Rabbi Crop Harvesting 2025 पीक उत्पादनाच्या दृष्टीने कुठल्याही पिकाच्या पेरणीला जेवढे महत्त्व असते. तेवढेच महत्त्व पिकाच्या काढणीलाही असते. पक्वते नंतर योग्य कालावधीत पिकाची काढणी केली नाही, तर नुकसान होऊन पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

WhatsApp Group
Join Now
- रब्बी ज्वारीचे पीक जाती परत्वे 110 ते 130 दिवसात काढणीस तयार होते. काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास फुटताना टच असा आवाज येतो. ज्वारी पिठाळ लागते. दाण्याच्या टोकाकडील भागा जवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणे दिसतात ज्वारीची काढणी करावी.
- गव्हाचे पीठ पक्व होण्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर काढणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एनआय – 5439 व एनआयएडब्ल्यू – 301 त्र्यंबक या गव्हाच्या वाणांचे दाणे शेतात झडू शकतात. गव्हाच्या कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण सुमारे 15 टक्के असावे.
- मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर कणसे सोलून खुडून घ्यावीत.
- हरभऱ्याचे पीक 110 ते 120 दिवसात काढण्यासाठी तयार होते. मात्र पीक ओलसर असताना हरभऱ्याची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करावी.
कडक ऊन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता
- सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाचे मागील बाजू पिवळी झाल्यानंतर कापणी करावी. कणसे कापणीनंतर चांगली वाळवून नंतरच त्यांची वळणी करावी.Rabbi Crop Harvesting 2025
- पीक करडईचे 130 ते 135 दिवसात पक्व होते. पाने व बोंडे पिवळी पडतात. करडईची काढणी शक्यतो सकाळी लवकर करावी कारण हवेत आद्रता असल्याने दाणे गळत नाहीत तसेच हाताला काटे बोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कडपे रचून पेठे करावेत व ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावेत.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |