गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर Rabi Pik Vima Yojana 2025

Rabi Pik Vima Yojana 2025 पुणे: रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी उत्पादकांना शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत राज्यात सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.

Rabi Pik Vima Yojana 2025

Rabi Pik Vima Yojana 2025 गेल्या वर्षी हाच आकडा 55 लाख इतका होता. गहू, हरभरा व कांदा पिकासाठी 15 डिसेंबरची मुदत असल्याने सहभागी शेतकरी अर्जाची संख्या वाढेल, अशी अशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरु, चमेली आणि चेकनेट बोरांना कसा मिळतोय दर?

Rabi Pik Vima Yojana 2025 अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर विभागाने आघाडी घेतली असून या विभागात आतापर्यंत 1 लाख 36 हजार शेतकरी अर्ज संख्या आहे तर संभाजीनगर विभागात 78 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.

WhatsApp Group Join Now

Rabi Pik Vima Yojana 2025 केंद्र सरकारने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमूग या सहा पिकांसाठी विमा योजना जाहीर केली आहे.

ज्वारी पिकासाठी विमा उतरवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. त्यामुळे सहभागासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

तर गहू, हरभरा व कांदा पिकासाठी हि मुदत 15 डिसेंबर अशी आहे. उन्हाळी भात व भुईमूग पिकासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2026 अशी ठेवण्यात अली आहे.

Rabi Pik Vima Yojana 2025 राज्यात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 11 शेतकऱ्यांनी 3 लाख 26 हजार 168 अर्ज केले आहेत. या अर्जानुसार 2 लाख 6 हजार 995 हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या योजनेत 28 लाख 53 हजार 499 शेतकऱ्यांनी 55 लाख 17 हजार 814 अर्ज आले होते.

रब्बी हंगामात संबंध राज्यभर गहू व हरभरा या दोन पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते तसेच ओलिताची सोया असलेल्या जिल्ह्यामध्ये कांद्याचे क्षेत्रही मोठे असते. या तिन्ही पिकांसाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. असे कृषी विभागाने सांगितले.

WhatsApp Group Join Now

विभागनिहाय अर्ज संख्या: Rabi Pik Vima Yojana 2025

कोकण-6

नाशिक-7,946

पुणे-43,027

कोल्हापूर- 19,649

संभाजीनगर-79,399

लातूर-1,37,001

अमरावती-37,452

नागपूर-1,519

एकूण- 3,26,168

फळपीक योजनेमध्ये 2 लाख 13 हजार अर्ज: Rabi Pik Vima Yojana 2025

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहार (रब्बी) मध्ये आतापर्यंत 2 लाख 13 हजार 656 अर्ज प्राप्त झाले आहेत.

गेल्या वर्षी 2 लाख 35 हजार 725 अर्ज आले होते. काजू, संत्रा व आंबा (कोकण विभागासाठी) फळपीक विमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे.

आंबा पिकासाठी कोकण विभाग वगळून इतर जिल्ह्यासाठी 31 डिसेंबर व डाळिंब पिकासाठी 14 जानेवारी 2026 हि अंतिम मुदत आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment