Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025 देहूगाव (जि. पुणे) श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहू मधील देऊळ वाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हाट्सअप वर;
ते म्हणाले की, यंदाचा 340 वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे.

त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिरात 42 व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
भजनी मंडपात सकाळी प्रस्तावनापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे.
Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025 कसा आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग!
Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025 यंदा संस्थाने तीन बैल जोड्या खरेदी केल्या आहेत. पालखी पुढे चालणारा मानाचा पेठ बाभूळ गावकऱ्यांचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार असून, बुधवारी प्रस्थान स्थळी उपस्थित होईल. अकलूजच्या मोहिते पाटील यांचा अश्व बुधवारी सकाळी देहू येथे दाखल होईल.
Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025 कुठे कधी मुक्काम?
18 जून | देहूतून प्रस्थान |
19 जून | आकुर्डी |
20 जून | नाना पेठ, पुणे |
21 जून | निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे |
22 जून | लोणी काळभोर |
23 जून | यवत |
24 जून | वरखंड |
25 जून | उंडवडी गवळ्याची |
26 जून | बारामती |
27 जून | सनसर |
28 जून | निमगाव केतकी |
29 जून | इंदापूर |
30 जून | सराटी |
1 जुलै | अकलूज |
2 जुलै | बोरगाव श्रीपुर |
3 जुलै | पिराजी कुरोली |
4 जुलै | वाखरी |
5 जुलै | पंढरपूर |
पालखी सोहळ्यात रंगणार तीन उभे, तीन गोल रिंगण
- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण.
- काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण.
- इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण.
- सराटी येथे पादुकांना निरास्नान.
- अकलूज येथे तिसरे गोल रिंगण.
- माळीनगर येथे पहिले उभे रिंगण.
- तोंडले बोंडले येथे दहावा.
- बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण.
- वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण.
- यंदा तिथींचा अक्षय झाल्याने अंथुर्णे येथील पालखीचा मुक्काम रद्द.
- यंदा पालखी रथाच्या पुढे 27 व मागे 370 दिंड्या सहभागी होणार.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |