सलोखा योजनेचा 1191 नागरिकांना मिळाला लाभ Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 सलोखा योजनेमुळे मागील दोन वर्षात राज्यात एकूण 1 हजार 119 दस्त नोंदविले गेले. या योजनेमुळे दस्तांना एकूण मुद्रांक शुल्कात 8 कोटी 65 लाख रुपयांची, तर नोंदणी फी मध्ये 1 कोटी 39 लाख रुपयांची माफी देण्यात आली. सलोखा योजनेमुळे 119 दस्तांना एकूण 10 कोटी 5 लाख रुपयांची माफी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, आता योजनेचा कालावधी संपुष्टात आला असल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी पुढे येत आहे.

Salokha Yojana 2025

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील अपापसांतील वाद मिटवण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. मात्र, एक हजार रुपये नोंदणी शिल्लक आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेत जमिनीची अदलाबदल करण्याची संधी या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती.

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनी धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ही योजना राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक दस्त म्हणजे प्रकरणे ही बुलढाणा जिल्ह्यात नोंदविण्यात आली. या जिल्ह्यात 84 दस्त नोंदविण्यात आले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 195 दस्त नोंदविण्यात आले.

रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर…

Salokha Yojana 2025 हा होता सलोख योजनेचा उद्देश…

जमिनीच्या कौटुंबिक वादांमुळे आणि पिढ्यांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून, अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने सलोखा योजना जानेवारी 2023 मध्ये आणली.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment