‘शक्ती’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, पुढील तीन दिवस ‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस! Shakti Cyclone 2025

Shakti Cyclone 2025 नवी दिल्ली : बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे.

Shakti Cyclone 2025

अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल, 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकते.

पारंपारिक शेती परवडेना शेतकरी करीत आहेत शेतात नवनवे जुगाड!

Shakti Cyclone 2025 पावसाची कधी आणि कुठे शक्यता?

  • हवामान विभागाने 16 मे पर्यंत कर्नाटकातील आणि जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

WhatsApp Group Join Now

  • Shakti Cyclone 2025 कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे.
  • तसेच पुढील 24 तासांसाठी कोलकत्यात संध्याकाळी गडगडाटासह हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता आहे.
  • 13 आणि 14 मे दरम्यान गुजरात, कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अंतर्गत कर्नाटकात; तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, कराईकल, रॉयल सीमा, आंध्र प्रदेशातील किनारी भाग आणि यानम येथेही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment