शेतजमीन वाटणी पत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ काय आहे निर्णय? वाचा सविस्तर; Shet Jamin 2025

Shet Jamin 2025 शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Shet Jamin 2025

सध्या नोंदणी फी ही शेती आणि बिगर शेती मिळकतीसाठी सारखीच आहे. ती एकूण मूल्याच्या 1 टक्केपर्यंत (कमाल 30 हजार/- रुपये) आकारली जाते. मात्र, शेती मिळकतीसाठी मुद्रांक शिल्लक नाममात्र 100 रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती.

मराठवाड्यात 3 दिवस वादळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर;

Shet Jamin 2025 यामुळे अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी टाळत होते व पुढे कायदेशीर वाद निर्माण होत होते. नव्या निर्णयाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल तसेच कुटुंबात वाद निर्माण होणार नाहीत.

WhatsApp Group Join Now

कायदेशीर नोंदणी झाल्याने मालकीचे स्पष्ट दस्तऐवजीकरण होईल. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबीयांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

Shet Jamin 2025 महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटींची घट

या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयांची गट येऊ शकते. मात्र, शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिळकत शेतजमीन असो की बिगरशेती यासाठी नोंदणी फी एक टक्के दराने आकारले जात होती. आता ही फी रद्द केल्याने वाटणी संबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. शेत नोंदणीला जलद चालना मिळेल. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री”

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment