आता सातबारावर येणार शेतकऱ्यांच्या पत्नीचे नाव, काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर; Satbara Utara 2025

Satbara Utara 2025 कोल्हापूर करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘लक्ष्मी मुक्ती’ योजना राबविण्यात येत आहे.

Satbara Utara 2025

या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्या ही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या स्थापनेला मंजुरी, शेतकऱ्यांना काय फायदा होणार!

Satbara Utara 2025 लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीमध्ये पत्नीचे सह हिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क घेतले जाणार नाही.

WhatsApp Group Join Now

Satbara Utara 2025 यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज.
  2. गटाचा सातबारा उतारा व 8-अ उतारा.
  3. आधार कार्ड प्रत.
  4. रेशन कार्ड प्रत.
  5. विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
  6. पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला.

वरील कागदपत्रे या योजनेसाठी सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार पती-पत्नीने वरील कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज करावा.

Satbara Utara 2025 पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून करवीरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान असा 100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम सुरू आहे.

त्या अंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष्मी मुक्ती योजना करवीर तालुक्यात राबविण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment