जमीन: Potato Crop 2025 बटाटा पिकास मध्यम काळी, पोयट्याची, उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीखाली घेणे फायद्याचे ठरते. शेणखत 12-16 टन एकरी देणे आवश्यक असते.

वाण : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या सुधारित जाती कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर आणि कुफरी सिंधुरी. रब्बीसाठी पुखराज या वाणाची निवड करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!!
पेरणीची वेळ खरीप-जून जुलै, रब्बी- ऑक्टोबर नोहेंबर
लागवडीचे अंतर: सऱ्या वरंबे पद्धतीने लागवडीचे अंतर 45030 सेमी बियाण्याचे एकरी प्रमाण 7 क्विंटल प्रति एकर

बीजप्रक्रिया: Potato Crop 2025
लागवडीसाठी बटाट्याच्या फोडी करतेवेळी कोयता ब्लुफोरच्या (कॉपर ऑक्सिक्लोराईड 50%) द्रावणात बुडवून घ्यावा.
लागवडीपूर्वी बेने कापून खालील द्रावणात बुडवून ठेवावे व लागवड करावी.
पाणी 10 लिटर + कॅप्टन 30 ग्रॅम+ सी.बी.झेड 50: 10 ग्रॅम + क्लोरमॅक्स 20 मिली+ हंस/ह्युमिफोर 25 मिली.
लागवडीपूर्वी खताचा डोस (बेसल डोस) प्रति एकर खालील प्रमाणे द्यावा.
बेसल डोस: डीएपी 3 बॅग+ एसओपी 1 बॅग+ दुय्यम अन्नद्रवे 2 बॅग एसआरपी-9 1 बॅग+ निंबोळी पेंड 2 बॅग+ न्यूट्रीपंच 10 किलो/ मॅक्सवेल एस 5 किलो+ ह्युमिफोर-जी 10 किलो+ फोरेट 5 किलो+ गंधक 10 किलो+ बोरॉन 2 किलो.
बटाटा पिकाची भरणी करतेवेळी म्हणजेच पीक 1 महिन्याचे झाल्यावर खालील खताचा डोस दिल्यास बटाट्याचे पोषण व उत्पादन दर्जेदार मिळवण्यास मदत होते.
भरणीसाठी एकरी डोस
10:26:26 -4 बॅग + एसआरपी-9: 9 किलो + गंधक 10 किलो+ झिंक सल्फेट 10 किलो.
बटाटा पिकाच्या पोषणासाठी व शाकीय विकासासाठी खालील 3 फवारण्या घेतल्यास पानाचे आरोग्य सुधारते तसेच रोग व किडींना अटकाव होतो व बटाटे पोसण्यासाठी मदत होते.
फेरसची कमतरता असल्यास इढा ग्रीन एकरी 500 ग्रॅम ड्रिपमधून द्यावे. (फवारणीमधून इढा ग्रीनचा वापर करू नये)
पहिली फवारणी लागणीनंतर 25-30 दिवसांनी खालीलप्रमाणे घ्यावी
पाणी 10 ली + 19:19:19-40 ग्रॅम + हंस 20 मिली + सुदामा 5 मिली + सी.बी.झेड- 50: 20 ग्रॅम + स्प्रेवेल 15 ग्रॅम + अमीनोलाईट 15 मिली
पहिली फवारणी: पाणी 10 ली + 19:19:19-40 ग्रॅम+हंस 20 मिली + सुदामा 5 मिली + सी.बी.झेड-50:20 ग्रॅम + स्प्रेवेल 15 ग्रॅम + अमीनोलाईट 15 मिली
दुसरी फवारणी लागणीनंतर 40-45 दिवसांनी खालीलप्रमाणे घ्यावी
पाणी 10 ली + 12:69:00-40 ग्रॅम + स्टारफोर्स/सुपरस्टार-9:20 मिली + एस.आर.पी 20 ग्रॅम + कवच कुंडल 10 ग्रॅम + मिथोमिल 40% 10 ग्रॅम
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पी एम प्रोटेक्ट 0.75-1 मिली प्रति लिटर याप्रमाणात फवारणी घ्यावी.
तिसरी फवारणी लागणीनंतर/ पेरणीनंतर 50-55 दिवसांनी खालीलप्रमाणे घ्यावी
(बटाट्याचे आरे पोसण्यासाठी व संख्या वाढण्यासाठी खालील फवारणीचा उपयोग होतो.)
पाणी 10 ली + 00:52:34-40 ग्रॅम + सीझर 10 मिली+बोरॉन 10 ग्रॅम + आयकॉन शाईन 15 मिली
फवारणी पाणी 10 ली + कॅलस्ट्रोक मिल्की 20 मिली + ट्रायसायकल झोल 7 ग्रॅम.
चौथी फवारणी लागणीनंतर/ पेरणीनंतर 60-70 दिवसांनी खालीलप्रमाणे घ्यावी.
पाणी 10 ली + 13:00:45-50 ग्रॅम + थायोफिनाईट मिथाईल 10 ग्रॅम + सुपरसाईज 10 मिली + कोराजन 3 मिली.
बुरशीजन्य व जिवाणूजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी पाणी 10 लिटर+ सिफॉन 15 मिली+ सिलिस्टिक 3 मिली 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या घ्याव्यात. (वरील द्रावणात कोणतेही रसायन मिसळू नये.)
पेरणीनंतर 75 ते 80 दिवसांनी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 10 लिटर+00:00:50-50 ग्रॅम+ सुपरसाईज 10 मिली
टीप: बटाटा पिकावरील करपा आटोक्यात आणण्यासाठी चिटोसान घटक असणाऱ्या व सिस्टिमिक अक्वायर्ड रेझिस्टन्सद्वारे काम करणारे सु-मॅक 2 मिली या प्रमाणात पिकाच्या कालावधीमध्ये 2 फवारण्या घेतल्यास चांगले परिणाम मिळतात.
| खतांचा प्रकार व मूळ संवर्धक | खतांची एकूण मात्रा किलो/ली प्रति एकर | खते देण्याचे प्रमाण किलो/ली एकर आठवडा | खते देण्याची वेळ |
| समरूप 12:61:00+ युरिया+ हंस/ रूटशाईन | 5 5 1 | 5 5 1 | उगवणीनंतर 5 ते 7 दिवसांनी |
| समरूप 19:19:19 युरिया+ फुलवीलाईट | 25 50 500 ग्रॅम | 8.33 16.66 | 11 ते 30 दिवस (3 आठवडे) 30 वा दिवस |
| समरूप 12:61:00 युरिया+अमिनोलाईट | 25 25 500 मिली | 12.5 12.5 | 31 ते 45 दिवस (3 आठवडे) 40 वा दिवस |
टीप: माती परीक्षण अहवालानुसार सदरच्या खत नियोजनामध्ये बदल करू शकता तसेच सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पेंडी व शेणखताचा वापर करावा.
नत्रयुक्त खतांचा वापर आवश्यक्यतेनुसार करावा.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |