Safflower Seed Production Technology 2025 करडई हे रब्बी हंगामातील तेलबिया पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. करडईचे पीक कोरडवाहू तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती जमिनीत सुद्धा घेतले जाते. करडई पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीतील पाणी व अन्नद्रव्य शोषून घेतात. त्यामुळे पाण्याचा ताण पडला तरी पिकाच्या वाढीवर परिणाम होत नाही, तसेच करडईचे तेल मानवी आरोग्यास चांगले आहे. त्यामुळे तेलाच्या बाजारपेठेत करडईच्या तेलास अधिक मागणी व भाव आहे.

महाराष्ट्रातील एकूण लागवडी योग क्षेत्रांपैकी 1 ते 3 क्षेत्र हे आवर्षणप्रवण म्हणून ओळखले जाते. अशा क्षेत्रात करडईचे पीक अधिक फायदेशीर ठरते. कडेच्या लागवडीसाठी सुधारित वाणांचा वापर करणे उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सुधारित वाणांचा वापर केल्यास कोरडवाहू परिस्थितीत प्रती हेक्टरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत तर बागायती क्षेत्रात 18 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. सुधारित वाणांच्या वाढत्या मागणीमुळे बाजारपेठेत सुधारित वाणांचा तुटवडा निर्माण होतो.
पेरणीपूर्वी सोयाबीनच्या बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी तपासणे!!
त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःच बीज उत्पादन कार्यक्रम राबविला तर त्यांना शुद्ध बियाणे उपलब्ध होऊ शकेल. करडई पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती करून घेऊन बीजोत्पादन कार्यक्रम राबवला तर शेतकरी बांधवास नक्कीच फायदेशीर ठरेल. त्या अनुषंगाने सदर लेखात करडई बिजोत्पदानाच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिलेली आहे.

करडई पिकाचे प्रती हेक्टरी उत्पन्न व शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी योग्य हवामानाची निवड जमीन, पूर्व मशागत पेरणी, रासायनिक खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन, अंतर मशागत, पीक संरक्षण, या बाबी बरोबरच भेसळी झाडे काढणे, विलगीकरण, अंतर राखणे, काढणी, मळणी व साठवणूक इत्यादी बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवले पाहिजे.
जमीन: Safflower Seed Production Technology 2025
करडई पिकासाठी मध्यम ते खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी ओल टिकवून ठेवणारी जमीन निवडावी.
हवामान: Safflower Seed Production Technology 2025
या पिकास थंड हवामान अधिक मानवते उष्णता प्रमाणाचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तसेच पीक वाढीच्या अवस्थेत जास्त पाऊस जमिनीत साचलेले पाणी या पिकास अपायकारक ठरते.
पूर्व मशागत:
कोरडवाहू क्षेत्रात या पिकाची लागवड करावयाची असल्यास खरीपातील पीक काढणीनंतर कमीत कमी मशागत करून जमीन पेरणीसाठी तयार करावी. जेणेकरून जमिनीतील ओल कमी होणार नाही. बागायती क्षेत्रासाठी एक नांगरट व 2/3 कुळव्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. उत्पादनासाठी निवडलेल्या क्षेत्रांमध्ये पूर्वीचे हंगामात करडईचे पीक घेतलेले नाही. तसेच शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 4/5टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

बियाणे: Safflower Seed Production Technology 2025
बियाणे नेहमी मान्यता प्राप्त विक्रेत्याकडूनच द्यावे. प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे तर पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत प्रकारचे बियाणे वापरावे बियाणे घेताना पिशवीवरील खून व्यवस्थित तपासून घ्यावा टॅग वरील बीज परीक्षणाची तारीख पाहून घ्यावी. बियाणे खरेदी करताना नेहमी पावती घ्यावी.
पेरणी करताना बियाणाचा थोडा नमुना जपून ठेवावा. पेरणी झाल्यानंतर सात दिवसाच्या आत जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे बीज उत्पादन क्षेत्राची नोंदणी करावी. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आणि शुल्काची माहिती जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे मिळू शकते.
विलगीकरण अंतर:
करडई हे स्वपरागसिंचित पीक आहे तरीसुद्धा यामध्ये कीटकाद्वारे, हवेद्वारे 10 ते 20 टक्के परपरागीकरण होऊ शकते. म्हणून पायाभूत बीज उत्पादन क्षेत्रांमध्ये त्याच पिकाच्या इतर वाणांपासून 400 मीटरचे विलगीकरण अंतर राखावे तर प्रमाणित बीज उत्पादनाकरिता हेच अंतर 200 मीटर राखण्यात यावे.
पेरणी: Safflower Seed Production Technology 2025
आवर्षण प्रमाण क्षेत्रात या पिकाची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावी इतरत्र सप्टेंबरचा दुसरा आठवडा ते ऑक्टोबर चा पहिला आठवडा यादरम्यान पेरणी करावी. स्थानिक हवामानानुसार पेरणीचे नियोजन अशा प्रकारे करावी की जेणेकरून फुलोऱ्यानंतर पीक पावसात सापडणार नाही. बियाणे पेरताना 5 सेंटिमीटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
हेक्टरी बियाणे:
भारी जमिनीकरिता हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे व मध्यम जमिनीसाठी हेक्टरी 12 किलो बियाणे वापरावे.
पेरणीचे अंतर: Safflower Seed Production Technology 2025
या पिकाची पेरणी तीफणीने करावी अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी यंत्रणे करावी पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व दोन झाडांमधील अंतर 20 सेंटिमीटर इतके राहील याची काळजी घ्यावी.
बीजप्रक्रिया: Safflower Seed Production Technology 2025
बीज प्रक्रिया केल्यास बियाण्याचा जोम वाढतो तसेच पीक वाढीच्या वेळेस उद्भवणाऱ्या रोगापासून संरक्षण मिळते. करडई बियाणास प्रति किलो 2.5 ते तीन ग्रॅम थायरम अथवा कॅप्टन अथवा कार्बेडीझीम यापैकी एका बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्याचबरोबर ट्रायकोडर्मा या जैविक संवर्धनाची 4 ते 5 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास मर रोगापासून होणारे नुकसान टाळता येते.
रासायनिक खते:
करडई पीक रासायनिक खतांस उत्तम प्रतिसाद देते कोरडवाहू करडईच्या पिकास प्रति हेक्टरी 50 कि.ग्रॅ. नत्र व 35 कि.ग्रॅ. स्फुरद देण्यात यावे. बागायती क्षेत्रासाठी 75 कि.ग्रॅ. नत्र व 50 कि.ग्रॅ. स्फुरद देण्यात यावे. अर्ध नत्र आणि संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळेस द्यावे व उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी देण्यात यावे.
विरळणी: Safflower Seed Production Technology 2025
पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी विरळणी आणि करून एका जागेवर एक जोमदार झाड ठेवावे. विरळणी केलेली करडईची झाडे भाजी म्हणून विकली तर त्यातून आर्थिक लाभ ही होतो.

पाणी व्यवस्थापन:
या पिकास पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणीपूर्वी पाणी देऊन चांगला वापसा आल्यावरच पेरणी करावी पेरणीनंतर साधारणपणे दोन पाण्याचा पाळ्या द्याव्यात म्हणजे उत्पन्न चांगले येते. पहिले पाणी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावी तर दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावी या पिकास एकूण 25 ते 30 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
अंतर मशागत: Safflower Seed Production Technology 2025
शुद्ध बीज उत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेले बियाणांचे निकष पाळणे खूप गरजेचे असते. करडईच्या पायाभूत बियाणांमध्ये तणाचे बी 5 नग प्रति किलो पेक्षा जास्त व प्रमाणित बियाणांमध्ये 10 नग प्रति किलो पेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरते त्यामुळे बीज उत्पादन क्षेत्र दोन विहिरीत ठेवणे गरजेचे असते.
आवश्यकतेनुसार 20-25 दिवसांनी पहिली निंदणी करावी नंतर 40-45 दिवसांनी दुसरी निंदणी करावी त्याचप्रमाणे निंदणीनंतर कोळपणी केल्यास जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. मजुरांचा अभाव असल्यास फ्लूयुक्लोरण या तणनाशकाचा वापर क्रियाशील घटक 0.75 ते 1.0 कि.ग्रॅ. प्रति हेक्टर 600 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
भेसळीचे झाडे काढणे:
बियाणाची अनुवंशिक शुद्धता टिकवण्याकरिता बीजउत्पादन क्षेत्रातील जातीच्या गुणधर्म व्यतिरिक्त इतर गुणधर्म असलेली झाडे फुलोऱ्यापूर्वी काढून नष्ट करावीत. झाडाची गुणधर्म पानाचा आकार, पानाचा काटेरीपणा, फुलाचा रंग बोंडाचा आकार, फांद्याची रचना, झाडाची उंची इ. बाबींवरून ओळखता येते. उदा. भीमा, शारदा, गिरणा या जाती काटेरी असतात, तर नीरा-6 एस एस एफ 658 या जाती बिना काट्याच्या असतात. शारदा गिरणा या जातीच्या फुलांचा रंग पिवळा असतो तर भीमा या जातींच्या पानाचा रंग पिवळसर पांढरट असतो अशा प्रकारे गुणधर्माची माहिती घेऊ नका भेसळीची झाडे ओळखून ती नष्ट करावेत त्याचबरोबर रोगग्रस्त झाडे सुद्धा उपटून टाकावी.
बीजोत्पादन क्षेत्र तपासणी:
बीज प्रमाणीकरण यंत्रनेकडे बीज उत्पादन क्षेत्राची नोंदणी केल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी 3-4 वेळेस बीज उत्पादन क्षेत्राची तपासणी करतात. यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निकषाप्रमाणे बीजउत्पादन आहे किंवा नाही हे तपासले जाते. पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी या अधिकाऱ्यांकडून भेसळ झाडे काढण्याबाबत मार्गदर्शन द्यावे. तसेच वेळोवेळी त्यांना पिकाच्या अवस्थे बाबत माहिती द्यावी.

अशाप्रकारे तयार होणाऱ्या शुद्ध व दर्जेदार प्रतीचे अपेक्षित उत्पन्न प्राप्त होते. शेतकरी बांधवांनी या माहितीचे अवलोकन करून करडईचे बीजउत्पादन कार्यक्रम राबविल्यास त्यांना स्वतःचे खात्रीदायक शुद्ध व दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊ शकेल व त्याचबरोबर बियाणांच्या विक्री पोटी अधिक फायदाही होईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |