Rice Farming 2025 भारत हा कृषिप्रधान देश असून भात हे अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्र मध्ये कोकणपट्टी मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, या भागात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. सध्या भाताची उत्पादकता 2.1 टन प्रती हेक्टर आहे. बहुतांशी शेतकरी बांधव भाताचे उत्पादकता वाढवण्याकरिता रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात. परंतु त्यांना हवे तसे उत्पादन मिळत नाही.

Rice Farming 2025 सध्या बाजारात असलेल्या खतांचा तुटवडा व काही वेळा भेसळयुक्त खत वापरल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान याचाही विचार करणे गरजेचे बनले आहे. मुख्यतः भात शेतीत साठी नत्राचा वापर केला जातो. भात शेतीच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची गरज असल्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा संचय केलेला असतो.
पालेभाज्या लागवड साधा!!
Rice Farming 2025 आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अशा वेळी भातशेतीला एकाच वेळी नत्राचे पूर्ण मात्रा दिल्यास बरेचदा शेतात वापरलेले नत्र पावसामुळे पाण्यासोबत वाहून जाते. किंवा त्याचे विनायट्रीकरण होऊन वाया जाते. परिणामतः पिकांमध्ये नत्राची कमतरता दिसून येते. आणि त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

दुसरी बाजू अशी जरी आपण दिलेले नत्र शेताला उपलब्ध झाले तर अमर्यादित वापरामुळे शेतात किडींचे व रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी समस्या उभी राहते यासाठी भात संशोधन निर्देशालयाने भात पिकांमध्ये आवश्यकतेनुसार नत्राची उपलब्धता करून देण्यासाठी कलर चार्टचा वापर करण्यास सुचवले आहे.
Rice Farming 2025 लीफ कलर चार्ट:
एलसीसीची पट्टी ही 6 इंच लांबीची उच्च प्रतीच्या प्लास्टिक पासून बनवलेले पट्टी असून, ती सर्व शेतकऱ्यांना वापरण्यास अगदी सुलभ आहे. या पट्टीवरील रंगछटा एकूण 1 ते 6 या मापनामध्ये असून त्या मोजता येतात. पट्टीवरील रंगछटा पिवळसर हिरव्या ते गडद हिरव्या अशा 6 रंगछटा असतात. पिकाच्या पानासोबत जुळवून पिकाला नत्राची गरज आहे की नाही व किती प्रमाणात नत्राचा पुरवठा करावा हे ठरवता येते.

Rice Farming 2025 वापरण्याची पद्धत:
भात शेतात इंग्रजी झेड किंवा एस आकारात येणारा 10 निरोगी रोपांची निवड करावी.
भाताच्या शेंडाकडील सर्वात लांब व विस्तार पावलेली व कीड-रोगमुक्त पाण्याची निवड करावी.
शक्यतो निवड केलेल्या पाण्याचा मधला भाग रोपापासून न तोडता कलर चार्टवर ठेवून पाण्याचा रंग चार्ट वरील रंगाशी जुळवून त्याची नोंद 1 ते 6 रंगछटा दरम्यानच्या मापकामध्ये करावी.
लीफ कलर चार्ट चा वापर करताना शक्यतो रोपाच्या किंवा शरीराच्या सावलीत धरावा म्हणजे सूर्यप्रकाशाचा परिणाम मापनावर होणार नाही.
दरवेळी मापनाच्या वेळी त्याच शेतकऱ्याने दिवसाच्या ठराविक वेळीच म्हणजे दरवेळी सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान किंवा दुपारी 2 ते सायंकाळी 4 या वेळेस मापन करावे.
भात लावणी नंतर 14 दिवसानंतर ते पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत दर आठवड्यात या लीफ कलरचा चार्ट वापर करावा.
साधारणपणे लावणीच्या वेळेस हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश ची मात्रा द्यावी. उर्वरित खताचा हप्ता फुटवे येण्याच्या वेळेस ( लावणीनंतर 30-40 दिवसानंतर ) 40 किलो नत्र व पीक फुलोऱ्यात असताना ( लावणी नंतर 70-80 दिवसानंतर) 20 किलो नत्र देण्यात यावी.
जर घेतलेल्या नोंदी मधील 6 किंवा त्यापेक्षा जास्त पानांच्या नोंदी निर्णायक लीफ कलर चार्ट मापनापेक्षा खाली असल्यास नत्राची मात्रा चार्ट सोबत दिलेल्या कोष्टकात नमूद केलेल्या शिफारसीनुसार द्यावी.
लीफ कलर चार्ट पट्टी:
Rice Farming 2025 पानाद्वारे रोपांमधील अचूक मात्र तपासण्याचे साधन.

वापरण्याचे फायदे:
पावसामुळे पाण्यातून होणारा नत्राचा अपव्यय कमी होऊन पाण्याची प्रदूषण टाळता येते.
गरजेनुसार पिकाला योग्य प्रमाणात नत्राचा पुरवठा केल्यामुळे नत्राच्या खर्चात बचत होते.
लीफ कलर चार्टच्या वापरामुळे नत्राचा अतिरिक्त वापर टाळता येऊन पिकांवरील किडी व रोगांवर प्राथमिक स्वरूपात अटकाव करता येतो.
पिकाच्या आवश्यकतेनुसार नत्राचे मात्रा दिल्यामुळे पिकाची वाढ योग्यरित्या होऊन उत्पादन वाढीस मदत होते.
लीफ कलर चार्ट पट्टी शेतकऱ्यांना वापरण्यास सुलभ व स्वस्त आहे. ते भातपिका व्यतिरिक्त मका, ज्वारी, गहू, बटाटा, कापूस, मोहरी, तसेच गळीत धान्य व भाजीपाला पिकांमध्ये ही वापरू शकतो.
हरितगृहातून उत्सर्जित होणाऱ्या वायूचे प्रदूषण रोखता येईल.
शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा नत्र खताच्या सबसिडीवर खर्चाची बचत केली जाऊ शकते.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |