नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस कायम, वाचा सविस्तर; Rain Alert 2025

Rain Alert 2025 मागील चार दिवसापासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे. तर पुढील चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात 16 मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert 2025

मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात तसेच घाट क्षेत्रात काही ठिकाणी आज पासून 13 व 16 मे 2025 रोजी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

घरबसल्या दोन मिनिटात ‘जॉब कार्ड’ कसे काढायचे? वाचा सविस्तर;

Rain Alert 2025 तसेच दिनांक 14 व 15 मे 2025 रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (30-40 प्रतितास वेग) व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. 17 मे 2025 रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Rain Alert 2025 नाशिक जिल्ह्यासाठी प्रभावा आधारित अंदाज कृषी सल्ला

शेळ्यांना शेड मध्ये ठेवा आणि त्यांना मेघगर्जनेसह विजांपासून वाचविण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.

दिनांक 13 ते 16 मे 2025 दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटा, पाऊस तसेच सोसाट्याचा वाण्यांचा अंदाज.

सक्ष्यात घेता पशुधनाला / दुभत्या जनावरांना गोठपात आणि विजेपासून स्वतःचे संरक्षण करा. जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने भाजीपाला व फळपिकांना काठीचा आधार द्यावा.

पावसाची शक्यता असल्याने भाजीपाला व काढण्यात आलेले फत्रा पिके त्वरित काढणी करून प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे.

पशुधन : मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा.

WhatsApp Group Join Now

गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना विजांपासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.

मेघगर्जनेसह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.

दुबत्या जनावरांना गोठ्यामध्ये ठेवा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment