कपाशी वरील लाल्या (तांबेरा), कारणे व त्याचे व्यवस्थापन!! Red Rot in Cotton 2025

Red Rot in Cotton 2025 अलीकडील काळात कपाशीमध्ये उद्भवलेल्या प्रमुख समस्यांमध्ये लाल्या ही एक गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रात व मराठवाड्यात पांढरे सोने म्हणून ओळखपत्रिका वरील आल्यावर विकृतीचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Red Rot in Cotton 2025

Red Rot in Cotton 2025 त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यासाठी लाल्या म्हणजे काय? त्याची लक्षणे, कारणे व त्यावरील उपाययोजना हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

बटाटा लागवड!! Potato Crop 2025

लाल्या म्हणजे काय?

Red Rot in Cotton 2025 प्रारंभी पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात शेवटी गळून पडतात. लाल्या हा कपाशीचा रोग नसून अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे त्यातही मुख्यत्वे नत्र, मॅग्नेशियम, जस्त व अन्य कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे.

WhatsApp Group Join Now

Red Rot in Cotton 2025 लाल्याची संभाव्य कारणे

पूर्वी कपाशी घेतलेल्या शेतात परत कपाशी घेणे.

ऊस, केळी यांसारख्या जास्त अन्नद्रव्यांची गरज असणार्‍या पिकानंतर त्या शेतात कपाशीचे पीक घेतल्यास कपाशीस आवश्यक त्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळण्याची शक्यता कमी असते.

हलक्या जमिनीत कपाशीचे लागवड केल्यास लाल्या दिसून येतो.

जमिनीत पाणी साचून राहिल्यास किंवा पाण्याचा जास्त काळ ताण पडल्यास झाडे जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम व जस्तासारखी आवश्यक्य मूलद्रव्य व्यवस्थापनाकरिता शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे लाल्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Red Rot in Cotton 2025 प्रामुख्याने बोंडे धरण्याच्या अवस्थेत पानांमध्ये नत्राची जास्त गरज असते. या काळात पानांमधील नत्राचे प्रमाण 1.5% पेक्षा कमी झाल्यास पाने लाल होतात.

WhatsApp Group Join Now

बीटी जणूकामध्ये बोडांचे बोंडआळी पासून संरक्षण होते. परिणामी झाडांवर जास्त बोंडे टिकून राहतात या बोंडांना पोषणासाठी जास्त नत्राची गरज असते. झाडास जमिनीतून आवश्यकते त्या प्रमाणात नत्र न भेटण्यास नत्राची गरज पाण्यातून भागवली जाते. यामुळे पाण्यातील नत्राचे प्रमाण कमी होऊन ती लाल पडू लागतात.

पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाच्या कालावधीत काही प्रमाणात कमी होतो व पाने लाल पडल्याचे दिसून येते.

साधारणता ऑक्टोबर व त्या पुढीलपैकी महिन्यात तापमान अचानक कमी झाल्यास (21 पेक्षा किंवा रात्रीचे तापमान 15 सेल्सियस पेक्षा) कमी झाल्यास अँथ्रोसायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य पानात जमा होते, व पाणी लाल दिसू लागतात.

कपाशीवरील तुडतुड्यांचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पान सुरुवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पान लालसर दिसते.

Red Rot in Cotton 2025 व्यवस्थापन:

  1. कपाशीसाठी योग्य जमिनीची निवड करावी. हलक्या जमिनीत कपाशीसाठी घेऊ नये.
  2. पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे आणि साचल्यास त्वरित चर काढून ते पाणी शेताबाहेर काढावे.
  3. खताची मात्रा शिफारसीप्रमाणे द्यावी. नत्राची मात्रा कोरडवाहूसाठी 2 वेळा व बागायतीसाठी 3 वेळा विभागून देणे अतिशय आवश्यक आहे.
  4. पाते लागणे, बोंडे भरणे, इत्यादी. सारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत 2 ते 3 वेळेस 2 टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
  5. लाल्याची लक्षणे दिसताच 40 ग्रॅम 10 लिटर या प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेटच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात किंवा 20 ते 30 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे.
  6. रसशोषक किडी आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्याबरोबर योग्य त्या अंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून त्याचे वेळीच नियंत्रण करावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment