PVC Pipe Yojana 2025 पीव्हीसी पाईप याचबरोबर एचडीपी अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी अनुदान दिले जाते.या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले आहेत, या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत. या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाडीबीटी ची लॉटरी लागण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता हळूहळू काही योजनांच्या लॉटरी लागण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
त्यानुसार सिंचन विभागातील योजनांची लॉटरी लागण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते आहे. महाडीबीटीत लॉटरी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. अशा शेतकऱ्यांना पुढील सात दिवसात कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल.
पीव्हीसी पाईप एचडीपी पाईपसाठी अनुदान
तर या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के आहे आणि 50 टक्के अशा पद्धतीचे अनुदान देण्यात येतो. दुसरीकडे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा दोन योजना राबवल्या जातात. या योजनेच्या अंतर्गत जे काही पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईप 428 रुपये मीटर पर्यंत शंभर टक्के अनुदान आहे.
अंतर्गत येणाऱ्या एसटी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना, एचडीपी पाईप असतील तर 50 रुपये प्रति मीटर तर पीव्हीसी पाईप साठी 35 रुपये प्रति मीटर अशा मर्यादा घालून देण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांचे अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकते.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ! नमो ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळवा…
आवश्यक कागदपत्रे
- तर, आता ज्या शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळवण्यात आले आहे.
- अशा शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा उतारा, याचबरोबर कोटेशन अपलोड करण्यासाठी अशी कागदपत्रे लागणार आहेत.
- ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्व संमती दिली जाईल.
- पूर्व संमती मिळाल्यानंतर तुम्हाला पाईपची खरेदी करायची आहे. खरेदीचे बिल पुन्हा एकदा संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.

पाईपलाईन योजनेचा अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
इतर योजनांच्या माहितीसाठी | येथे क्लिक करा |