आता कृषीपूरक व्यवसायांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 50 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज, वाचा सविस्तर; Rojgar Nirmiti Yojana 2025

Rojgar Nirmiti Yojana 2025 शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जास्तीत जास्त युवक युवतींना सहभाग घेऊन यशस्वी उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून योजनेमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.

Rojgar Nirmiti Yojana 2025

नव्या सुधारणा नुसार स्वयंम रोजगार व उद्योग उभारू इच्छिणाऱ्या युवक, युवतींना आता 50 लाखांपासून ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळणार आहे.

MSP जाहीर केल्यानंतर सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर;

Rojgar Nirmiti Yojana 2025 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगार व उद्योग धंदा करू ठरणाऱ्या युवकांना संधी देणारी नवसंजीवनी ठरली आहे. या योजनेचा लाभ हजारो तरुणांना झाला आहे.

WhatsApp Group Join Now

सध्या वाढणारी सुशिक्षित युवक, युवतीच्या संख्या आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेऊन शासनाने या योजनेत काही सुधारणा केलेल्या आहेत.

या नव्या सुधारणामुळे या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार व उद्योगांसाठी पूर्वीपेक्षा जादा कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच शासनाकडून दिली जाणाऱ्या सबसिडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. यामुळे बेरोजगारांना आता दिलासा मिळालेला आहे.

Rojgar Nirmiti Yojana 2025 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील सुधारणा!

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये वयोमर्यादेची वाढ करून 18 वर्षांपूर्वी सर्व स्थानिक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • खेळत्या भांडवलाची मर्यादा वाढवली असून सेवा उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के आणि उत्पादन उद्योगासाठी 40% पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
  • सर्व सेवा उद्योग व कृषी पूर्व पूरक उद्योग व्यवसायासाठी आता 50 लाखापर्यंत तर उत्पादन उद्योगासाठी तब्बल एक कोटी पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • या योजनेमध्ये नव्याने कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल ढाबा, होम स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय आधीच समावेश करण्यात आला आहे.
  • शिक्षणाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. आता 10 लाखांवरील उत्पादन प्रकल्पासाठी आणि 5 लाखांवरील सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी फक्त 8 वी पास असणे आवश्यक असणार आहे.
  • व्यवसाय प्रशिक्षणासाठी निवासी किंवा ऑनलाईन निवडीचा पर्याय देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment