऊस लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागती सध्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी मुळे आता पेरणीपूर्व मशागतीने घाटमाथ्यावर चांगलाच वेग घेतला आहे.

Shet Mashagat Mahiti 2025

सततच्या दुष्काळामुळे बैलांची संख्या रेडावल्याने सध्या सरास ट्रॅक्टरद्वारे मशागती केल्या जात आहेत. यावर्षी पाऊस वेळे अगोदर व समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने सध्या बळीराजाच्या फिलगुडीचे वातावरण आहे.

जमीन हिस्से वाटप मोजणी झाली स्वस्त, काय आहे निर्णय! वाचा सविस्तर; 

Shet Mashagat Mahiti 2025 उन्हाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागतींनीही आता अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्याने चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळे शिवार गजबजुन गेले आहेत.

WhatsApp Group Join Now

यामध्ये पालापाचोळा वेचणे, बांध बंदिस्त करणे, जमिनीची नांगरट, खुरपणी करणे, रोटर मारणे, नैसर्गिक खतांचा मात्रा देणे आधी कामे उरकून घेतली जात आहेत.

खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करावे, बी-बियाणे व खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.

कवठेमंकाळ तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र 21,374 हेक्टर इतके असून त्यापैकी पेरणी क्षेत्र 20,106 हेक्टर इतके आहे. पावसाविना खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगाम अवकाळी पावसामुळे कसाबसा तरला आहे.

WhatsApp Group Join Now

त्यामुळे बळीराजा अद्यापही अडचणी आला आहे. यावर्षी तरी खरीप हंगामात निसर्ग साथ देईल व खरीप हंगामातील पीक हाती येईल, या आशेवर बळीराजांनी बळीराजांनी शेती मशागतीला चांगलीच सुरुवात केली आहे.

बैल जोडीने अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैलच नाही त्यांना बैल जोडीचा शोध घ्यावा लागत आहे. यापेक्षा ट्रॅक्टर द्वारे मशागतीकडेच कल वाढला आहे.

Shet Mashagat Mahiti 2025 सध्याचे मशागतीचे दर पुढील प्रमाणे (प्रति एकर)

नांगरट करणे 3000 ते 3500 रुपये
रोटर मारणे1600 ते 2000 रुपये
पंजा (फण) मारणे1200 ते 1500 रुपये

इतर माहीतीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment