Production of Cowpea Crops 2025 महाराष्ट्र राज्यात वेळोवेळी पडणाऱ्या अवर्षणामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. चवळी हे चाऱ्याचे पीक खरीप तसेच उन्हाळी हंगामात कमी दिवसात घेता येते. चवळी हे चाऱ्याचे पीक खरीप तसेच उन्हाळी हंगामात कमी दिवसात घेता येते.

चवळीचा ओला चारा पालेदार चवदार व सकसही असतो चवळी बऱ्याच वेळा एकदल चारा पिकांबरोबर (वारी मका वगैरे ) मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणूनही घेतात. चवळीपासून हिरवा चारा वाळलेल्या चारा तसेच मुरघासही करता येतो.
हरितगृह काळाची गरज!
जमीन व पूर्व मशागत
मध्यम प्रकारच्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या भारी जमिनीतही हे पीक चांगले येते. एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्यांच्या साह्याने जमीन तयार करावी.

सुधारित वाण –
- श्वेता
- इ.सी. 4116
- बुंदेललोबिया
- यू.पी.सी. 5286
यापैकी सुधारित वाहनांचा पेरणीसाठी उपयोग करावा.
Production of Cowpea Crops 2025 बियाणे व पेरणीची वेळ!
खरिपात चवळीची पेरणी जून जुलै मध्ये व उन्हाळ्यात फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत करावी. हेक्टरी 40 किलो बियाणांचा वापर करावा. पेरणी करताना दोन ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे.
Production of Cowpea Crops 2025 खते व बीजप्रक्रिया….
उपलब्धतेनुसार मशागतीच्या वेळी हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्यावेळी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. पेरणीच्यावेळी रायझोबियम जिवाणू संवर्धन खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणा पेरणीपूर्वी चोळावे.
आंतरमशागत
पेरणी केल्यानंतर साधारणतः 21 दिवसांनी पिकास एक कोळपणी करावी. पुढे पिकाची वाढ झपाटाने होते व जमीन झाकून जाते. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. गरज पडल्यास एक खुरपणी देऊन शेत तनवीहरीत ठेवावे.
Production of Cowpea Crops 2025 पाणी व्यवस्थापन
खरीप हंगामात पाऊस पुरेसा व वेळेवर असल्यास पाण्याची आवश्यकता नाही. पाऊस नसल्यास पिकास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
पीक संरक्षण
चवळी पिकावर मुख्यता मावा, तुडतुडे, पाने खाणाऱ्या आळ्या इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी खालील उपाय करावे.
मावा व तुडतुडे
निंबोळी अर्क 50 टक्के फवारावे. जास्त प्रमाणात असेल तर डायमेथॉईड 0.3% प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फिरवावे. औषध फवारल्यानंतर 7 दिवस जनावरांना हिरवा चारा घालू नये.
पाने खाणाऱ्या अळ्या
निंबोळी अर्क 5% फवारावे. नंतर डेल्टामेथ्रीन 350 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. औषध फवारल्यानंतर 3 दिवस जनावरांना हिरवा चारा घालू नये.
Production of Cowpea Crops 2025 कापणी
चवळीला 50% फुलोऱ्यात येण्यास पेरणीपासून 45 ते 55 दिवस लागतात. त्याचवेळी कापणी सुरू करावी.शेंगा पक्व होईपर्यंत कापणी न केल्यास बरीचशी पाणी गळून पडतात, पौष्टिकता कमी होते, व उत्पादन ही घटते.
त्यासाठी वेळेवर कापणी करावी. दुसरी कापणी खोडवा घ्यावयाचा असल्यास पहिली कापणी जमिनीलगत न करता जमिनीपासून साधारणतः 10 ते 15 सेंमी खोड ठेवून करावी.
Production of Cowpea Crops 2025 हिरव्या चाऱ्याचे उत्पादन
हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हेक्टरी 300 ते 350 क्विंटल मिळते. चाऱ्यात 14 ते 19 टक्के प्रथिने असतात. पंचनीय घटक 60 ते 70 टक्के असतात.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |