तांबडा भोपळा लागवड!! Red Pumpkin Cultivation 2025

Red Pumpkin Cultivation 2025 कोकणात तसेच देशावरही ग्रामीण भागात झोपड्यांवर, कौलारू घरांच्या छतावर तांबड्या भोपळ्याचे आच्छादन आजही दिसून येते. हे भाजीपाला परसबागेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या पिकाची लागवड अजूनही बांधांवर किंवा फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणूनच केली जाते.

Red Pumpkin Cultivation 2025

Red Pumpkin Cultivation 2025 भरपूर उत्पादन, उत्तम साठवण क्षमता, या गुणधर्मामुळे तांबडा भोपळा शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तांबड्या भोपळ्यांमध्ये अ आणि क जीवनसत्व, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. दक्षिण भारतात सांबर बनवण्यासाठी या भाजीला विशेष मागणी असते. विविध देवस्थानांची प्रसादालये, मोठी रेस्टॉरंट अशा ठिकाणी याची मागणी नियमित असते.

जमीन सुधारक जिप्सम!! Soil Improver Gypsum 2025

Red Pumpkin Cultivation 2025 महाराष्ट्रात यांच्या कोवळ्या फळांपासून भाजी बनवले जाते. तर पूर्ण वाढ झालेल्या तांबड्या भोपळ्याचा वापर सांबर बनवण्यासाठी तसेच विविध गोड पदार्थ बनवण्यासाठी करतात. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पितृपंधरवडा नवरात्रीसाठी या भाजीला प्रचंड मागणी असते. त्या दृष्टीने लागवडीचे नियोजन करणे आवश्यक ते ठरते.

WhatsApp Group Join Now

हवामानाने लागवडीचा हंगाम: Red Pumpkin Cultivation 2025

समतोष्ण हवामानात हे पीक चांगले येते कडाक्याच्या थंडीमध्ये हे पीक टिकाव धरू शकत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य तापमान भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक ठरतो. उन्हाळी हंगामातील लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. जास्त पाऊस व दमट हवामान केवडा आणि भुरी रोगांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरते. कडक थंडीमध्ये तांबड्या भोपळ्याला फळ धारणा होत नाही.

जमीन पूर्व मशागत व लागवड: Red Pumpkin Cultivation 2025

तांबड्या भोपळ्यासाठी हलकी ते मध्यम काळी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन फायदेशीर ठरते. खारवट व चोपण जमीन या पिकासाठी वापरू नयेत रेताड जमिनीत खरीप हंगामातील लागवड फायदेशीर ठरते. तर सूत्रकृमी आणि मर रोगाचे जंतू असणाऱ्या जमिनी या पिकासाठी वापरू नयेत उन्हाळी हंगामात हलक्या जमिनीत पाण्याचा तडकण्याची शक्यता असते.

पूर्व मशागत करताना जमीन उभे आडवी नांगरून घ्यावी. कुळव्याच्या दोन पाळ्या देऊन तन वेचून घ्यावे. सरी पाडताना दोन ओळीतील अंतर 5 मीटर ठेवावे सऱ्या 50 ते 60 सेमी रुंदीच्या पाडाव्यात जमिनीच्या उतारानुसार 5 ते 6 मीटर अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट तयार करावेत.

WhatsApp Group Join Now

पूर्व मशागतीच्या वेळी मिनीत चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 25 ते 30 टन टाकावे. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी पेंड जमिनीत मिसळून टाकावी. शेनखताचे कमतरता असल्यास लागवडीसाठी आळे तयार करताना प्रत्येकाळ्यात दोन-तीन ओंजळी शेणखत टाकावे. तसेच हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाशची मात्रा द्यावी. ही रासायनिक खते व शेणखत जमिनीत चांगले मिसळावीत.

Red Pumpkin Cultivation 2025 सरीवर आळे तयार करताना दोन आळ्यातील अंतर एक मीटर ठेवावे. प्रत्येक पाण्यात 2 ते 3 बिया टोकाव्यात व नंतर पाणी द्यावे. बी टोकण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून घ्यावे. तसेच पेरणीपूर्वी थायरम 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांना चोळावे, नंतर लागवड करावी.

सुधारित जाती Red Pumpkin Cultivation 2025

तांबड्या भोपळ्यामध्ये बहुतेक स्थानिक जातींचीच लागवड केली जाते. त्यात मृदुंग आकाराची फळे असणाऱ्या तसेच किंचित चपट्या आकाराचे फळे असणाऱ्या जाती पसंत केल्या जातात. भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बंगळूर येथून काही जाती विकसित केल्या आहेत.

अर्का सूर्यमुखी : या जातीची फळे लहान, 1 किलो, गोल दोन्ही बाजूने चपटे असून रंग गडद नारंगी पिवळा असतो. उत्तम स्वाद, गराचा आकर्षक पिवळा रंग आणि फळमाशी या किडीस प्रतिकारक अशी ही जात असून हेक्टरी 335 क्विंटल उत्पादन मिळते.

अर्का चंदन : फळ मध्यम 2.5 ते 3.5 किलो आकाराने गोल व दोन्ही बाजूने किंचित दबलेले असते. सालीचा रंग तपकिरी असून फळ तयार होताना त्यावर पिवळसर चट्टे असतात. गर घट्ट आकर्षक असतो. हेक्‍टरी 325 क्विंटल उत्पादन मिळते.

बाजारामध्ये किंवा कृषी सेवा केंद्रांमध्ये विविध प्रकारचे सुधारित वाण आणि खाजगी कंपन्यांचे संकरित वाण उपलब्ध आहेत. आपल्या शेजारील शेतकरी किंवा नेहमी तांबडा भोपळा पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवावरून जातीची लागवडीसाठी निवड करावी.

हेक्टरी बियाणे:

Red Pumpkin Cultivation 2025 लागवडीचे अंतर 5 1 मीटर ठेवल्यास चार ते पाच किलो बियाणे पुरेसे होते.

वरखते आणि अंतर मशागत:

इतर वेलवर्गीय पिकांपेक्षा वरखतांची मात्र तांबड्या भोपळ्यात कमी लागते, कारण यामध्ये फळांची तोडणी वारंवार करता येत नाही. लागवडीपूर्वीच्या मात्रे व्यतिरिक्त हेक्‍टरी 50 किलो नत्र दोन हप्त्यांमध्ये अनुक्रमे शेंडे सुटल्यावर फळे धरू लागल्यानंतर द्यावे. गरजेप्रमाणे दर दोन पाळ्याच्या पाण्यानंतर जमीन भुसभुशीत करावी.

पाणी व्यवस्थापन:

वेलवर्गीय भाज्यांना इतर भाजीपाला पिकांच्या मानाने पाणी कमी लागत असेल तरी आर्थिक दृष्ट्या परवडणारे उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने नियमित पाणी देणे गरजेचे आहे. खरीप लागवडीस आवश्यकतेनुसार 8 ते 12 दिवसांनी तर उन्हाळी पिकास 5 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे.

प्रमुख रोग:

केवडा डाऊनी मिल्ड्यू : रोगट वेलीची पाने लहान राहतात व त्यावर हिरवे पिवळे पट्टे दिसतात. रोगट पाने करपून गळून पडतात. कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा कार्बनडिजाइन 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

भुरी : पाण्याच्या दोन्ही बाजूंना पिठासारखे पांढरे बुरशी वाढते नंतर ती वेलीवर सर्व ठिकाणी पसरते. रोगाचे प्रमाण वाढले की पाने पिवळी होऊन गळून पडतात. त्यासाठी कालिक्झिन 5 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

प्रमुख किडी:

मावा : हि कीड पानातून रस शोषून घेते त्यामुळे पाणी आकसतात. अंगातून चिकट गोड द्रव पाझरतो त्यामुळे प्रकाश सौश्लेषण कार्य थंडावते.

तांबडे भुंगरे : लहान झाडावर ही कीड आढळून येते तांबड्या नारंगी रंगाचे किडे झाडाचे अंकुर खातात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 इसी. 15 प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

फळ माशी : माशी कोवळ्या फळांवर अंडी घालते अंड्यातून बाहेर आलेली अळी फळाला छिद्र पाडते व आत शिरून फळातील गर खाते अशा रीतीने कीडलेले फळ वेढव दिसते नियंत्रणासाठी क्ल्यू ल्यूरचे एकरी 5 सापळे लावावेत.

फळांची काढणी व उत्पादन :

Red Pumpkin Cultivation 2025 फळ पूर्ण पक्व झाल्यानंतर अंदाजे 160 ते 180 दिवस फळांचा रंग बदलतो. त्यानंतर फळ देठासह मोडावे व सावलीमध्ये साठवणीसाठी ठेवावे. तडकलेली सडलेली फळे बाजूला काढावीत बाजारपेठचा अंदाज घेऊन फळे विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावेत. अशा प्रकारे या पिकाची लागवड करून निघा घेतल्यास 350 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment