रोजगार हमी योजनेत काम न मिळाले तर कसा मिळतो बेरोजगारी भत्ता, जाणून घ्या सविस्तर; Rojgar Hami Yojana 2025

Rojgar Hami Yojana 2025 ग्रामीण भागातील स्वच्छेने काम करायला तयार असलेला प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे.

Rojgar Hami Yojana 2025

WhatsApp Group Join Now

केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रत्येक कुटुंब 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देते. महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते.

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याची विक्रमी आवक; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर;

Rojgar Hami Yojana 2025 ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे. ज्यामध्ये घरातील सर्व प्रौढ सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असतात.

जेणेकरून ते कामाची मागणी करू शकतील आणि काम मिळवू शकतील. जॉब कार्डमध्ये संबंधित कुटुंबाने केलेल्या कामाचे आणि मिळवलेल्या मजुरी इत्यादीचे तपशील नोंदवले जातात.

WhatsApp Group Join Now

मजुराने काम मागणी केल्यानंतर 15 दिवसांचे काम उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मजुराला मग्रारोहयोच्या नियमानुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे. एखाद्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाची माहिती करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते.

Rojgar Hami Yojana 2025 ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्याला ग्रामसभेत सहभागी होण्याचा आणि त्यांच्या ग्रामपंचायतीसाठी मनरेगाअंतर्गत घेण्यात येणारी कामे आणि प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार आहे.

Rojgar Hami Yojana 2025 मजुराला तिच्या/त्याच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या आज काम देणे आवश्यक आहे. राहत्या घरापासून 5 किलोमीटरच्या पलीकडे कामाचे वाटप केले असल्यास, मजुराला प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे. – प्रगती जाधव-पाटील, उपसंपादक”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment