आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हाट्सअप वर; Satbara on Whatsapp 2025

Satbara on Whatsapp 2025 पुणे: राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता सेतू केंद्राचे उंबरटे मी झिजवण्याची गरज भासणार नाही.

Satbara on Whatsapp 2025

भुमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलत व्हाट्सअप वरून सातबारा, आठ अ उतारा, ई रेकॉर्ड यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केली आहे.

तुमच्याजवळ ‘फार्मर आयडी’ असेल तर ही फायद्याची सुविधा मोफत मिळेल!

Satbara on Whatsapp 2025 यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना माफक शुल्कात नोंदणी करता येणार आहे. महाभुमी संकेतस्थळावरून ही सुविधा थेट स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.

WhatsApp Group Join Now

यातून सुविधा केंद्र तसेच खाजगी व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक ठरेल.

राज्यात सातबारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. केवळ 15 रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यात राज्यातील शेतकरी आघाडीवर आहेत.

मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना एखाद्या सेतू किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन 15 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसे मोजावे लागतात.

WhatsApp Group Join Now

Satbara on Whatsapp 2025 त्यातही हा उतारा किंवा दाखला संबंधिताच्या संगणकावर डाऊनलोड होतो. त्यानंतर पेनड्राईव्ह मधुन शेतकऱ्याला द्यावा लागतो.

यात या उताराचा गैरवापर होण्याची भीती असते. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हाट्सअप वरून देण्याचे ठरवले आहे.

यासाठी महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक केवळ 15 रुपयात सर्व प्रकारचे दाखले मिळतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Satbara on Whatsapp 2025 डिजिटल योजनेचे स्वरूप

  • भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे. त्यात माहिती सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे.
  • यासाठी शेतकऱ्यांना महाभुमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • त्यात त्यांच्या जमिनीशी संबंधित असलेला अधिकार अभिलेखाची नोंदणी नोंद आवश्यक असेल.
  • अर्थात जमीन मालक असल्याचा पुरावा असणे आवश्यक्य असेल.
  • नोंदणीसाठी 50 रुपयांची शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होईल.

माहिती: नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे. प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून, भूमी अभिलेखांशी संबंधित कायदे, प्रक्रिया, कागदपत्रांची उपयोगिता यांची माहिती देण्यात येईल.

सुविधा: सातबारा उतारा 8 अ उतारा, फेरफारांची नोंद, इ रेकॉर्ड मधील माहिती हे दाखले नागरिक व्हाट्सअप वरून थेट डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकणार आहेत. यामुळे वेळेचे आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे.

सूचना: जमिनीच्या नोंदणीत बदल झाल्यास संबंधित मालकाला याची सूचना थेट आता व्हाट्सअप वर मिळणार आहे.

भूमी अभिलेख विभागाची ही सेवा राज्य सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला चालना देणारी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखांबाबत पारदर्शक व तात्काळ सेवा मिळाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर १५ जुलैपासून, तर राज्यस्तरावर एक ऑगस्टपासून सुरू होईल. -सरिता नरके, प्रभारी अतिरिक्त, जमाबंदी आयुक्त, पुणे”

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment